Sleep after eating:झोप पूर्ण झाली पण जेवल्यानंतर लगेच येते डुलकी? या कारणामुळे घडतं हे सगळं

अनेकदा आपली झोप (Sleep)पूर्ण झाली तरी आपल्याला दिवसात अनेकदा झोप लागत राहते. जास्त झोप लागत असल्याने अनेकजण चिंतेत असतात. झोप येत असल्याने कामं पूर्ण होत नसतात.  आठ तासाची झोप झाल्यानंतरही झोप लागण्यामागे काही कारणे आहेत, ते या लेखातून आपण जाणून घेणार आहोत. 

leep is complete but you fall asleep immediately after eating?
झोप पूर्ण झाली पण जेवल्यानंतर लगेच येते डुलकी?   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • रात्री जेवल्यानंतर शतपावली झाल्याशिवाय आपण झोप नये.
  • तुम्ही जेवण झाल्यानंतर झोपत असाल तर तुम्हाला या आजारांचा धोका उद्भवू शकतो.
  • रात्री झोपायच्या पुर्वी निदान 3 तास आधी जेवावे आणि दुपारी जेवल्यानंतर निदान अर्ध्या तासानं झोपावे.

Sleeping after Eating: अनेकदा आपली झोप (Sleep)पूर्ण झाली तरी आपल्याला दिवसात अनेकदा झोप लागत राहते. जास्त झोप लागत असल्याने अनेकजण चिंतेत असतात. झोप येत असल्याने कामं पूर्ण होत नसतात.  आठ तासाची झोप झाल्यानंतरही झोप लागण्यामागे काही कारणे आहेत, ते या लेखातून आपण जाणून घेणार आहोत. 

अधिक वाचा  : हाडे मजबूत करण्यासाठी आहारात समाविष्ट करा या गोष्टी

झोप येण्यामागील यामागील कारण आपल्या पटकन लक्षात येत नाही. परंतु जर का तुम्हाला जेवणानंतरही झोप लागत असेल तर तुम्हाला दुर्लेक्ष करू चालणार नाही. अशावेळी आपले शरीर अनेक संकेत देत असतात. त्यामुळे जर का तुम्हाला जेवणानंतर लगेचच झोपण्याची सवय असेल तर तुम्ही त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जर का तुम्ही जेवण झाल्यानंतर झोपत असाल तर तुम्हाला या आजारांचा धोका उद्भवू शकतो. 

अधिक वाचा  : अडुळशाच्या पानांचे सेवन करण्याचे हे आहेत फायदे

आपल्या जेवणाच्या आणि झोपायाच्या क्रियेत थोडा कालावधी जाणं आवश्यक आहे. त्यामुळे आपल्यालाही त्याप्रकारे जेवल्यानंतर काही वेळानं झोपणं आवश्यक आहे. अनेकांना जेवण होताच बरोबर झोपायची सवय असते. ही सवय आरोग्यासाठी घातक आहे. त्याचा गंभीर परिणाम तुमच्यावर होऊ शकतो. रात्री जेवल्यानंतर   शतपावली झाल्याशिवाय आपण झोप नये. 

अधिक वाचा  : ऑफिसमधील सहकाऱ्यासह प्रेम जुळणं आहे धोक्याचं

रात्रभर आपली पाचनसंस्था चांगली कार्यरत राहण्यासाठी रात्री जेवल्यानंतर काही पथ्यं ही पाळावीत. त्याप्रमाणे दिवसभर तुम्ही काहीही खाल्लेत तरी लगेचच झोपण्याची सवय लावून घेऊ नका. रात्री झोपायच्या पुर्वी निदान 3 तास आधी जेवावे आणि दुपारी जेवल्यानंतर निदान अर्ध्या तासानं झोपावे. 

काय होतो परिणाम 

वजन वाढते 

जेवण झाल्यावर लगेचच झोपलात तर तुमच्या वजनात वाढ होऊ शकते. अनेकदा दुपारी जेवण झाल्यावर बऱ्याच जणांना झोप लागते परंतु त्यानंतर थोडंस चाला, अन्न नीट पचू द्या मग स्वस्थपणे झोपायचा विचार करू शकता.  जर आपण जेवल्यानंतर लगेच झोपलात तर, कॅलरीज योग्य पद्धतीने बर्न होत नाहीत. त्यामुळे वजन वाढण्यास मदत होते. आपण जेवढे खातो त्यापेक्षा जास्त शरीरातील कॅलरीज बर्न करणे गरजेचे असते.

अधिक वाचा  :लग्न करं असं का म्हणतात घरचे लोक; वाचा पालकांची कारणं

छातीत जळजळ होते 

जेवल्यानंतर लगेचच झोपलात तर तुमच्या छातीत जळजळ होऊ शकते. एसिडिटी वाढू शकते. त्याचबरोबर पोटाचे विकारही उद्भवू  शकतात.  जेवल्यानंतर तातडीने झोपल्यास पित्ताचा त्रास होण्याची शक्यताही आहे. कारण तातडीने झोपल्यास पचनप्रक्रियेत अडथळे निर्माण होतात आणि परिणामी पित्त वाढते.

पचनसंस्थेवर परिणाम 

अनेकदा लोकं जेवल्यावर लगेचच पोटावर झोपात. ही तर अत्यंत चुकीची पद्धत आहे. जेवल्यानंतर पोटावरही झोपू नका. जेवल्यानंतर लगेचच झोपलात तर तुम्हाला गॅस आणि एसिडिटीसारखे आजार होऊ शकतात ज्याचा परिणाम तुमच्या पोटावर होईल आणि परिणामी पचनसंस्थेवर होईल. असं केल्यानं मधूमेहाचाही धोका वाढू शकता.

अधिक वाचा  : 12 वी आर्टमध्ये केली, आता पुढे काय करायचं प्रश्न पडलाय

मधुमेहाच्या रुग्णांसाठी धोकादायक 

 अन्न खाल्ल्यानंतर शरीरातील साखरेची पातळी वाढते. त्यामुळे साखर रक्तात विरघळू लागते. त्यामुळेच अन्न लवकर पचण्यासाठी मधुमेहाच्या रुग्णांना अन्न खाल्ल्यानंतर फेरफटका मारण्याचा सल्ला दिला जातो.

काय आहेत कारणं? 

यामागे प्रोटीनच्या जेवणात ट्रिप्टौफॅन असते, ज्यामुळे झोप येऊ शकते. जेवणानंतर इन्सुलिनची मात्रा वाढली तर त्याचा परिणाम तुमच्या झोपवर होतो. यामध्ये हॉर्मोन्सही महत्त्वाची भुमिका बजावतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी