home remedies for smelly feet problem : पायांची दुर्गंधी कमी करण्याचे चार सोपे घरगुती उपाय

smelly feet problem home remedies for stinking feet in marathi : जाणून घ्या पायांची दुर्गंधी कमी करण्याचे चार सोपे घरगुती उपाय...

smelly feet problem home remedies for stinking feet in marathi
पायांची दुर्गंधी कमी करण्याचे चार सोपे घरगुती उपाय  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • पायांची दुर्गंधी कमी करण्याचे चार सोपे घरगुती उपाय
  • पायांची दुर्गंधी घरगुती उपयांनी कमी करणे सहज शक्य
  • प्रयोग करण्याआधी वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे

smelly feet problem home remedies for stinking feet in marathi : ज्यांच्या पायांना खूप घाम येतो अशांना मोजे घातल्यावर थोड्या वेळयाने पायांना दुर्गंधी येऊ लागते. अगदी बुटातून पाय बाहेर काढले तरी पायांना दुर्गंधी येते. या वासाने संबंधित व्यक्तीला चारचौघांत वावरताना ओशाळल्यासारखे वाटते. पायांची ही दुर्गंधी घरगुती उपयांनी कमी करणे सहज शक्य आहे. जाणून घ्या पायांची दुर्गंधी कमी करण्याचे चार सोपे घरगुती उपाय...

आरोग्य - वेबस्टोरी । तब्येत पाणी

  1. पाय धुणे : बाहेरून आल्यावर पाय पाण्याने स्वच्छ धुवा, पायांचे तळवे व्यवस्थित घासून धुवा. शक्य असल्यास साबणाने पाय धुवा. पायांची दुर्गंधी कमी होईल.
  2. मिठाचे पाणी : एक मोठी बादली किंवा एक छोटा टब कोमट पाण्यात दोन-तीन चमचे मिठ घालून ते ढवळा. या मिठाच्या पाण्यात पाय दहा ते पंधरा मिनिटे ठेवा. नंतर पाय साध्या पाण्याने धुवा. पायांची दुर्गंधी कमी होईल आणि पायांना एखादा संसर्ग झाला असल्यास त्यातून बरे होण्यास मदत होईल.
  3. चहाचे पाणी : एक ग्लास पाण्यात दोन टी बॅग टाका. हे पाणी उकळवून घ्या. नंतर पाणी थंड करा. या पाण्याला एक बादली पाण्यात मिसळा. आता त्या बादलीतील पाण्यात पाय दहा ते पंधरा मिनिटे ठेवा. नंतर पाय साध्या पाण्याने धुवा. पायांची दुर्गंधी कमी होईल.
  4. व्हिनेगरचे पाणी : एक बादली पाण्यात दोन ते तीन चमचे व्हिनेगर टाकून ढवळा. या बादलीतील पाण्यात पाय दहा ते पंधरा मिनिटे ठेवा. नंतर पाय साध्या पाण्याने धुवा. पायांची दुर्गंधी कमी होईल आणि पायांना एखादा संसर्ग झाला असल्यास त्यातून बरे होण्यास मदत होईल.

डिस्क्लेमर / Disclaimer : मजकूर संकलित माहितीच्याआधारे तयार केला आहे. प्रयोग करण्याआधी वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी