मुंबई : देशातील अनेक नागरिकांना सकाळचा नाष्टा(breakfast)करू वाटत नाही. परंतु नाष्टा न केल्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण दिलं जातं. एका संशोधनानुसार, केवळ 3 टक्के भारतीयांना नाष्टा गरजेचा वाटतो. भारतात 3 पैकी 1 व्यक्ती सकाळचा नाष्टा टाळत असतो. परंतु सकाळचा नाष्टा टाळल्याने अनेक आजार लागण्याची शक्यता असल्याचं डॉक्टर (Doctor) सांगतात. उच्च रक्तदाब आणि ह्रदयरोगाचा धोका वाढतो. नाष्टा टाळल्याने तणाव वाढतो आणि याचा थेट परिणाम मेंदूवर होतो. (Skipping breakfast is an invitation to heart disease, diabetes, migraines)
अधिक वाचा : हिवाळ्यात कोरड्या केसांसाठी हे तेल आहेत बेस्ट
अनेकांना वाटते की नाष्टा कमी केल्याने किंवा टाळल्याने वजन कमी होईल. मात्र जास्त वेळ रिकाम्या पोटी राहिल्यानंतर जेव्हा आपण जेवतो तेव्हा ओव्हरईटिंगची शक्यता वाढते. ज्यामुळे वजन वाढू लागते. डिनरनंतर जर दुसऱ्या दिवशी थेट लंच करत असाल तर रिकाम्या पोटी राहिल्याने अॅसिडिटी, पोटदुखी, कमी रक्तदाबाची समस्या येऊ शकते.
अधिक वाचा : या घरगुती उपायांमुळे Kidney Stone चं होईल पाणी
अशात खूप जास्त भूक लागल्यावर जंक फूड, गोड किंवा काहीही खाल्ल्यास, त्याचा थेट परिणाम वजनावर होतो. रात्री उशीरा जेवल्याने किंवा दीर्घकाळ उपाशी राहिल्याने पचनक्रिया मंदावते. यामुळे गॅस, अॅसिडिटी आणि वजन वाढण्यासारख्या समस्या होण्याची शक्यता राहते.
नाष्टा टाळण्याची सवय असेल तर तुम्हाला डायबिटिज होऊ शकतो. दीर्घ काळ सकाळी नीट न जेवल्याने टाईप 2 डायबिटिज होण्याची शक्यता असते. याशिवाय नाष्टा न केल्याने मायग्रेन होऊ शकते. उच्च रक्तदाबाचीही शक्यता असते.
अधिक वाचा : हे 7 पेय वाढवतील हिमोग्लोबिन
नाष्टा करत नसल्यास शरीर हळूहळू कमजोर होऊ लागते. नाष्टा न केल्याने चयापचय क्रिया मंदावते. उपाशी राहिल्याने शरीराची कॅलरी जाळण्याची क्षमता हळू हळू कमी व्हायला लागते. यामुळेही नाष्टा टाळणाऱ्यांचे वजन सहज आणि लवकर वाढते. पचनक्रिया मंदावल्याचा थेट परिणाम त्वचा आणि केसांवर होतो.
भारतातील शहरांनुसार नाष्ट्याची आवड बदलत जाते. दिल्लीत 43 टक्के लोकांना पराठ्याचा नाष्टा हेल्दी वाटतो. मुंबईतील अनेकांना दूध आणि ब्रेड, चेन्नईत 47 टक्के लोकांना इडली आणि 51 टक्के लोकांना डोसा आवडतो तर कोलकात्यातील 34 टक्के लोक दूध आणि अंडी हा चांगला नाष्ट मानत असतात. दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनुसार, हंगामी फळे, डाळ, ओटस, भाज्या, कडधान्ये, दही आणि फळांचा रस सर्वाधिक हेल्दी मानले जाते.