Sleeplessness 'या' व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे येत नाही झोप

झोप न येण्याचे कारण व्हिटॅमिन्सची कमतरता हे असू शकते. चला तर मग, जाणून घेऊ कोणत्या व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे येत नाही झोप आणि काय खाल्ल्यास या समस्येला सोडवणे शक्य आहे.

Sleeplessness due to vitamin deficiency
व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे येत नाही झोप 
थोडं पण कामाचं
  • व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे येत नाही झोप
  • व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे येत नाही झोप
  • व्हिटॅमिन 'बी ६'च्या कमतरतेमुळे गाढ झोप लागत नाही

Sleeplessness due to vitamin deficiency नवी दिल्ली: झोप कमी येणे अथवा झोप न येणे यामुळे शरीराचे गंभीर स्वरुपाचे नुकसान होऊ शकते. या समस्येलाच इंसोम्निया म्हणतात. झोप न येण्याचे कारण व्हिटॅमिन्सची कमतरता हे असू शकते. चला तर मग, जाणून घेऊ कोणत्या व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे येत नाही झोप...

व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे येत नाही झोप

शरीराला व्हिटॅमिन डी ची कमतरता जाणवू लागली की, शरीर थकते. मानसिक थकवा येतो. व्हिटॅमिन डी ची कमतरता झोप कमी येणे अथवा झोप न येणे, इंसोम्निया या समस्येचे प्रमुख कारण असू शकते. या समस्येवर उपाय म्हणून दररोज सकाळी कोवळ्या उन्हात तसेच संध्याकाळी उन्ह उतरत असताना बाहेर फिरायला जावे. बाहेर फिरायला जाण्याच्या निमित्ताने 'उन खाणे' या सोप्या आणि नैसर्गिक पद्धतीने व्हिटॅमिन डी मिळवता येते. तसेच व्हिटॅमिन डी असलेले पदार्थ पुरेश्या प्रमाणात खाल्ल्यास शरीरातील व्हिटॅमिन डी ची कमतरता दूर होऊ शकते. यामुळे झोपेची, इंसोम्नियाची समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते. 

मासे, कॉडलिव्हर ऑइल, अंड्याचा पिवळा भाग, मशरूम, गायीचे दूध, सोया मिल्क, (सोयाबीनचे दूध), संत्र, ओट्स या पदार्थांच्या सेवनातून शरीरातील व्हिटॅमिन डी ची कमतरता दूर होऊ शकते. यामुळे झोपेची, इंसोम्नियाची समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते. 

मेंदूत मेलाटोनिन आणि सेरोटोनिन पुरेश्या प्रमाणात असल्यास गाढ झोप लागते. पण व्हिटॅमिन 'बी ६'च्या कमतरतेमुळे गाढ झोप लागत नाही, यावर उपाय म्हणून चिकन, शेंगदाणे, सोयाबीन, ओट्स, केळे, दूध या पदार्थांचे सेवन करावे. यामुळेही झोपेची, इंसोम्नियाची समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी