हृदयक्रिया बंद पडल्याने गायक केकेचे निधन, हृदयक्रिया बंद पडण्याआधी दिसणारी लक्षणे

Singer KK dies at 53, doctors suspect cardiac arrest; what you need to know, Read in Marathi : प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नाथ याचे ५३व्या वर्षी हृदयक्रिया बंद पडल्याने निधन झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

Singer KK dies at 53, doctors suspect cardiac arrest; what you need to know, Read in Marathi
हृदयक्रिया बंद पडल्याने गायक केकेचे निधन, हृदयक्रिया बंद पडण्याआधी दिसणारी लक्षणे  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • हृदयक्रिया बंद पडल्याने गायक केकेचे निधन
 • हृदयक्रिया बंद पडण्याआधी दिसणारी लक्षणे
 • हृदयक्रियेवर परिणाम होईल अशी लक्षणे दिसू लागल्यास...

Singer KK dies at 53, doctors suspect cardiac arrest; what you need to know, Read in Marathi : प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नाथ याचे ५३व्या वर्षी हृदयक्रिया बंद पडल्याने निधन झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. गायक केके मंगळवारी एका कार्यक्रमात गाणी गाण्यासाठी गेला होता. हा कार्यक्रम सुरू असतानाच अस्वस्थ वाटू लागल्यामुळे केके कार्यक्रमाच्या ठिकाणावरून निघाला. विश्रांतीसाठी हॉटेलच्या रूमवर पोहोचला. तिथेच त्याची हृदयक्रिया बंद पडली. तो हॉटेल रूममध्ये कोसळला. त्याला तातडीने सीएमआरआय हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. डॉक्टरांनी तपासले आणि त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. 

मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय गायक

केके मनोरंजनसृष्टीतील एक लोकप्रिय गायक होता. त्याने हिंदी, तामीळ, तेलुगु, बंगाली आणि कानडी भाषेत अनेक गाणी गायली. 'यारों', 'क्या मुझे प्यार है', 'पल' ही त्याची गाणी प्रचंड गाजली. एवढ्या लोकप्रिय गायकाचे अकाली निधन झाल्यामुळे अनेकांना धक्का बसला. 

केकेच्या निधनाच्या निमित्ताने हृदयविकाराची चर्चा

केकेच्या निधनाचे कारण हृदयक्रिया बंद पडणे हे असल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. यामुळे हृदयविकार या विषयावरील चर्चेला उधाण आले आहे. हृदयविकार असो वा नसो पुरेसा ऑक्सिजन मिळाला नाही अथवा रक्तप्रवाहात अडथळा निर्माण झाला तर कोणत्याही क्षणी हृदयक्रिया बंद होते. यात ज्याची हृदयक्रिया बंद पडते त्या व्यक्तीला स्वतःला वाचविण्यासाठी काहीच करता येत नाही. पण हृदयक्रिया बंद पडल्यामुळे कोसळलेल्या व्यक्तीला इतर कोणी बघितले आणि तातडीने वैद्यकीय मदत मिळवून दिली तर हृदयक्रिया बंद पडलेली व्यक्ती वाचण्याची शक्यता असते. 

हृदयविकाराचा झटका आणि हृदयक्रिया बंद पडणे या दोन्हीत अनेकांची गल्लत होते. दोन्ही प्रकारांमध्ये हृदय काम करणे थांबवते. यामुळे माणसाच्या शरीरातील सर्व अवयवांना होणारा शुद्ध रक्ताचा पुरवठा थांबवतो. शुद्ध रक्ताच्या अभावी अवयव निकामी होतात आणि माणसाचा मृत्यू होतो. पण दोन्ही प्रकारांमध्ये थोडा फरक आहे. 

 1. जेव्हा एखाद्याला श्वास घेण्यासाठी पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही अशा वेळी गुदमरल्यामुळे व्यक्ती बेशुद्ध पडते
 2. जेव्हा अचानक ऑक्सिजनचा अभाव होतो त्यावेळी व्यक्ती गुदमरून कोलमडते, कोसळते
 3. नाडीचे ठोके जाणवत नाहीत
 4. श्वसनक्रिया थांबते
 5. अचानक माणूस कमकुवत होतो
 6. अचानक प्रचंड घाम येतो आणि अस्वस्थ वाटते
 7. श्वास घेण्यास त्रास होतो
 8. छातीत असह्य वेदना होतात

यापैकी कोणताही त्रास झाल्यास तातडीने वैद्यकीय मदत घेणे आवश्यक असते. वेळेत वैद्यकीय उपचार सुरू झाले तर माणूस वाचण्याची शक्यता असते. नाही तर थोड्या वेळातच हृदयक्रिया बंद पडण्याचा धोका असतो. हृदयक्रिया बंद पडल्यानंतर वैद्यकीय उपचारांसाठी नेण्यास उशीर झाला तर मृत्यू टाळणे कठीण असते. 

हृदयक्रियेवर परिणाम होईल अशी लक्षणे दिसू लागल्यास...

हृदयक्रिया बंद पडलेल्या व्यक्तीला वाचविण्यात यश आले तरी त्या प्रक्रियेत जास्त वेळ गेल्यास शरीराचा एखादा अवयव मध्यंतरीच्या काळात ऑक्सिजन अभावी निकामी झाला असतो. हा अवयव मेंदू किंवा मेंदूचा एखादा भाग असेल तर परिस्थिती आणखी गंभीर होते. यामुळेच हृदयक्रियेवर परिणाम होईल अशी लक्षणे दिसू लागल्यास तातडीने मोकळ्या वातावरणात जावे. जमिनीवर शांत बसावे किंवा ढोपून राहावे आणि हळू हळू पण विशिष्ट गतीने श्वास घेत राहणे आवश्यक असते. या दरम्यान वैद्यकीय मदत मिळाली तर संबंधित व्यक्ती लवकर सावरण्याची शक्यता वाढते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी