Soaked dates: ओल्या खजूरामध्ये लपलंय लैंगिक शक्तीचं रहस्य, 'या' घातक आजारापासूनही मिळेल सुटका

Dates benefits: खजूरात असलेल्या कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कार्बोहायड्रेट, फायबर, प्रथिने, जीवनसत्त्वे याच्यासोबतच इतरही अनेक पोषक घटक असतात. हे घटक शरीरासाठी खूप पोषक असतात.

Representative Image
Soaked dates: ओल्या खजूरामध्ये लपलंय लैंगिक शक्तीचं रहस्य, 'या' घातक आजारापासूनही मिळेल सुटका (Representative Image, Photo: Pexels) 

Eating dates health benefits for men: खजूर आपल्यापैकी अनेकजण हे खातात. पोषक तत्वांनी भरलेले खजूर हे काही आजारांपासूनही सुटका मिळवून देतात. खजूरात असलेल्या घटकांमुळे पचनसंस्थेच्या संबंधित आजार, समस्या दूर होतात. खजूर हे ह्रदयासाठी सुद्धा फायदेशीर असते. खजूर खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. (soaked dates health benefits raise sexual power khajoor khanyache fayade read in marathi)

खजूर खाण्याचे अनेक आरोग्यदायक फायदे आहेत. यामुळे तुम्ही दररोज खूपच अ‍ॅक्टिव्ह राहतात. याचे फायदे लक्षात घेता तुम्हाला एकप्रकारचा आरोग्याचा खजिनाच मिळाला असं म्हणता येईल. खजूरात असलेल्या कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कार्बोहायड्रेट, फायबर, प्रथिने, जीवनसत्त्वे याच्यासोबतच इतरही अनेक पोषक घटक आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. खजूरात असलेले आयर्न शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवण्यास मदत करते.

हे पण वाचा : दही खाण्याची योग्य वेळ कोणती?

असे खा खजूर, लैंगिक समस्या होईल दूर

आपल्या दैनंदिन जीवनात खराब खाण्याच्या सवयी आणि वाईट लाईफस्टाईल यामुळे पुरुषांमध्ये अनेक लैंगिक समस्या दिसून येत आहेत. अनेकांना वैवाहिक जीवनात काही समस्यांचा सामना करावा लागतो. खजूर खाल्ल्याने तुम्हाला या समस्या दूर करता येऊ शकतात. दररोज दुधात भिजवलेले 4 खजूर खाल्ल्याने शरीरातील ताकद वाढते आणि शुक्राणूंची संख्याही वाढण्यास मदत होते.

हे पण वाचा : नववर्षात शनीदेव बनवणार शश राजयोग, या राशीच्या व्यक्तींचं नशीब फळफळणार

आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, जी व्यक्ती दररोज सकाळी रिकाम्या पोटी 4 खजूर दूधात मिसळून खातो त्या व्यक्तीला आरोग्य आणि पचनक्रियेच्या संबंधित कोणतीही कोणतीही समस्या उद्भवत नाही. यासोबतच अपचन, पोटदुखी, गॅस आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या दूर होऊ शकतात. कोणलाही पोटाच्या समस्या जाणवत असतील त्यांनी दररोज 2 ते 3 भिजवलेले खजूर खावे.

हे पण वाचा : Vastu Tips: संध्याकाळी चुकूनही करू नका ही कामे

खजूर हे शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास मदत करते. जर तुम्ही दररोज 4 खजूर दुधात भिजवून खाल तर तुमच्या शरीराचे वजन वेगाने वाढते. खजूर दररोज खाल्ल्याने मूळव्याधाची समस्या सुद्धा दूर होण्यास मदत होते. खजूरामुळे मनाचे आरोग्य चांगले राहते आणि तणाव दूर होतो.

(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. या संदर्भात आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या आणि मगच आपल्या आहारात योग्य ते बदल करा. टाइम्स नाऊ मराठी या वृत्ताला दुजोरा देत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी