Stale chapati eating disadvantages : दुपारी किंवा रात्रीच्या जेवणात बनवलेली चपाती, रोटी, भाकरी राहिल्यावर दुसऱ्या दिवशी खाल्ली जाते. शिळी चपाती टाकून देण्याऐवजी ती खातात मात्र, त्याचे आरोग्यासाठी अनेक दुष्परिणाम आहेत.
रात्री राहिलेली शिळी चपाती किंवा रोटी दुसऱ्या दिवशी खातात किंवा शिळ्या पिठापासून चपाती बनवतात. मात्र, हे आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. शिळी चपाती, भाकरी किंवा रोटी खाणे म्हणजे अनेक गंभीर आजारांना आमंत्रण देण्यासारखे आहे.
हे पण वाचा : या सवयींमुळे ऐन तारुण्यात येतो हार्ट अटॅक, तुम्हाला आहेत का या सवयी?
शिळी चपाती, रोटी, भाकरी, पुरी किंवा पराठा आरोग्यासाठी घातक ठरू शकते. आरोग्यासोबतच ज्योतिष शास्त्रानुसार, सुद्धा शिळ्या पिठाचा वापर करू नये असे म्हणतात.
ओल्या पिठात आंबवण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण होते. त्यामुळे मळलेले पीठ सकाळी किंवा जास्त प्रमाणात वापरल्यास त्यामध्ये जंतू येण्याची शक्यता असते.
हे पण वाचा : शिळ्या चपातीचा फेस पॅक, चेहरा उजळेल झटपट
शिळ्या पीठाची चपाती, भाकरी खाण्याचा सर्वात वाईट परिणाम हा तुमच्या पोटावर होतो. तुम्हाला पोटदुखी, बद्धकोष्ठता, पोट जड होण्याच्या समस्या भेडसावण्याची शक्यता असते.
शिळ्या पिठाची चपाती किंवा भाकरी खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. त्यामुळे तुम्ही आजारांना बळी पडू शकता.
हे पण वाचा : ...म्हणून विवाहबाह्य संबंध जास्त काळ टिकतात
शिळ्या चपाती किंवा रोटी किंवा भाकरी खाल्ल्याने जुलाब, अॅसिडिटी यासारख्या समस्या भेडसावू शकतात. त्यामुळे ताज्या पिठाची चपाती, भाकरी खाणे हे आरोग्यासाठी चांगले.