Yellow Teeth : दातांचा पिवळेपणा दूर करणारे सोपे प्रभावी घरगुती उपाय

simple and effective home remedies to remove yellow colour from teeth : जाणून घ्या दातांचा पिवळेपणा कमी करणारे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय

Yellow Teeth
दातांचा पिवळेपणा दूर करणारे सोपे प्रभावी घरगुती उपाय  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • दातांचा पिवळेपणा दूर करणारे सोपे प्रभावी घरगुती उपाय
  • 5 सोपे उपाय
  • बेकिंग सोडा वापरून दातांचा पिवळेपणा कमी करण्याचे फायदे आणि तोटे

simple and effective home remedies to remove yellow colour from teeth : दररोज ब्रश केले तरी वेगवेगळे पदार्थ खाल्ल्यामुळे नैसर्गिकरित्या दातांवर पिवळ्या रंगाची पुटं निर्माण होत जातात. यालाच दातांचा पिवळेपणा असे म्हणतात. प्रत्येक व्यक्तीच्या दातांना हळू हळू पिवळेपणा येऊ लागतो. हा पिवळेपणा कमी करण्यासाठी कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर चुळा भरणे हा एक सोपा उपाय आहे. तसेच दररोज सकाळी आणि रात्री अशा पद्धतीने दिवसातून दोन वेळा दात घासले अर्थात ब्रश केले तर दातांचा पिवळेपणा कमी होण्यास मदत होते. पण काही वेळा दातांचा पिवळेपणा कमी होण्यासाठी एवढी स्वच्छता पुरेशी होत नाही. अशा परिस्थितीत दातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी काही सोपे आणि प्रभावी असे घरगुती उपाय करणे शक्य आहे. हे उपाय केले तर दातांचा पिवळेपणा कमी होण्यास मदत होईल.

दातांचा पिवळेपणा कमी करणारे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय, How to Get Rid of Yellow Teeth :

  1. मीठ : दररोज सकाळी आणि रात्री अशा पद्धतीने दिवसातून दोन वेळा मिठाने दात घासले अर्थात ब्रश केले तर दातांचा पिवळेपणा कमी होण्यास मदत होते. 
  2. स्ट्रॉबेरी : दररोज सकाळी आणि रात्री अशा पद्धतीने दिवसातून दोन वेळा स्ट्रॉबेरीने अथवा स्ट्रॉबेरीचा नैसर्गिक रस आणि मीठ यांचे मिश्रण करून ते वापरले आणि दात घासले अर्थात ब्रश केले तर दातांचा पिवळेपणा कमी होण्यास मदत होते.
  3. पांढरे व्हिनेगर : दररोज सकाळी आणि रात्री अशा पद्धतीने दिवसातून दोन वेळा पांढऱ्या व्हिनेगरने दात घासले अर्थात ब्रश केले तर दातांचा पिवळेपणा कमी होण्यास मदत होते. यासाठी थोड्या पाण्यात 1 किंवा 2 चमचे पांढरे व्हिनेगर मिसळा आणि व्यवस्थित ढवळा नंतर त्याच पाण्याचा वापर करून दात घासले तर दातांचा पिवळेपणा कमी होण्यास मदत होते.
  4. आलं किंवा आले : दररोज सकाळी आणि रात्री अशा पद्धतीने दिवसातून दोन वेळा आल्याच्या रसाने दात घासले अर्थात ब्रश केले तर दातांचा पिवळेपणा कमी होण्यास मदत होते.
  5. बेकिंग सोडा : थोडे मीठ आणि थोडा बेकिंग सोडा यांचे मिश्रण तयार करा. हे मिश्रण वापरून त्याने दात घासले अर्थात ब्रश केले तर दातांचा पिवळेपणा कमी होण्यास मदत होते. पण बेकिंग सोड्याचा दात घासण्यासाठी जास्त प्रमाणात वापर करू नका. नाही तर दात झिजण्याचा धोका आहे.

डिस्क्लेमर / Disclaimer : मजकूर संकलित माहितीच्याआधारे तयार केला आहे. प्रयोग करण्याआधी वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे आहे. Times Now Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही.

Coconut Water : नारळ पाणी पिण्याचे फायदे

प्रायव्हेट पार्टची स्वच्छता करताना घ्यायची काळजी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी