Bicornuate Uterus काही स्त्रियांचे गर्भाशय असते हृदयाच्या आकाराचे, गर्भधारणेत येऊ शकतात समस्या

तब्येत पाणी
Updated Apr 04, 2023 | 05:36 IST | टाइम्स नाऊ मराठी

काही मुली जन्मतःच बायकॉर्न्यूएट गर्भाशय घेऊन जन्माला येतात. ही स्थिति जन्मजात असते. या स्थितीला गर्भाशयाची विकृती असे देखील संबोधले जाते. या स्थितीबद्दल आणि लक्षणबद्दल जाणून घेऊयात.

बायकोर्न्युएट गर्भाशयाची समस्या खूप सामान्य जरी असली तरी त्याला दुर्मिळ मानले जाते.
5% पेक्षा कमी मुली जमतः असे गर्भाशय घेऊन जन्माला येतात.  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बायकोर्न्युएट गर्भाशयाची समस्या खूप सामान्य जरी असली तरी त्याला दुर्मिळ मानले जाते.
  • दोन शिंग असलेले गर्भाशय घेऊन जन्मलेल्या स्त्रियांमध्ये काही सामान्य लक्षणे आढळून येतात.
  • 5% पेक्षा कमी मुली जमतः असे गर्भाशय घेऊन जन्माला येतात. अशा मुली गर्भवती होऊ शकतात!

Bicornuate uterus (BU) ही एक मुलींमध्ये आढळणारी गर्भाशय संबंधीत समस्या आहे. ही जन्मजात समस्या असून, यात गर्भाशय हृदयाच्या आकाराचे असते आणि त्याला दोन शिंगे असतात. यू. एस. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीन च्या अध्ययनानुसार या समस्येला गर्भाशयाची विकृती असे संबोधले जाते. जी मुलेरियन नालिकांच्या विसंगतीमुळे उद्भवते. सामान्य गर्भाशय पेअर च्या आकाराचे असते, परंतु, गर्भाशयाच्या विकासादरम्यान म्युलेरीयन नलिकांच्या आंशीक बिघाडामुळे गर्भाशय हृदयासारखा आकार धारण करते.  (Some women have heart shaped uterus, there may be a problem in conceiving)

ही समस्या किती सामान्य आहे? 

बायकोर्न्युएट गर्भाशयाची समस्या खूप सामान्य जरी असली तरी त्याला दुर्मिळ मानले जाते. 5% पेक्षा कमी मुली जमतः असे गर्भाशय घेऊन जन्माला येतात. बहुतेक महिला तसेच मुलींना ही माहीतच नसते की त्यांच्या गर्भाशयाचा आकार असामान्य आहे.

गर्भधारणा करतेवेळी किंवा गर्भपात झाल्यानंतर त्यांना ह्या समस्येबद्दल कळून येते. 

बायकोर्न्युएट गर्भाशयाची लक्षणे काय आहेत?

दोन शिंग असलेले गर्भाशय घेऊन जन्मलेल्या स्त्रियांमध्ये काही सामान्य लक्षणे आढळून येतात. जसे की, या समस्येमध्ये वारंवार गर्भपात (सामान्यतः तीनपेक्षा जास्त), योनीतून रक्तस्त्राव, मासिक पाळीदरम्यान वेदना, संभोगदरम्यान वेदना (डिस्पेरेनिया) तसेच ओटीपोटात सतत वेदना या लक्षणांचा समावेश होतो. काही प्रकरणांमध्ये तर, महिलांना हे कळतच नाही की तिला या प्रकारचे गर्भाशय आहे, कारण त्यांना त्याप्रकारचे कोणतेही लक्षणे जाणवत नाहीत.

अधिक वाचा :  ​व्हिटॅमिन डी ची पातळी वाढवण्यासाठी हे 7 प्रभावी उपाय

बायकोर्न्युएट गर्भाशयाचे कारण काय आहे? 

ही जन्मजात स्थिती असून, संबंधित महिला अशा प्रकारचे गर्भाशय घेऊन जन्मलेली असते. गर्भधारणेवेळी भ्रूण गर्भाच्या आत वाढत असते आणि गर्भधारणेच्या 10 ते 20 आठवड्यांच्या कालावधीत तो विकसित होतो. 

त्यादरम्यान, गर्भाशयातील दोन नलिका(ज्याला म्यूलेरियन नलिका असे म्हणतात) एकत्र येऊन एक गर्भाशयाची पोकळी तयार करतात. पण, बायकोर्न्युएट गर्भाशयाच्या प्रकरणामध्ये या नलिका एकत्र न आल्याने गर्भाशयाच्या दोन पोकळ्या आधीच निर्माण झालेल्या असतात.

बायकोर्न्युएट गर्भाशयाच्या आकार त्यामुळे हृदयाच्या आकारासारखा खगोल किंवा असामान्य बनतो. ज्याचा दैनंदिन आरोग्यावर काहीच परिणाम होत नाही. बहुतेक महिलांमध्ये, या स्थितीवर शस्त्रक्रिया करण्याची देखील गरज पडत नाही. 

अधिक वाचा : मुलांच्या बसण्याच्या चुकीच्या पद्धती बदलण्यासाठी उपाय

बायकोर्न्युएट गर्भाशयाचा उपचार काय आहे?

मेट्रोप्लास्टी नामक शस्त्रक्रियेच्या माध्यमाने बायकोर्न्युएट गर्भाशयावर उपचार केले जाऊ शकतात. मात्र, ही शस्त्रक्रिया काही वशिष्ट स्थितीमध्येच केली जाऊ शकते. ही शस्त्रक्रिया लॅप्रोस्कोपिक पद्धतीने केली जाते, ज्यासाठी मोठ्या कटची आवश्यकता नसते. शस्त्रक्रियेमध्ये इंडेंटेशन किंवा हृदयासारखा आकार निर्माण करणारे ऊतक कापून टाकले जाते. 

मेट्रोप्लास्टी शास्त्रक्रियेनंतर गर्भधारणेच्या तयारीसाठी दांपत्यांना तीन महीने थांबण्याचा सल्ला दिला जातो.   

संबंधित स्त्री गर्भवती होऊ शकते का? 

Clevelandclinic.org च्या मते, असामान्य गर्भाशय असलेल्या स्त्रियाना देखील मुले होऊ शकतात. केवळ, त्यांच्या गर्भधारणेमध्ये अनेक कॉम्प्लीकेशन येण्याचा धोका असतो. त्यांचे गर्भाशय बाळाला सामावून घेण्यास असमर्थ असल्यामुळे अनेक गुंतागुंत उद्भवतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी