Skin Care Tips: सुंदर त्वचेसाठी तुमच्या आहारात करा बदल, आतापासून 'या' 6 पदार्थांचा करा समावेश

Skin Care Tips: आज आम्ही तुम्हाला सांगणार असलेलं हा डाएट फॉलो केल्यानं तुमच्या केसांचे आरोग्यही चांगले होईल.

Skin Care Tips
Glowing स्कीनसाठी करा हे डाएट  
थोडं पण कामाचं
  • प्रत्येक जण आपल्या त्वचेची काळजी घेत असतं.
  • त्वचा चमकदार होण्यासाठी या पदार्थांचा करा समावेश
  • आज आम्ही तुम्हाला तुमच्या त्वचेसाठी योग्य आहार कोणता हे सांगणार आहोत.

मुंबई: प्रत्येक जण आपल्या त्वचेची काळजी घेत असतं. त्वचा चांगली राहण्यासाठी प्रत्येक जण काळजी घेत असतं. मात्र तुमची त्वचा नेहमी चमकदार दिसावी असं तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या दैनंदिन दिनचर्येत आणि आहारात काही बदल करणं आवश्यक आहे. सर्व काही चांगल्या आहारावर अवलंबून असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला तुमच्या त्वचेसाठी योग्य आहार कोणता हे सांगणार आहोत. येथे नमूद केलेला आहारा रोज खाणं सुरू केल्यास बघा तुमच्या त्वचेला गुलाबी अशी चमक येईल.  आज आम्ही तुम्हाला सांगणार असलेलं हा डाएट फॉलो केल्यानं तुमच्या केसांचे आरोग्यही चांगले होईल. 

त्वचा चमकदार होण्यासाठी या पदार्थांचा करा समावेश

व्हिटॅमिन सी त्वचेसाठी खूप चांगलं मानलं जातं. अशा परिस्थितीत तुमच्या फळांच्या आहारात संत्र, स्ट्रॉबेरी, लिंबू, पेरू, मोसंबी आणि सफरचंद यांचा समावेश करा. त्यानंतर मग बघा तुमची त्वचा कशी चमकण्यास सुरूवात होईल.

काकडी देखील त्वचेला चमकदार बनवण्यासाठी मदत करते. त्वचेसाठी काकडी खूप उपयुक्त आहे. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी आणि के मुबलक प्रमाणात असतात, जे तुमचा चेहरा उजळण्याचे काम करतात. त्यामुळे डोळ्यांखालील काळ्या वर्तुळाच्या खुणाही निघून जातात.

तुम्ही तुमच्या जेवणाच्या ताटात दही नक्की घ्या. हे पचनासाठी चांगलं मानलं जातं. यासोबतच ते खाल्ल्याने त्वचेचा कोरडेपणाही कमी होतो. याशिवाय ग्रीन टी तुमची त्वचा निरोगी ठेवण्यासही मोठ्या प्रमाणात मदत करते.

फळांचा राजा आंबा देखील चेहरा सुधारण्यास मदत करतो. यामध्ये आढळणारे व्हिटॅमिन ए, ई आणि सी त्वचेला बरे करण्यास मदत करतात. यामुळे चेहऱ्यावरील freckles आणि fine lines ही कमी होतात.

अधिक वाचा- भीषण अपघात..! 200 मीटर दरीत कोसळली बस; 16 जणांचा मृत्यू, बसमध्ये होते शाळकरी मुलं

दुसरीकडे, गाजर तुमच्या त्वचेला सन टॅनपासून मुक्त करते. हे सूर्याच्या हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून संरक्षण करण्याचं काम करतं. त्यामुळे तुमच्या आहारातही याचा समावेश करायला विसरू नका.

बदाम त्वचेची निखारता आणि चेहरा डागरहित करण्यास मदत करतात. यामध्ये आढळणारे व्हिटॅमिन ई चेहऱ्याला तरूण ठेवण्यास मदत करते. सफरचंद त्वचेसाठीही खूप चांगले मानले जाते.

अधिक वाचा- मुंबईसह कोकणात पावसाची दमदार एन्ट्री, जाणून घ्या आजपासून कुठे आणि कधी पावसाला होणार सुरूवात 

अस्वीकरण: ही सामग्री सल्ल्यासह केवळ सामान्य माहिती प्रदान करते. हे कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय मताचा पर्याय नाही. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. टाइम्स नाऊ मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी