Skin Care: Skin उजळण्यासाठी दही फायदेशीर, अशा प्रकारे करा चेहऱ्याचा मसाज; 'या' समस्याही होतील दूर

तब्येत पाणी
Pooja Vichare
Updated Aug 09, 2022 | 16:42 IST

Curd For Glowing Skin: काही लोकं बाहेर उपलब्ध होणाऱ्या प्रोडक्ट्सवर जास्त विश्वास ठेवतात. तर काही जण घरगुती करण्यात येणाऱ्या उपायांवर जास्त विश्वास ठेवतात. काही जण घरगुती उपायांनी आपली त्वचा सुधारवण्यासाठी प्रयत्न करतात.

Curd For Instant Glow
Skin उजळण्यासाठी दही फायदेशीर 
थोडं पण कामाचं
 • सामान्य माणूस असो की सेलिब्रिटी, प्रत्येकजण आपल्या त्वचेच्या निगा राखण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतात.
 • काही लोकं बाहेर उपलब्ध होणाऱ्या प्रोडक्ट्सवर जास्त विश्वास ठेवतात. तर काही जण घरगुती करण्यात येणाऱ्या उपायांवर जास्त विश्वास ठेवतात.
 • काही जण घरगुती उपायांनी आपली त्वचा सुधारवण्यासाठी प्रयत्न करतात.

मुंबई: Curd For Instant Glow: सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत अनेकांना त्वचेची (skin) काळजी घेता येणं शक्य होत नाही. त्यातच महिलांना पार्लरला ही जाणं शक्य होत नसतं.  प्रत्येकाच्या दिनचर्येत त्वचेची काळजी ही खूप महत्त्वाची भूमिका बजावत असते. सामान्य माणूस असो की सेलिब्रिटी, प्रत्येकजण आपल्या त्वचेच्या निगा राखण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतात. काही लोकं बाहेर उपलब्ध होणाऱ्या प्रोडक्ट्सवर जास्त विश्वास ठेवतात. तर काही जण घरगुती करण्यात येणाऱ्या उपायांवर जास्त विश्वास ठेवतात. काही जण घरगुती उपायांनी आपली त्वचा सुधारवण्यासाठी प्रयत्न करतात. 

अशा वेळी जर आपण घरगुती उपायांबद्दल बोललो, तर अशी कोणती गोष्ट आहे जी सहज उपलब्ध होऊ शकते, जी तुमच्या चेहऱ्यावर अप्रतिम ग्लो चमक आणू शकते. घरगुती सहज उपलब्ध होणारी गोष्ट म्हणजे दही.. (curd)  दही प्रत्येकाच्या घरी उपलब्ध असते. दह्यांनी तुम्ही तुमची त्वचा पार्लरसारखी चमकवू शकता. 

अधिक वाचा-  ​महागड्या केराटिन ट्रीटमेंटचे 'हे' आहेत साइड इफेक्ट्स

दही हा असाच एक घटक आहे जो तुमच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे आणि प्रत्येक घरात उपलब्ध असतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की दह्याने चेहऱ्याची मसाज केल्याने त्वचेशी संबंधित अनेक आजारांपासून तुमची सुटका होईल. याशिवाय दह्यापासून झटपट चेहऱ्यावर चमक येते. 

त्वचेवर दही लावल्यास होणारे फायदे 

 • मॉइश्चरायझिंग
 • पुरळ प्रतिबंधित
 • सनबर्न कमी होते
 • डार्क सर्कल कमी होते
 • एंटी एजिंग 

अशा प्रकारे फेसपॅकसाठी वापरा दही 

 • एका भांड्यात दोन चमचे दही, एक चमचा एलोवेरा जेल आणि दोन चमचे मुलतानी माती एकत्र करून पेस्टप्रमाणे तयार करा.
 • आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि काही वेळ तशीच राहू द्या.
 • 15 ते 20 मिनिटे राहिल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा आणि त्यानंतर गुलाबजल लावा.

दह्यानं असा करा मसाज 

 • रोज थोडे दही घेऊन चेहऱ्यावर हलक्या हातांनी मसाज करा. कोरडे झाल्यानंतर चेहरा धुवा. असे नियमित केल्याने त्वचा चमकदार होते.
 •  चेहऱ्याच्या मसाजसाठी 1 टेबलस्पून दही, 1 टेबलस्पून फ्रेश एलोवेरा जेल आणि थोडी हळद मिक्स करा. यानंतर, हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि सुमारे 10 मिनिटे मसाज करा. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.
 •  दही हे असे नैसर्गिक उत्पादन आहे ज्यामध्ये हळद किंवा मधाने चेहऱ्याला मसाज केल्याने चेहऱ्यावर झटपट चमक येते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी