Yoga for Weight Loss: गृहिणींनो दररोज १० मिनिटं करा ही ३ योगासनं, पोटाची चरबी होईल नाहीशी

तब्येत पाणी
Updated Dec 02, 2019 | 17:49 IST | टाइम्स नाऊ मराठी

How to lose belly fat in a week: पोटाची चरबी वाढल्यानं शरीर दिसतं तर वाईटच पण त्याचा परिणाम इतर आरोग्यावरही होतो. गृहिणींना आकर्षक दिसण्यासाठी आणि आवडते कपडे पुन्हा घालता यावे यासाठी जाणून घ्या काही खास टिप्स..

Yoga for Weight Loss
गृहिणींनो फ्लॅट बेलीसाठी दररोज १० मिनीटं करा ही ३ योगासनं 

थोडं पण कामाचं

 • लठ्ठपणामुळे शरीराचा आकारच बिघडत नाही तर अनेक आजार उत्भवतात
 • वजन वाढल्यानं शरीराला अधिक थकवा जाणवतो आणि सुस्ती, आळस वाढतो
 • पोटाची चरबी वाढल्यानं मधुमेह, हृदय रोग आणि पोटाच्या अनेक समस्या उद्भवतात

मुंबई: आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात आणि बिघडत चाललेल्या लाईफस्टाईलमुळे लठ्ठपणा वाढणं ही खूप सामान्य गोष्ट झालीय. पुरुष आणि महिला दोघंही वाढलेल्या वजनामुळे त्रस्त असतात. लठ्ठपणामुळे फक्त बॉडी शेपच बिघडत नाही तर शरीरात अनेक प्रकारचे आजार उत्पन्न होतात. वजन वाढल्यानं थकवा आणि शरीरात आळस निर्माण होतो.

पोटाची चरबी वाढल्यानं शरीर पूर्णपणे फिट राहत नाही. आपलं शरीर आकर्षक दिसत नाही आणि आपण आपला आवडता ड्रेसही घालू शकत नाही. गृहिणींना आपल्या रोजच्या कामांमध्ये स्वत:कडे लक्ष द्यायला फासरा वेळ मिळत नाही. मुलांची जबाबदारी, घरातील कामं यात त्या स्वत:कडे दुर्लक्ष करतात. परंतू आपल्या दररोजच्या काळातील अवघे १० मिनीटं गृहिणींनी स्वत:साठी काढले तर त्यांना फिट राहता येईल.

तज्ज्ञांच्या मते पोटाची चरबी आणि लठ्ठपणा वाढल्यामुळे डायबिटीज, हृदय रोग, आर्थराइटिस आणि पोटाशी निगडित समस्या दूर होतात. असं म्हणतात की, लठ्ठपणा दूर करण्यासाठी योगासन सर्वात जास्त फायदेशीर ठरतात. या आर्टिकलमध्ये आपण जाणून घेऊया लठ्ठपणा दूर करण्यासाठी तीन महत्त्त्वाची योगासनं...

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

O Yoga me transforma todos os dias. Não, não estou falando do alongamento, dos músculos que se fortalecem, do equilibrio que adquiro ou do condicionamento físico que fica mais resistente. Sim, essa transformação física também acontece, mas é consequência. O yoga me transforma de dentro pra fora, o meu corpo se alonga quando minha mente está flexível; meu corpo tem força, quando minha mente está forte; o equilíbrio acontece quando minha mente/minhas emoções estão equilibradas e minha resistência física melhora quando minha mente cansa. Acontece que, na maioria da vezes, esse não é o processo "natural". Na maioria das vezes, pratico equilíbrio, força, flexibilidade no físico para aquietar, equilibrar, fortalecer a minha mente. Yoga não é só ásanas e relaxamento. Na verdade, yoga dói. Yoga me faz chorar em cima do tapete. Yoga me tira da zona de conforto. Yoga me traz muitas dúvidas e incertezas. Yoga me mostra o que não quero ver. Yoga trás minhas dores, tristezas, apegos, desafios para superfície, me fazendo olhar cara a cara pra tudo que está mascarado e fazendo sofrer. Ao mesmo tempo, esse mesmo yoga é o que me trás clareza, centramento, firmeza. É o mesmo que me ensina a respirar, que me trás consciência. Yoga me preenche. Yoga me mostra que mesmo parecendo estar tudo errado, está tudo bem. Yoga me faz viver no presente. Yoga as vezes parece sufocar, trás milhões de questionamentos, mas esse mesmo yoga é o que liberta e trás as respostas. . . . #uttanasana #yoga #yogi #yogateacher #yogapractice #hathayoga #autoconhecimento #meditation #yogalife

A post shared by ELOISA DALL' AQUA (@eloisadallaqua) on

 

पादहस्तासन

पोटाची चरबी कमी करण्यासाठी हे आसन खूप फायदेशीर असतं. पादहस्तासन हा शब्द पद आणि हस्त या दोन शब्दांनी मिळून बनतो. जिथं पदाचा अर्थ पाय आणि हस्तचा अर्थ हात आहे. हे आसन केल्यानं फक्त पोटाची चरबी कमी होत नाही तर हृदयाशी निगडित आजार सुद्धा यामुळे दूर होतात आणि संपूर्ण आरोग्य चांगलं राहतं. एक महिना नियमितपणे पादहस्तासन केल्यानं पोटाची चरबी नाहिशी होईल.

