Weight Loss Drinks recipe in marathi: वजन कमी करण्यासाठी दररोज 'या' ड्रिंक्सने करा आपल्या दिवसाची सुरुवात

तब्येत पाणी
Updated Mar 21, 2023 | 10:01 IST | टाइम्स नाऊ मराठी

Weight Loss Drinks recipe in marathi: वजन कमी करणे हा बर्‍याच लोकांसाठी खूप मोठा टास्क असतो, वजन कमी करण्याच्या प्रवासात आपण निरोगी आहार आणि व्यायामाद्वारे आपले वजन नियंत्रित ठेवणे हे सर्वात महत्वाचे आहे.

 Start your day with these drinks to weight loss
Weight Loss Drinks  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • वजन कमी करणे मोठा टास्क
  • हे पेय प्यायल्याने वजन कमी करण्यात मदत होईल.
  • वजन कमी करण्यासाठी शॉर्टकट नाही

Weight Loss Drinks recipe in marathi: वजन कमी करणे हा बर्‍याच लोकांसाठी खूप मोठा टास्क असतो, वजन कमी करण्याच्या प्रवासात आपण निरोगी आहार आणि व्यायामाद्वारे आपले वजन नियंत्रित ठेवणे हे सर्वात महत्वाचे आहे. वजन कमी करण्यासाठी एक गोष्ट महत्त्वाची असते ती म्हणजे तुम्ही दिवसभरात कोणता आहार घेता आणि कसा घेता. वजन कमी करण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसला तरी वजन कमी करण्याच्या प्रवासात काही गोष्टीची तुम्हाला मदत होते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही पेयांबद्दल सांगणार आहोत ज्यांचे सेवन तुम्हाला रोज सकाळी रिकाम्या पोटी करावे लागेल. हे पेय प्यायल्याने वजन कमी करण्यात खूप मदत होईल.

हर्बल डिटॉक्स टी

दररोज सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी हर्बल डिटॉक्स चहा घेतल्याने वजन कमी होण्यास खूप मदत होते. हे तुमच्या शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करते. आले, काळी मिरी किंवा पुदिना यापासून बनवलेला हर्बल चहा घेऊ शकता.

अधिक वाचा:  5 healthy breakfast Recipe in marathi: निरोगी राहण्यासाठी नाश्त्यामध्ये नक्की करा हे ५ पदार्थ

हळदीचे पाणी

हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी तत्व आढळतात, ज्यामुळे शरीरातील जळजळ कमी करण्यासोबतच वजन कमी करण्यासाठी मदत होते. रोज सकाळी कोमट पाण्यात हळद, मध आणि लिंबू मिसळून प्या. हळद पचनास मदत करते, चयापचय वाढवते आणि सूज कमी करते.

तूप आणि गरम पाणी

आयुर्वेदात आरोग्यासाठी तुपाचे अनेक फायदे सांगितले आहेत. वजन कमी करण्यासाठीही तूप खूप महत्वाची भूमिका बजावते. तुपामध्ये हेल्दी फॅट असते. त्यामुळे कोमट पाण्यात मिसळल्यास ते पचन आणि चयापचय वाढवण्यास खूप मदत करते. पाण्यात तूप मिसळून प्यायल्याने तुमचे पोट भरलेले राहते, त्यामुळे तुमच्या कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी होते. तुपात जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील आढळतात.

अधिक वाचा: Influenza H3N2 and Influenza H1N1 : 'ही' लक्षणे आढळल्यास लगेच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू करा

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कोमट पाण्यात सफरचंद सायडर व्हिनेगर, मध आणि लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने फॅटची समस्या दूर होते. ऍपल सायडर व्हिनेगर चरबी कमी करण्याचे काम करते. यासोबतच रक्तातील साखरेची पातळी आणि साखरयुक्त पदार्थांची  क्रेविंग कमी करते.

लिंबू पाणी

दिवसाची सुरुवात करण्यासाठी लिंबू पाणी खूप चांगला पर्याय आहे. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आढळते जे तुमची चयापचय क्रिया वाढवण्याचे काम करते. सकाळी उठल्यानंतर लिंबू पाणी पिल्याने शरीरातील सर्व विषारी पदार्थ सहज बाहेर पडतात. यामध्ये पेक्टिन नावाचा फायबर देखील आढळतो, जो तुमची भूक नियंत्रित ठेवण्याचे काम करतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी