प्रत्येकजण हा वेगवेगळ्या पद्धतीने झोपत असतो. मात्र, आपल्या झोपण्याच्या पद्धतीमुळे भविष्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घेऊयात याच संदर्भात अधिक माहिती...
अनेकांना पोटावर झोपण्याची सवय असते. काही लोकांना या पोझिशनमध्ये चांगली झोप लागते. पण ही झोपण्याची पद्धत योग्य की अयोग्य याचा तुम्ही विचार केला आहे का? पोटावर झोपण्याच्या सवयीमुळे शरीराच्या सर्व अवयवांवर विशेषत: पचनसंस्थेवर दबाव निर्माण होतो. यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. याशिवाय पोटावर झोपल्याने काही मोठे नुकसान होऊ शकतात.
हे पण वाचा : गर्भनिरोधक गोळ्या घेण्याची योग्य पद्धत माहितीये का?
पोटावर झोपण्याच्या संदर्भात युक्तीवाद असा आहे की, पोटावर झोपल्याने तुमचं घोरणं बंद होतं. कारण झोपेच्या वेळीही ते तुमचे वायुमार्ग खुले ठेवतात. अशाप्रकारे ही आपल्या फुफ्फुसासाठी एक आरामदायक स्थिती आहे. पण शरीराच्या इतर भागांना यामुळे नुकसान होऊ शकते. जाणून घ्या कोणते आहेत ते तोटे...
हे पण वाचा : कमी झोपणाऱ्यांनो सावधान..., आरोग्याला होऊ शकते मोठे नुकसान
जेव्हा पोटावर झोपता तेव्हा तुमच्या पचनसंस्थेवर परिणाम होतो.
तुमच्या पोटातील पित्त आणि पीएच यावर परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे गॅस आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
पोटावर झोपल्याने स्नायूंच्या समस्या उद्भवू शकतात.
पोटावर झोपल्याने तुमच्या स्नायूंवर ताण येतो ज्यामुळे चेहरा निस्तेज होऊ शकतो. सुरकुत्या पडू शकतात.
हे पण वाचा : अंड्यासोबत हे पदार्थ खाणे टाळा अन्यथा होईल घोटाळा
झोपण्याची सर्वोत्तम पद्धत म्हणजे डाव्या किंवा उजव्या कुशीवर झोपणे. या पोझिशनमध्ये तुमच्या झोपणे हे फायदेशीर मानले जाते. पाठदुखी आणि इतर समस्यांपासून यामुळे आराम मिळू शकतो. तसेच पोटाच्या संदर्भातील समस्या सुद्धा दूर होण्यास मदत मिळते.
(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ला म्हणून घेऊ नका. या संदर्भात आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)