स्पर्म काउंट वाढवतात हे ८ पदार्थ तर पुरुषांनी दूर राहावे असे ५ पदार्थ

अलीकडच्या काळात फर्टिलिटी, स्पर्म काउंट (Sperm Count) यासारख्या प्रश्नांना अनेक जोडप्यांना सामोरे जावे लागते. मात्र यात तुमच्या आहार-विहाराचा (Nutritional diet) खूप मोठा वाटा असतो हे लक्षात घेतले पाहिजे.

Food that increase Sperm count
स्पर्म काउंटसाठी महत्त्वाचे अन्न पदार्थ 

थोडं पण कामाचं

  • फर्टिलिटी, स्पर्म काउंट हे अनेक जोडप्यांसमोरील प्रश्न
  • फर्टिलिटीसाठी योग्य आहार हा महिलांइतकाच पुरुषांसाठीदेखील महत्त्वाचा
  • अपत्य प्राप्तीची इच्छा असणाऱ्यांनी शारीरिक तंदूरुस्ती महत्त्वाची

नवी दिल्ली : तुम्ही जे खाता त्याचा तुमच्या फर्टिलिटीवर (Fertility) खूप परिणाम होत असतो. त्यामुळे अपत्य प्राप्तीची इच्छा असणाऱ्यांनी स्वत:च्या शारीरिक तंदूरुस्तीची (Physical fitness) काळजी घेतली पाहिजे. अलीकडच्या काळात फर्टिलिटी, स्पर्म काउंट (Sperm Count) यासारख्या प्रश्नांना अनेक जोडप्यांना सामोरे जावे लागते. त्यासाठी अनेक औषधोपचार देखील केले जातात. मात्र यात तुमच्या आहार-विहाराचा (Nutritional diet) खूप मोठा वाटा असतो हे लक्षात घेतले पाहिजे. फर्टिलिटीसाठी योग्य आहार हा महिलांइतकाच पुरुषांसाठीदेखील महत्त्वाचा असतो. काही अन्नपदार्थ स्पर्म काउंट वाढवण्याबरोबरच (Food that increase Sperm count) त्यांची गुणवत्तादेखील वाढवतात. तर काही अन्नपदार्थ स्पर्म काउंट कमी करतात. अशा अन्नपदार्थांविषयी जाणून घेऊया. (Food that increases sperm count & quality in Male)

१. भोपळ्याच्या बिया - 

भोपळ्याच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणावर झिंक असते. पुरुषांमध्ये फर्टिलिटी वाढवण्यासाठी महत्त्वाच्या मिनरल्सपैकी झिंक हे एक आहे. झिंकमुळे टेस्टोस्टेरॉन, स्पर्म मोटिलिटी आणि स्पर्म काउंट  देखील वाढतो.

२. संत्री -

संत्र्याच्या फळात मोठ्या प्रमाणात क जीवनसत्व असते. संशोधनातून असे समोर आले आहे की क जीवनसत्व म्हणजेच व्हिटामिन सी, हे स्पर्म काउंट, स्पर्म मोबिलिटी आणि स्पर्मच्या रचनेतील सुधारणा यासाठी खूपच उपयुक्त असतात. याशिवाय व्हिटामिन सी असणारे पदार्थ उदाहरणार्थ टोमॅटो, ब्रोकली आणि कोबी यांचादेखील आहारात समावेश करावा. 

३. गडद हिरव्या रंगाच्या पालेभाज्या -

पालक, शतावरी आणि इतर हिरव्या पालेभाज्यांमध्ये फोलेट असते. यामध्ये व्हिटामिन बी असते. फोलेट स्पर्मला मजबूत आणि निरोगी बनवते.

४. डार्क चॉकलेट -

डार्क चॉकलेटमध्ये आर्जिजिन नावाचे अमिनो अॅसिड असते. यामुळे स्पर्मची गुणवत्ता आणि स्पर्म काउंट यामध्ये वृद्धी होते.

५. सेलमन आणि सार्डिन मासे -

काही माशांमध्ये ओमेगा -३ फॅटी अॅसिड असते. विशेष रुपाने सेलमन, सार्डिन, टूना, हेरिंग आणि मॅकरेल या माशांमध्ये असणारे ओमेगा-३ फॅटी अॅसिड स्पर्मची गुणवत्ता आणि स्पर्म काउंट वाढवण्यास उपयुक्त असते. 

६. डाळिंबाचा रस -

डाळिंबात असणारा अॅंटीऑक्सिडेंट टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढवण्यासाठी उपयुक्त असतो. यामुळे पुरुषांची कामभावना वाढते आणि स्पर्मची वाढ अधिक योग्य प्रकारे होते. 

७. पाणी -

शरीरातील पाण्याच्या प्रमाणाचा प्रत्यक्ष परिणाम स्पर्मवर होत असतो. शरीरात योग्य प्रमाणात पाणी असल्यावर चांगले सेमिनल फ्ल्युईड तयार होते. 

वर उल्लेख केलेल्या सर्व पदार्थांचे योग्य प्रमाणात सेवन केल्यामुळे स्पर्मची गुणवत्ता वाढते. 

मात्र काही पदार्थ खाल्ल्यामुळे स्पर्मची गुणवत्ता आणि काउंट कमी होतो. त्यामुळे अशा पदार्थांपासून तुम्ही दूर राहिले पाहिजे. असे पदार्थ कोणते ते पाहूया,

१. फास्ट फूड -
फास्ट फूड हे आरोग्यासाठी अयोग्य असते. ते पचवण्यासदेखील अधिक वेळ लागतो आणि त्यातून पोषण मिळत नाही. त्यामुळे स्पर्मची गुणवत्ता घसरते.

२. फूल फॅट डेअरी प्रॉडक्ट -
फूल फॅट डेअरी प्रॉडक्टमध्ये अॅस्ट्रोजन असते आणि त्यामुळे निरोगी स्पर्मची संख्या कमी होते.

३. प्रक्रिया केलेले किंवा प्रोसेस्ड मांस -
प्रक्रिया केलेले मांस, हॉट डॉग्ज, सॉसेस आणि तत्सम पदार्थ यामुळे स्पर्म काउंट कमी होतो.

४. कॅफीन-
संशोधनातून समोर आले आहे की कॅफीनच्या अधिक वापराचा महिला आणि पुरुष दोघांच्याही फर्टिलिटीवर मोठा परिणाम होतो. याचे अधिक सेवन केल्यास गर्भपाताचा धोकाही वाढतो.

५. दारू-
जास्त प्रमाणात दारूचे सेवन केल्यास शरीरातील टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होते. याशिवाय दारूच्या सेवनामुळे स्पर्म काउंटदेखील कमी होतो. दारूचा विपरित परिणाम स्पर्मवर होतो. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी