Baby Health: बाळाला चांदीच्या भांड्यात जेवायला घाला, होतील 'हे' फायदे

तब्येत पाणी
Updated Jan 08, 2020 | 18:09 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Eating in silver plate benefits: बाळ जन्माला आल्याच्या सहा महिन्यानंतर त्याला चांदीच्या प्लेटमध्ये जेवण, चांदीच्या ग्लासनं पाणी पाजलं जातं. याला उष्टावन विधी म्हणतात. पण याचं एक शास्त्रीय कारण आहे, जाणून घ्या..

Health Benefits Of Feeding Babies In Silver
जाणून घ्या बाळाला चांदीच्या भांड्यात जेवू घालण्याचे फायदे 

थोडं पण कामाचं

  • लहान मुलांना चांदीच्या ताटात जेवू घालण्याचे अनेक आहेत फायदे
  • स्मरणशक्ती वाढवणे आणि आजारांपासून दूर ठेवण्याचं काम करते चांदी
  • अनेक इंफेक्शनपासून लहान मुलांचा बचाव करण्याचं काम चांदी करते

Baby Health: हिंदू धर्मामध्ये चांदीला खूप शुभ आणि पवित्र मानलं जातं. पहिल्याच्या काळात लोकं चांदीच्या ताटात किंवा केळीच्या पानावर जेवण करत होते, त्यामुळे ते अगदी फिट राहायचे. चांदी हा एक असा धातू आहे ज्यात जेवण केल्यानं व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक समस्या दूर होतात. महिलांमधील अनेक समस्या दूर करण्याचं काम चांदी करते, म्हणूनच चांदीचे काही विशिष्ट दागिने घालण्याची पद्धत भारतीय महिलांमध्ये आहे. पूजेत सुद्धा चांदीच्या पात्रांचा उपयोग केला जातो.

तसं तर चांदीच्या ताटात जेवणाचा प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला फायदा होतो. पण लहान मुलांना चांदीच्या ताटात जेवू घातल्यानं त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास चांगल्या पद्धतीनं होतो. बाळाला अनेक आजारांपासून आपण यामुळे दूर ठेवू शकतो. चांदीच्या भांड्यात लहान बाळाला जेवू घातल्यानं पोटदुखी, डायरियासह पोटाशी निगडित इतर आजार दूर होतात.

लहान मुलांना चांदीच्या भांड्यात जेवू घालण्याचे फायदे...

  1. इंफेक्शनपासून बचाव – चांदीला शुद्धतेचं प्रतिक मानलं जातं. यात अँटी मायक्रोबिअल गुण असतात. चांदीच्या भांड्यात मुलांना खाऊ घातल्यानं रोगांपासून त्यांचं रक्षण होतं. शरीरात संक्रमण होत नाही.
  2. शरीर थंड राहतं – चांदी हा एक थंड धातू आहे. चांदीच्या भांड्यात मुलांना जेवू घातल्यानं मुलांच्या शरीरात थंडावा निर्माण होतो. त्यामुळे मुल शांत राहतं आणि त्याच्या शरीरात अस्वस्थता निर्माण होत नाही. उन्हाळ्यात मुलांना चांदीच्या ग्लासमध्ये दूध पाजावं किंवा मुलांना चांदीच्या ताटात जेवू घालणं फायदेशीर ठरतं.
  3. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते – लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते, ज्यामुळे मुलं खूप लवकर आजारी पडतात. चांदीच्या भांड्यात खाऊ घातल्यानं या धातूचे काही अंश जेवणात मिसळतात, त्यामुळे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि मुलं स्वस्थ राहतात.
  4. सर्दी-खोकला होत नाही – लहान मुलांमध्ये असलेल्या पित्त दोषामुळे त्यांना सतत सर्दी-खोकला होत असतो. चांदीच्या ग्लासमध्ये मुलांना पाणी पाजल्यानं ही समस्या दूर होते.
  5. स्मरणशक्ती वाढते – चांदीच्या भांड्यात जेवू घातल्यानं मुलं आजारी पडत नाही आणि स्वस्थ राहतात. चांदीमध्ये काही असे तत्त्व असतात जे खाण्यात मिसळतात. त्यामुळे मुलांची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. म्हणूनच मुलांना चांदीच्या भांड्यात जेवू घालणं फायदेशीर होत असतं.

जर आपल्याला सुद्धा आपल्या मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास व्हावा असं वाटत असेल तर त्यांना चांदीच्या ताटात जेवू घाला. हा धातू मुलांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी