Health Tips: या दिशेला डोके करून झोपल्याने होऊ शकतो मानसिक आजार, जाणून घ्या झोपण्याची योग्य दिशा

तब्येत पाणी
Updated Apr 28, 2022 | 11:20 IST | टाइम्स नाऊ मराठी

Best sleeping position in Marathi | आरोग्यासाठी झोप खूप महत्त्वाची आहे. हे केवळ तुमच्या मानसिक आरोग्यासाठीच नाही तर तुमच्या शारीरिक आरोग्यासाठीही महत्त्वाचे आहे. खरं तर पुरेशी झोप न घेतल्याने ताण येतो ज्यामुळे वजन वाढचे आणि हृदयाच्या संबंधित आजार होतात.

Sleeping with your head in this direction can cause mental illness
या दिशेला डोके करून झोपल्याने होऊ शकतो मानसिक आजार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आरोग्यासाठी झोप खूप महत्त्वाची आहे.
  • पश्चिम दिशेला डोके ठेवून झोपल्याने हळूहळू मानसिक त्रास जाणवू शकतो.
  • दक्षिण दिशेला झोपणे ही गाढ, चांगल्या झोपेची दिशा मानली जाते.

Best sleeping position in Marathi | मुंबई : आरोग्यासाठी झोप खूप महत्त्वाची आहे. हे केवळ तुमच्या मानसिक आरोग्यासाठीच नाही तर तुमच्या शारीरिक आरोग्यासाठीही महत्त्वाचे आहे. खरं तर पुरेशी झोप न घेतल्याने ताण येतो ज्यामुळे वजन वाढते आणि हृदयाच्या संबंधित आजार होतात. याशिवाय हे तुम्हाला मानसिकदृष्ट्या देखील कमजोर बनवते. पण जर तुम्ही पुरेशी झोप घेत असाल पण नीट आणि योग्य दिशेने झोपत नसाल तर ते तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. प्राचीन आयुर्वेदिक पद्धतीनुसार, विशिष्ट दिशांना झोपल्याने तुम्ही आजारी पडू शकता. तसेच काही दिशांना डोके ठेवून झोपणे देखील तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते. (Sleeping with your head in this direction can cause mental illness). 

अधिक वाचा : पोलिसांकडून 'या' अटी-शर्तींसह राज ठाकरेंच्या सभेला परवानगी

पूर्वेकडे डोके करून झोपल्याने स्मरणशक्ती सुधारते

पूर्व ही झोपण्यासाठीची सर्वात आवडती दिशा आहे, खासकरून तुम्ही तुमच्या मेंदूचा वापर शिकण्यासाठी वापरत असाल तेव्हा. खर म्हणजे आयुर्वेदानुसार स्मरणशक्ती योग्य ठेवण्यासाठी आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी पूर्व दिशेला डोके ठेवूण झोपणे खूप फायदेशीर आहे. कारण हे तुमच्या रक्ताभिसरणातही मदत करते, एकाग्रता सुधारते आणि तुम्हाला चांगली झोप घेण्यास मदत करते. याशिवाय ते तुमच्या चांगल्या आरोग्यास प्रोत्साहन देते असे म्हटले जाते. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी पूर्व दिशेला डोके ठेवून झोपावे. 

 पश्चिम दिशेला डोके करून झोपल्याने मानसिकदृष्ट्या अस्वस्थता होते 

पश्चिम दिशेला डोके ठेवून झोपल्याने हळूहळू मानसिक त्रास जाणवू शकतो. वास्तुशास्त्र सांगते की ही प्रयत्नांची दिशा आहे जी तुम्हाला अस्वस्थ करणारी स्वप्ने पाहण्यास भाग पाडू शकते आणि रात्री शांत झोप घेण्यास त्रास देऊ शकते. याशिवाय कधी-कधी या दिशेला झोपल्यानेही तणाव वाढतो. त्यामुळे या दिशेला डोके ठेवून झोपू नये.

उत्तर दिशेला डोके करून झोपू नये

जर कोणी उत्तरेकडे डोके ठेवून झोपत असेल तर ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. असे लोक शांतपणे झोपू शकत नाहीत. अशा स्थितीत तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते आणि तुम्ही रात्रभर बेशुद्ध स्थितीत असल्यासारखे वाटू शकते. हे चुंबकत्व आयुर्वेदिकदृष्ट्या, रक्ताभिसरण वाढवते, तणाव निर्माण करते आणि मनात अस्वस्थता निर्माण करते.

निरोगी राहण्यासाठी दक्षिणेकडे डोके ठेवून झोपा

दक्षिण दिशेला झोपणे ही गाढ, चांगल्या झोपेची दिशा मानली जाते. वास्तविक दक्षिण दिशा नकारात्मक चार्जची आहे आणि तुमचे डोके सकारात्मक चार्ज आहे. त्यामुळे तुमचे डोके आणि दिशा यांच्यामध्ये एक सुसंवादी आकर्षण आहे. अशा स्थितीत उत्तर दिशेला डोके ठेवून झोपल्यास ही ऊर्जा बाहेर काढण्याऐवजी शरीरात आरोग्य, सुख आणि समृद्धीसाठी वापरली जाते. याचा अर्थ असा की जर तुम्हाला निरोगी आणि मानसिकदृष्ट्या आनंदी राहायचे असेल तर दक्षिणेकडे डोके ठेवून झोपा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी