Sprouted Peanuts Benefits: मोड आलेले शेंगदाणे खाण्याचे पुरुषांना अनेक फायदे होत असल्याचं दिसून आलं आहे. मोड आलेल्या शेंगदाण्यांमध्ये व्हिटॅमिन, प्रोटिन, फायबर, अँझायम, ॲमिनो ॲसिड यासारखे अनेक आरोग्यपूर्ण घटक असतात. त्याचप्रमाणे हे मोनोसॅच्युरेटेड फॅट्स आणि इतर अनेक पोषक घटकांनी समृद्ध असतात. जाणून घेऊया, नेमक्या कुठल्या समस्या त्यामुळे दूर होऊ शकतात.
वाढलेलं पोट ही बहुतांश पुरुषांची समस्या असते. मोड आलेल्या शेंगदाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आढळतं. त्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि पोट साफ होतं. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. यात मुबलक प्रमाणात प्रोटिनही असतं. त्यामुळे वारंवार भूक लागण्याचे प्रकार बंद होतात. अतिरिक्त आणि अनावश्यक खाणं बंद झाल्यामुळे वजन कमी होण्याचा वेग वाढू लागतो.
मोड आलेले शेंगदाणे हे मसल बिल्डिंगसाठी उत्तम मानले जातात. स्नायूंचा आकार वाढवण्यासाठी आणि तो टिकवून ठेवण्यासाठी याची मोठ्या प्रमाणावर मदत होत असते. ज्यांचे स्नायू कमकुवत आहेत, त्यांना ते सशक्त बनवण्यासाठीदेखील मोड आलेल्या शेंगदाण्यांचा चांगला उपयोग होतो.
अधिक वाचा - Covid impact on fitness: कोरोना संक्रमणामुळे कमी होते व्यायामाची क्षमता, अशी करा तयारी
ज्या व्यक्तींचा स्टॅमिना कमी असतो, त्यांना मोड आलेले शेंगदाणे खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यातील प्रोटिन स्टॅमिना वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतं. मोड आलेल्या शेंगदाण्यांमध्ये मुबलक प्रमाणात कॅलरीजही असतात. त्यामुळे पोट भरायला त्याची मदत होते.
शेंगदाण्यात फॉलेटचं प्रमाण चांगलं असतं. यात असणाऱ्या मुबलक जीवनसत्त्वांमुळे केसांची निकोप वाढ होण्यास मदत होते. फोलेटच्या कमतरतेमुळेच केस गळू लागतात आणि खराब होऊ लागतात. त्याशिवाय मोड आलेल्या शेंगदाण्यात मॅग्नेशिअमही भरपूर असतं. त्यामुळे केस मजबूत होण्यास मदत होते. जर पुरुषांना टक्कल पडायला सुरुवात झाली असेल किंवा त्यांचे केस गळायला सुरुवात झाली असेल, तर त्यांना शेंगदाणे खाण्याचा सल्ला दिला जातो.
अधिक वाचा - Weight Loss Tips : थंडीत वजन कमी करण्यासाठी वापरा मेथीचे दाणे, आठवड्याभरात पहा फरक
30 ते 40 वयोगटातील पुरुषांना हृदयाशी संबंधित काही ना काही आजार सुरु होण्याची शक्यता असते. व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मुबलक प्रमाणात असणारे मोड आलेले शेंगदाणे खायला सुरुवात केल्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांपासून वाचण्यासाठी आवश्यक घटक शरीराला मिळतात. मोड आलेल्या शेंगदाण्यात असणारे अँटिऑक्सिडंट्स हे रक्तवाहिन्यांना शुद्ध ठेवण्याचं काम करत असतात. रक्तातील साखर नियंत्रित करणे आणि हृदयाचं आरोग्य ठिक ठेवणे, ही कामंदेखील शेंगदाण्यामुळे होतात.
डिस्क्लेमर - मोड आलेल्या शेंगदाण्यांपासून होणाऱ्या फायद्याबाबच्या या काही टिप्स सामान्यज्ञानावर आधारित आहेत. तुम्हाला काही गंभीर समस्या किंवा प्रश्न असतील, तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार घेणे आवश्यक आहे.