Simple Health Test : तुम्ही जास्त जगणार की कमी? या पाच संकेतांवरून येतो अंदाज

एखादी व्यक्ती दीर्घायुषी होणार का, हे आता काही लक्षणं तपासून ठरवता येऊ शकतं, असं नव्या संशोधनातून समोर आलं आहे.

Simple Health Test
तुम्ही जास्त जगणार की कमी?  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • दीर्घायुषी असण्याचे आहेत चार निकष
  • एका पायावर उभारण्याची क्षमता ठरवते फिटनेस
  • पुशअप्स मारण्याच्या क्षमतेवरही ठरतं आयुष्य

Simple Health Test : पायऱ्या चढताना लागणारी धाप किंवा कुणाशी हस्तांदोलन करताना हातात जोर नसणे यासारख्या गोष्टी आपला फिटनेस किती आहे, हे दाखवतात असं गेल्या अनेक वर्षांपासून मानलं जातं. मात्र फिटनेसचा हा काही एकमेव निकष असू शकत नाही, हे नव्या संशोधनातून दिसून आलं आहे. एखादी व्यक्ती किती फिट आहे आणि ती व्यक्ती दीर्घकाळ जगेल की लवकर मरेल, हे ठरवणारे काही ठोस निकष असल्याचं नुकत्याच कऱण्यात आलेल्या एका अभ्यासातून दिसून आलं आहे. या निकषांना ज्या ज्या व्यक्तींनी यशस्वीरित्या पूर्ण केलं, ते दीर्घायुषी ठरत असल्याचं दिसून आलं आहे. यापैकी जेवढ्या निकषांमध्ये व्यक्ती कमकुवत किंवा असमर्थ असल्याचं दिसलं तितकी त्यांच्या दीर्घायुषी होण्याची शक्यता कमी होताना दिसली. जाणून घेऊया असे काही निकष.

एका पायावर उभे राहणे

ज्या व्यक्ती किमान 10 सेकंद किंवा त्यापेक्षा अधिक वेळ एका पायावर तोल सांभाळू शकतात, त्यांच्या दीर्घायुषी होण्याची शक्यता अधिक असल्याचं दिसून आलं आहे. एका पायावर तोल सांभाळणं हा फिटनेसचा एक महत्त्वाचा निकष आहे. हा निकष ज्यांना पूर्ण करता आला नाही, त्यांचा तुलनेनं लवकर मृत्यू झाल्याचं अभ्यासात आढळून आलं. डेलि मेलच्या रिपोर्टनुसार 50 ते 75 या वयोगटातील 2000 व्यक्तींवर हा प्रयोग करण्यात आला. ब्राझीलमध्ये करण्यात आलेल्या या संशोधनानुसार ज्या व्यक्ती 10 सेकंदांपेक्षा अधिक वेळ सलग एका पायावर उभ्या राहू शकल्या, त्या इतर व्यक्तींच्या तुलनेत दीर्घायुषी होण्याची शक्यता 84 टक्क्यांनी अधिक असल्याचं दिसून आलं. 

अधिक वाचा - Healthy Breakfast : हेल्दी ब्रेकाफास्टमुळे होईल वजन कमी, वाचा खास टिप्स

चालण्याचा वेग

ज्या व्यक्ती उतारवयात हळू चालतात किंवा वयोमानानुसार ज्यांच्या चालण्याचा वेग कमी होतो, त्या व्यक्तींचा मृत्यू लवकर होण्याची शक्यता असल्याचंही या अभ्यासातून दिसून आलं. फ्रान्समधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने 65 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या 3200 लोकांचं 5 वर्षे निरीक्षण केलं. त्यातून त्यांच्या चालण्याचे ट्रेंड तपासण्यात आले. यामध्ये सहभागी नागरिकांचा कमीत वेग दर मिनिटाला 90 मीटर ते जास्तीत जास्त वेग दर मिनिटाला 110 मीटर एवढा होता. त्यातील अधिक वेगाने चालणारे नागरिक दीर्घायुषी होत असल्याचं दिसून आलं. 

अधिक वाचा - Pain Killer : डोकेदुखी असो किंवा अंगदुखी, हे ‘घरगुती पेन किलर’ वापरून तर पाहा!

बसणे आणि उठणे

मांडी घालून जमिनीवर बसणे आणि कुठलाही आधार न घेता पुन्हा उठून उभे राहणे, या निकषावरही दीर्घायुषी होण्याची संकल्पना मोजली गेली. नागरिकांना मोकळेढाकळे कपडे घालून मांडी घालून बसवण्यात आलं. त्यानंतर कुठलाही आधार न घेता उठून उभं राहायला सांगण्यात आलं. त्यावेळी 2002 लोकांवर हा प्रयोग करण्यात आला. अगदी सहज उठणाऱ्यांपासून प्रचंड कष्ट घ्यावे लागणाऱ्यांना वेगवेगळे गुण देण्यात आले. त्यानुसार ज्या व्यक्ती सहज उठून उभं राहू शकल्या, त्या दीर्घायुषी होत असल्याचं दिसून आलं. 

अधिक वाचा - High Cholesterol : कोलेस्ट्रॉल वाढलं असेल तर त्वचेत जाणवतात ‘हे’ बदल, वेळीच व्हा सावध

पुशअप्स

पुशअप्स मारण्याची क्षमता हा देखील फिटनेसचा एक महत्त्वाचा निकष ठरला. ज्या व्यक्ती कमीत कमी 40 पुशअप्स मारू शकल्या, त्या सर्वाधिक फिट असून त्यांचं हृदय उत्तम कार्य करत असल्याचं दिसून आलं. तर कमकुवत व्यक्ती या 10 किंवा त्यापेक्षा कमी पुशअप्सच मारू शकल्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी