Skin Care Tips: त्वचेची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे हे आपल्या सर्वांना आणि खासकरून मुलींना चांगलेच ठाऊक आहे. त्यासाठी आपण अनेक प्रकारची स्किन केअर उत्पादने खरेदी करून चेहऱ्यावर लावतो. कारण या बिझी लाइफस्टाइलमुळे आपल्याला सगळच रेडिमेड घ्यायची सवय पडली आहे. आणि आपल्या वाढत्या मागणीनुसार दररोज नवीन गोष्टी बाजारात आणल्या जात आहेत आणि सौंदर्य उद्योगात वेगाने बदलही होत आहे.
पण तुम्हाला माहिती आहे का नैसर्गिकरित्या चेहऱ्याची काळजी घेतल्यास आपला चेहरा अधिक चांगला दिसतो. त्यासाठी तुम्हाला दररोज त्वचेची काळजी घ्यायची गरज नाही. त्वचा निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी, तुम्ही आठवड्यातून किमान 2 वेळा या स्किन केअर रूटीनचे पालन केले पाहिजे.
घरगुती फेशियल
आपल्या चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी फेशियलची गरज असते. यासाठी आपण नेहमीच पार्लरमध्ये नाही जावू शकते. अशा वेळी बाहेरच्या उत्पादनांऐवजी घरात असलेल्या वस्तूंचा वापर करून पाहू शकता. तुम्ही आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा घरी फेशियल करू शकता.
अधिक वाचा: Tips: या टिप्स वापरल्याने सकाळ होईल एकदम फ्रेश
स्टिम करा
चेहऱ्यावर असलेल्या छिद्रांची म्हणजे पोर्सचीही तुम्ही विशेष काळजी घेतली पाहिजे आणि यासाठी तुम्ही स्टिमची मदत घेऊ शकता. स्वच्छ चेहऱ्यावर स्क्रब केल्यानंतर, कमीतकमी 10 मिनिटे वाफ घ्या आणि नंतर हलक्या ओल्या टॉवेलच्या मदतीने चेहरा स्वच्छ करा.
अधिक वाचा: Tips For Hair : चांगल्या केसांसाठी हे वनस्पती आहेत भारी; केसांना देतात चमक
स्किन एक्सफोलिएशन
आठवड्यातून 2 ते 3 वेळा त्वचेला एक्सफोलिएट करणे खूप महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही फेस स्क्रब वापरू शकता. मात्र हेही लक्षात ठेवा की, त्वचेला दररोज एक्सफोलिएट करू नये. कारण दररोज चेहऱ्यावर फेस स्क्रब वापरल्याने त्वचा कोरडी पडू शकते आणि चेहऱ्यावर खाज येऊ शकते.
अधिक वाचा: Health Tips: दह्यासोबत कधीही खाऊ नका या गोष्टी, होऊ शकतं नुकसान
हायड्रेशन करा
त्वचेला हायड्रेट करणे खूप महत्वाचे आहे आणि त्यासाठी तुम्ही त्वचेची अतिरिक्त काळजी घेतली पाहिजे. त्वचेला हायड्रेट करण्यासाठी तुम्ही शीट मास्क, फेस ऑइल, फेस सीरम यासारख्या इतर अनेक गोष्टींची मदत घेवू शकताय आणि चमदार त्वचेसाठी आठवड्यातून 2 ते 3 वेळा ही मेहनत घेऊ शकता.