Skin care tips : थंडीत चेहऱ्याची त्वचा फुटते का? स्किन केअरमध्ये करा हा बदल

तब्येत पाणी
Updated Dec 01, 2021 | 18:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

Winter skin care tips: जर थंडीच्या दिवसांत तुमच्या चेहऱ्याची त्वचा फुटत असेल तर या टिप्स तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील. 

skin care
थंडीत चेहऱ्याची त्वचा फुटते का? स्किन केअरमध्ये करा हा बदल 
थोडं पण कामाचं
  • स्किन केअर रूटीन थंडीत आणि उन्हाळ्यात वेगवेगळे असावे लागतात.
  • जर थंडीत स्किन खूप फुटत असेल तर काही ना काही उपाय करणे गरजेचे आहे. 
  • जर तुमच्या त्वचेला डीप मॉश्चराईज्ड नाही केले तर कोणत्याही स्किन केअर रूटीनचा परिणाम होणार नाही. 

Winter skin care tips । मुंबई: थंडीचा(winter season) हंगाम सुरू होताच त्वचा कोरडी(dry skin) होण्याची समस्या साऱ्यांनाच सतावू लागते. मात्र काही लोकांसाठी ही समस्या गंभीर असते. अनेकदा काहींची त्वचा इतकी फुटते की त्यातून पापुद्रे(skin flakes) निघू लागतात. अशातच तुम्हाला विचारले की तुम्ही स्किनसाठी कोणते स्किन केअर रूटीन(skin care routine) फॉलो करतात तर तुम्ही कदाचित अनेक प्रॉडक्टसची(products) नावे सांगाल मात्र खरंतर तुम्ही जर तुमच्या त्वचेला डीप मॉश्चराईज्ड नाही केले तर कोणत्याही स्किन केअर रूटीनचा परिणाम होणार नाही. If you have dry skin problem in winter then follow this tips

स्किन केअर रूटीन थंडीत आणि उन्हाळ्यात वेगवेगळे असावे लागतात. जर थंडीत स्किन खूप फुटत असेल तर काही ना काही उपाय करणे गरजेचे आहे. 

थंडीत आपली त्वचेतील ओलावा कमी होतो, अनेकदा हा कोरडेपणा इतका वाढतो की त्वचेवर पापुद्रे निघू लागतात. अनेकदा जेनेटिकली स्किन ड्राय असल्याने हा प्रॉब्लेम होऊ शकतो अथवा स्किन केअर रूटीनमध्ये डीप मॉश्चरायझरचा वापर न केल्यानेही होऊ शकतो. 

चेहऱ्यावरील कोणत्या जागेवरून निघतात पापुद्रे

जर चेहऱ्यावरून पापुद्रे निघत असतील याचा अर्थ तो भाग ड्राय होत असेल 

  1. नाकाच्या जवळची त्वचा
  2. ओठांच्या जवळीच त्वचा
  3. गालांची त्वचा
  4. काही केसेसमध्ये डोक्यावरील त्वचा

चेहऱ्याचा टी झोन जर ऑईली असेल तर गालांवर ड्रायनेस दिसेल. असे यासाठी होते कारण आपल्या चेहऱ्यावरील काही भागांवर नैसर्गिक फेस ऑईल असते आणि काहींवर नाही. हवेच्या कोरडेपणाने चेहऱ्यावरील ओलावा कमी होतो आणि त्वचेला नैसर्गिक मॉश्चरायजरची गरज असते. 

पापुद्रे निघणाऱ्या त्वचेसाठी काही टिप्स

सल्फेट फ्री असलेल्या उत्पादनांचा वापर

तुम्ही जितके जास्त केमिकल्स उत्पादनांचा वापर करा तितकी समस्या अधिक वाढेल. थंडीमध्ये सल्फेट फ्री आणि पॅराबेन फ्री माईल्ड प्रॉडक्टसचा वापर करा. असे प्रॉडक्ट्स तुम्हाला डीप मॉश्चरायजर देतील आणि ते तुमच्यासाठी चांगले असतात. 

बदाम तेल आणि व्हिटामिन ई चांगले

थंडीच्या दिवसांत तुमच्या स्किनसाठी बदाम तेल आणि व्हिटामिन ई चांगले असते. याने मसाज केल्याने स्किन रिपेअर होण्याचे काम होते तसेच सेल्स पुन्हा रिजुविनेट होतात. तुम्ही या मिश्रणाने पाच मिनिटे मसाज करा आणि स्किनमध्ये ते चांगले शोषून घेतले जाऊ द्या. त्यानंतर हवे असल्यास चेहरा धुवा. 

एक्सफोलिएशन गरजेचे

ड्राय आणि डेड स्किन चेहऱ्यावरून काढणे गरजेचे असते यासाठी तुमचा चेहरा जरूर एक्सफोलिएट करा. ही गरजेची स्टेप आहे जी इग्नोर करू नये. एक्सफोलिएशन भले तुम्ही घरात बनवलेल्या स्क्रबने करू शकता. यासाठी कोणताही माईल्ड स्क्रब वापरा. मात्र हे खूप सौम्यतेने करावे. ड्राय स्किनसाठी आठवड्यातून दोन वेळा एक्सफोलिएशन पुरेसे असते. 

मॉइस्चराइजेशन चुकवू नका

प्रत्येक वेळी केलेले मॉश्चरायझेशन तुमच्या स्किनला ड्रायनेसपासून वाचवते. यासाठी लक्षात ठेवा की वेळोवेळी चेहरा मॉश्चराईज करा. सनस्क्रीन आणि मॉश्चरायझर हे तुमच्या स्कीनचे साथीदार आहेत. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी