Yoga for eyes : ही तीन योगासनं ठरतील डोळ्यांसाठी वरदान, बसल्या बसल्या होईल व्यायाम

डोळ्यांच्या व्यायामाकडे अनेकांकडून दुर्लक्ष केलं जातं. शारीरिक फिटनेस राखण्यासाठी इतर व्यायामासोबत डोळ्यांच्या व्यायामाकडेही लक्ष देणं गरजेचं आहे.

Yoga for eyes
ही तीन योगासनं ठरतील डोळ्यांसाठी वरदान  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • डोळ्यांच्या व्यायामाकडे लक्ष देण्याची गरज
  • सोप्या व्यायामांनी सुटतात अनेक समस्या
  • डोळ्यांसाठी करा नियमित योगासने

Yoga for eyes : डोळे (eyes) हा शरीरातील एक अतिशय महत्त्वाचा अवयव (Important Organ) आहे. शरीरातील इतर अवयव सुदृढ (Healthy) करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचा व्यायाम करत असतो. अनेकजण जिममध्ये जाऊन (Gym) वजन कमी करण्यासाठी आणि पीळदार शरीरयष्टी कमावण्यासाठी घाम गाळत असतात. कुणी चालण्याचा, कुणी पळण्याचा तर कुणी सायकलिंगचा व्यायाम करत असतं. मात्र या सगळ्यात डोळ्यांच्या व्यायामाकडे (Exercise of eyes) मात्र दुर्लक्ष होताना दिसतं. दिवसभर काम करून थकणाऱ्या डोळ्यांना योग्य व्यायाम आणि आराम मिळाला नाही, तर त्यांची क्षमता कमी होऊ लागते आणि डोळ्यांच्या समस्या उद्भवायला सुरुवात होते. त्यासाठी रोजची काही मिनिटं काढून डोळ्यांचा व्यायाम करण्याची गरज असते. केवळ काही मिनिटांचा व्यायाम डोळ्यांचं आरोग्य आणि क्षमता सुधारू शकतो. त्यासाठी काही योगासनं फायदेशीर ठरतात. जाणून घेऊया, अशाच काही योगासनांविषयी. 

त्राटक योगासन

डोळ्यांची क्षमता वाढवण्यासाठी त्राटक योगासन अतिशय फायदेशीर असतं. त्राटक हा शब्द दोन शब्दांनी तयार झाल आहे. त्रा आणि टक. यातील त्रा या शब्दाचा अर्थ होतो स्वतंत्र किंवा मुक्त होणे. टक या शब्दाचा अर्थ आहे कुठल्याही वस्तूकडे सलग पाहत राहणे. आपण दिवसभराच्या कामात कुठल्या ना कुठल्या वस्तूकडे पाहत राहतो. मग तो मोबाईल असो, लॅपटॉपची स्क्रीन असो किंवा इतर कुठलंही साधन असो. मात्र या योगासनाद्वारे आपण डोळ्यांना आराम देऊ शकतो आणि त्यांचं आरोग्य सुधारू शकतो. याला त्राटक मेडिशन असंही म्हटलं जातं. डोळ्यांची क्षमता शाबूत राखण्यासाठी हे सर्वोत्तम योगासनं मानलं जातं. त्याचबरोबर डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यासाठीही ते फायदेशीर ठरतं. 

अधिक वाचा - Weight loss Tips : सगळं काही करूनही वजन कमी होत नाही? मग नक्कीच असणार ‘ही’ तीन कारणं

डोळे चारही बाजूंना फिरवा

कुठल्याही जागी बसल्या बसल्या काही मिनिटांत आपण हा व्यायाम करू शकता. त्यासाठी रोज 5 ते 10 मिनिटं डोळ्यांना डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे, खालून वर व वरून खाली फिरवण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे डोळ्यांची हालचाल नियमित राहते आणि कुठल्याही वेळी हा व्यायाम तुम्ही करू शकता. सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी हा व्यायाम करणं सर्वोत्तम मानलं जातं. 

अधिक वाचा -  Weight loss tips in marathi : वजन कमी करण्यासाठी सुका मेवा ठरतो फायदेशीर, असे करा सेवन

पापण्यांची उघडझाप

पापण्यांची उघडझाप हा एक सर्वात सोपा व्यायाम आहे. त्यासाठी सर्वप्रथम दहा सेकंद पापण्यांची उघडझाप करावी. त्यानंतर वीस सेकंद डोळे बंद करून श्वासावर लक्ष केंद्रीत करावं. ही कृती चार ते पाच वेळा करावी. त्यामुळे डोळ्यांच्या अनेक किरकोळ समस्या दूर होऊ शकतात. डोळ्यांतून सतत पाणी येणं आणि डोळे दुखण्याची समस्याही दूर होण्याची शक्यता असते. 

डिस्क्लेमर - डोळ्यांच्या आरोग्यासाठीच्या या काही घरगुती टिप्स आणि व्यायाम आहेत. तुम्हाला डोळ्यांसंबंधी काही गंभीर समस्या असतील, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेण्याची गरज आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी