six weight loss myths : वजन कमी करण्याविषयीचे ६ गैरसमज आणि प्रत्यक्षातील स्थिती

six misconceptions about weight loss and reality : वजन कमी करताना काही वेळा गैरसमजातून चुकीच्या पद्धतीने व्यायाम आणि डाएट केले जाते. यामुळे नकळत शरीराचे नुकसान होते आणि वैद्यकीय मदत घ्यावी लागते. या लेखाच्या माध्यमातून जाणून घ्या वजन कमी करण्याविषयीचे ६ गैरसमज आणि प्रत्यक्षातील स्थिती.

six misconceptions about weight loss and reality
वजन कमी करण्याविषयीचे ६ गैरसमज आणि प्रत्यक्षातील स्थिती  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • वजन कमी करण्याविषयीचे ६ गैरसमज आणि प्रत्यक्षातील स्थिती
  • गैरसमजातून चुकीच्या पद्धतीने व्यायाम आणि डाएट केले जाते, शरीराचे नुकसान होते
  • आंबा खाल्ल्याने वजन वाढते हा मोठा गैरसमज

six misconceptions about weight loss and reality : फास्ट फूड आणि जंक फूडच्या काळात वाढते वजन ही एक गंभीर समस्या झाली आहे. हे वजन झटपट कमी करण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. वजन कमी करताना काही वेळा गैरसमजातून चुकीच्या पद्धतीने व्यायाम आणि डाएट केले जाते. यामुळे नकळत शरीराचे नुकसान होते आणि वैद्यकीय मदत घ्यावी लागते. या लेखाच्या माध्यमातून जाणून घ्या वजन कमी करण्याविषयीचे ६ गैरसमज आणि प्रत्यक्षातील स्थिती.

आरोग्य - वेबस्टोरी । तब्येत पाणी

Weight Loss: उन्हाळ्यात वेगाने होतं वजन कमी, हा डाएट प्लॅन करा सुरू

  1. आंबा खाल्ल्याने वजन वाढते : हा मोठा गैरसमज आहे. दुपारी जेवणाच्यावेळी किंवा संध्याकाळी न्याहरीच्यावेळी (स्नॅक्स) आंबा खाण्यास हरकत नाही. पण एका वेळी किती प्रमाणात आंबा खाता हे महत्त्वाचे आहे.
  2. चहा प्यायल्याने वजन वाढते : साखर घातलेल्या चहामुळे वजन वाढते. पण मर्यादीत प्रमाणात गुळाचा चहा प्यायल्यात अथवा दररोज दिवसभरात एक किंवा दोन कप ग्रीन टी प्यायलात तर वजन कमी करण्यास मदत होते. 
  3. अंड्याचा पिवळा भाग खाल्ल्याने वजन वाढते : अंडे मर्यादीत प्रमाणात शक्यतो सकाळी नाश्ता करण्याच्यावेळी खाल्ल्यास वजन वाढत नाही. अंडी खाल्ल्यानंतर ताज्या भाज्यांचे सेवन करणे हिताचे. 
  4. कर्बोदके अर्थात कार्ब्स वजन वाढवितात : शरीराला ऊर्जेसाठी मर्यादीत प्रमाणात कर्बोदके अर्थात कार्ब्स आवश्यक आहेत. यामुळे मर्यादीत प्रमाणात कर्बोदके अर्थात कार्ब्स मिळतील अशा पद्धतीचा आहार करणे आवश्यक आहे. 
  5. संध्याकाळी ७ वाजेपर्यंत किंवा सूर्यास्ताआधी रात्रीचे जेवण करावे : रात्रीचे जेवण आणि झोपण्याची वेळ यात ३ तासांचे अंतर आवश्यक आहे. हे संतुलन राखणे महत्त्वाचे आहे. यासाठी जेवणाची वेळ संबंधित व्यक्तीने त्याच्या किंवा तिच्या दैनंदिन कार्यक्रमाचा विचार करुन निश्चित करणे सोयीचे आहे.
  6. जेवण टाळल्यास वजन कमी करणे सोपे आहे : जेवण टाळल्यास पचनाचा वेग मंदावतो. यामुळे वजन वाढण्याचा धोका आहे. एक जेवण सोडले तर पुढच्या जेवणात आपण जास्त खाण्याचा धोका आहे. यामुळे जेवण टाळणे सोडा. शरीराला आवश्यक असलेले घटक पुरेश्या प्रमाणात आहारातून पोटात जाणे आवश्यक आहे. निरोगी आयुष्यासाठी आणि वजन आटोक्यात ठेवण्यासाठी हे महत्त्वाचे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी