How To Get Up Early And Feel Energetic: जेव्हा सकाळी अलार्म वाजतो तेव्हा तुम्ही तो बंद करुन परत झोपता. कधी कधी असं होतं की रात्रभर झोप असूनही सकाळी ताजंतवानं वाटत नाही आणि जरी जाग आली तरी मागच्या दिवसाचा थकवा जात नाही. तेव्हा असे वाटते की, आपल्या हाता-पायांमध्ये ताकदच नाहीये. या परिस्थितीला तुमचं रुटीन जबाबदार आहे. जर तुम्हाला सकाळी जाग आल्यावर ताजंतवानं आणि उर्जावान वाटायचे असेल तर तुम्हाला सर्वप्रथम रुटीन सुधारावं लागेल.
तुम्ही घड्याळ बघून झोपत असाल किंवा उठत असाल, पण या संपूर्ण प्रक्रियेत बॉडी क्लॉकची काळजी घेणंही खूप गरजेचं आहे. तुमच्या रोजच्या झोपेच्या वेळेपेक्षा अर्धा तास जास्त किंवा कमी असणे ठीक आहे. पण रोजची वेळ बदलत राहते त्यामुळे तुम्हाला सकाळी उत्साही वाटत नाही.
अधिक वाचा :वारंवार जांभई येते, मग हे असू शकतात मोठ्या आजारांचे संकेत
झोपायच्या आधी अशी कामं करा ज्याने तुम्हाला आनंद मिळतो. एखादं पुस्तक वाचा ते वाचता वाचता झोपा आणि जर गाणी आवडत असतील तर ती ऐकत झोपा.
अधिक वाचा :गरोदरपणात चांगली झोप येण्यासाठी खास टिप्स
रात्री झोपताना आपल्या शरीरातील सेल्स रिज्यूविनेट होतात. रात्री झोपताना चेहरा, हात-पाय स्वच्छ धुवा आणि मग झोपा. जेणेकरून तुमची त्वचाही रिलॅक्स होऊ शकते आणि तुम्हाला सकाळी फ्रेश वाटू शकते.
झोपताना लक्षात ठेवा की, तुमच्या खोलीचे तापमान जास्त थंड किंवा जास्त गरम नसावे. तुम्ही एसी किंवा हीटर चालवत असाल तर दोन्हीही मध्यम तापमानात ठेवा.