पादहस्तासन करण्याची योग्य पद्धत

 • हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या जागेवर सरळ एका रेषेत उभं राहावं.
 • यानंतर हळुहळू खाली झुकत दोन्ही हातांच्या बोटांनी पायाला हात लावण्याचा प्रयत्न करावा.
 • काही सेकंद याच स्थितीत राहावं आणि नंतर नॉर्मल स्थितीमध्ये परतावं.
 • ५ ते ७ वेळा हे आसन करावं.

 

पादहस्तासन करण्याचे फायदे

 • हे आसन वाकून केलं जातं. त्यामुळे पोटावर दाब पडतो, त्यामुळे पोटाची चरबी कमी होते.
 • हे आसन मसल्सना मजबूत करतं.
 • पोटाशी निगडित समस्या जशा की अपचन, पोट फुगणं इत्यादींपासून आपली सुटका होते.
 • पादहस्तासन केल्यानं शरीरात लवचिकपणा येतो. थकवा दूर होते आणि एकाग्रता वाढते.
 • हे आसन केल्यानं मुलांची उंची झपाट्यानं वाढते.

कपालभारती प्राणायाम

हा खूप लोकप्रिय प्राणायाम आहे. याला संजीवनी म्हटलं जातं. कपालभारती सर्व योगासनांमध्ये सर्वात फायदेशीर प्राणायाम आहे. दररोज कपालभारतीचा अभ्यास केल्यानं पोटाची चरबी झपाट्यानं कमी होते. तज्ज्ञांच्या मते नियमितपणे हे आसन केल्यानं लठ्ठपणा कमी होतो, शरीरात ऑक्सिजनचा योग्य पुरवठा होतो आणि शरीरातील वाईट पदार्थ बाहेर निघतात.

 

 

कसा करावा कपालभाती प्राणायाम

परिवृत्त पार्श्वकोणासन

हे आसन करण्यास कठीण आहे पण नियमितपणे अभ्यास केला तर ते जमू शकतं. परिवृत्त पार्श्वकोणासनचा दररोज अभ्यास केला तर पोटाची चरबी तर कमी होतेच सोबतच यामुळे मसल्स मजबूत होतात आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करत पचनशक्ती वाढते. याशिवाय ब्रॉँकायटिस, दमा आणि श्वासाशी निगडित इतर समस्या दूर करण्यासाठीही हे आसन फायदेशीर आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

When disturbed by negative thoughts, opposite ones should be thought of. - Yoga Sutra II.33 . . . . @lululemonyvr

A post shared by Abbey Bates (@abbey.yoga) on

 

परिवृत्त पार्श्वकोणासन करण्याची योग्य पद्धत

 • हे आसन करण्यासाठी ताडासन मुद्रेत जमिनीवर उभं राहावं.
 • यानंतर आपल्या दोन्ही पायांमध्ये ४ ते ४.५ फूट अंतर करावं.
 • आपले दोन्ही हात दोन्ही दिशांना उघडावे.
 • यानंतर आपल्या डाव्या हाताला उजव्या तळव्याजवळ न्यावा आणि हात जमिनीवर ठेवावा.
 • आता आपल्या उजव्या हाताला वरच्या बाजूने सरळ रेषेत ठेवावं.
 • या मुद्रेमध्ये १० सेंकद थांबावं आणि पुन्हा सामान्य पोझिशनमध्ये यावं.
 • आता हिच पद्धत दुसऱ्या हातानं करावी. कमीत कमी १० वेळा हे आसन करावं.

परिवृत्त पार्श्वकोणासन करण्याचे फायदे

 • हे आसन केल्यानं पाय, गुडघे आणि मांड्यांमध्ये स्ट्रेचिंग येतं, ज्यामुळे हे मजबूत होतात.
 • शरीराच्या खालच्या भागात म्हणजे पोट, मांड्या आणि नितंभावर जमलेली चरबी कमी करण्यात हे आसन फायदेशीर ठरतं.
 • हे आसन केल्यानं कमरेचं दुखणं, पाठ, पाय आणि गुडघे दुखीपासून सुटका होते.
 • दमा आणि श्वासाशी निगडित समस्या दूर करण्यासाठीही हे आसन फायदेशीर ठरतं.

या तीनही योगासनांचा दररोज अभ्यास केल्यानं पोटाची चरबी खूप झपाट्यानं कमी होते आणि शरीर सुंदर आणि आकर्षक दिसू लागतं. तेव्हा गृहिणींनो आपल्या धकाधकीच्या आयुष्यात स्वत:साठी थोडा वेळ काढा आणि हे आसन करा, आपल्या सौंदर्यात वाढ होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी