Skin Care Tips: काळवंडलेली पाठ स्वच्छ करण्यासाठी ट्राय करा घरगुती लेमन पॅक

तब्येत पाणी
Updated Mar 22, 2023 | 16:00 IST | टाइम्स नाऊ मराठी

Back Skin care Tips: अनेकदा असे दिसून येते की आपण आपल्या शरीराच्या पुढील भागाची चांगली काळजी घेतो, परंतु पाठ आणि मागील भागाकडे दुर्लक्ष करतो. आपल्या पाठीचा भाग हा सुर्याच्या दिशेने जास्तवेळ राहत असल्यामुळे हा भाग काळवंडण्याची आणि अस्वच्छ होण्याची शक्यता असते.

Skin Care Tips: काळवंडलेली पाठ स्वच्छ करण्यासाठी ट्राय करा घरगुती लेमन पॅक
Priyanka Chopra  |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • पाठीचा भाग सुर्याच्या दिशेने जास्तवेळ राहतो
  • मुली बॅकलेस कपडे किंवा ड्रेस घालणे टाळतात
  • पाठीची काळी त्वचा उजळता येते

Clean Back Body: अनेकदा असे दिसून येते की आपण आपल्या शरीराच्या पुढील भागाची चांगली काळजी घेतो, परंतु पाठ आणि मागील भागाकडे दुर्लक्ष करतो. आपल्या पाठीचा भाग हा सुर्याच्या दिशेने जास्तवेळ राहत असल्यामुळे हा भाग काळवंडण्याची आणि अस्वच्छ होण्याची शक्यता असते. अशा वेळी मुलींसाठी ही  मोठी समस्या शरू शकते कारण डार्क झालेल्या पाठीकडे बघता मुली बॅकलेस कपडे किंवा ड्रेस घालणे टाळतात. मात्र तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. पाठीची काळी त्वचा पूर्वीसारखी उजळ बनवता येते, त्यासाठी तुम्हाला फक्त लिंबाच्या रसात काही गोष्टी मिसळून लावाव्या लागतील आणि थोडी मेहनत घ्यावी लागेल. 

कोरफड-लिंबाचा रस 

  • एका भांड्यात दोन चमचे लिंबाचा रस पिळून घ्या. 
  • त्यात दोन चमचे कोरफडीचा रस मिसळा. जर कोरफडीचा गर ताजा असेल तर ते आणखी चांगले होईल.
  • दोन्ही गोष्टी नीट एकजीव करा पाठीवर लावा.
  • या मिश्रणाने एक-दोन मिनिटे मसाज करा आणि नंतर लूफाच्या मदतीने स्क्रब करा.
  • काही वेळानंतर कोमट पाण्याने पाठ धुवून घ्या. 

अधिक वाचा: Weight Loss Tips: सकाळी रिकाम्या पोटी प्या ओव्याचे पाणी, वाढत्या चरबीवर लागेल फुल स्टॉप

बेसन आणि लिंबचा रस

  • बेसन हे प्रत्येक घरात उपलब्ध असते. हेच बेसन तुम्हाला त्वचेचा काळेपणा घालवण्यास मदत करु शकते. 
  • एका भांड्यात एक चमचा बेसन घ्या. त्यात एका लिंबाचा रस पिळून घ्या. 
  • त्यात दोन चमचे दही आणि एक चमचा गुलाबपाणी मिक्स करून ते मिश्रण पाठीवर लावून स्क्रब करा. 
  • पाच मिनिटानंतर कोमट पाण्याने पाठ धुवून घ्या.

मसूरच्या डाळीची पावडर 

  • बाजारात मसूरच्या डाळीची पावडर मिळते. पण तुम्ही मसूर बारीक करून पावडर घरीही तयार करू शकता. 
  • एका भांड्यात तीन चमचे मसूर डाळ पावडर घाला. 
  • त्यात दोन चमचे लिंबाचा रस घाला. 
  • एक चमचा कोरफड आणि दही घाला. 
  • सर्व मिश्रण एकत्र केल्यानंतर पाठीवर लावा आणि थोडासा स्क्रब करा. 
  • डाळीचा पॅक चांगला सुखेपर्यंत पाठीवर ठेवा. 
  • त्यानंतर कोमट पाण्याने धुवून टाका.

अधिक वाचा: Tips for Thick & long Hair: घनदाट अन् लांब केस हवे तर करा 'हे' काम; मग सगळेच विचारतील लंबे बालो राज

तांदळाचा पॅक पाठीवर लावा 

  • एका भांड्यात तीन चमचे तांदळाचे पीठ घ्या. 
  • त्यात दोन चमचे साधे दही घाला. 
  • एका लिंबाचा रस टाका आणि चांगले मिसळा. 
  • हा पॅक पाठीवर लावा आणि 10 मिनिटे राहू द्या. 
  • धुताना ओल्या हातांनी पाठ स्क्रब करा आणि नंतर संपूर्ण पाठ पाण्याने धुवा.

काय काळजी घ्याल?

  • लिंबामुळे पाठीच्या त्वचेवर जळजळ होऊ शकते. जळजळ खूप जास्त वाटत असेल आणि इनफेक्शन होत असेल तर लगेच पाठ धुवा. 
  • त्वचेचे टॅनिंग खूप खोलवर असल्यास, त्यावर स्वतः उपचार करण्याऐवजी तज्ञाचा सल्ला घ्या. 
  • कोणत्याही घरगुती उपायामुळे तुम्हाला त्वचेवर काही समस्या जाणवत असतील, तर त्याचा वापर ताबडतोब बंद करा. 
  • हे पॅक संपूर्ण पाठीवर लावण्यापूर्वी आधी पॅच टेस्ट करा. 
  • पाठीवर काळेपणा किंवा काळे ठिपके या गोष्टी एखाद्या वैद्यकीय कारणांमुळेही असू शकतात, म्हणून डॉक्टरांता सल्ला घ्या.

अधिक वाचा: Health Tips : दातांच्या आरोग्यासाठी उत्तम आहेत या पाच गोष्टी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी