Health care: ताप आल्यावर या गोष्टींपासून ठेवा अंतर, अन्यथा ताप आणखीन वाढू शकतो

तब्येत पाणी
Updated Apr 13, 2023 | 21:56 IST | टाइम्स नाऊ मराठी

How to cure fever: ताप आल्यामुळे केवळ अशक्तपणा जाणवत नाही, तर जास्तवेळ ताप राहिल्याने वजन कमी होणे, डोकेदुखी, मेंदूचे विकार आणि इतर अनेक समस्या देखील उद्भवतात. त्यामुळे जेव्हा ताप येतो तेव्हा काही गोष्टी टाळाव्यात. अन्यथा ताप कमी होण्याऐवजी जास्त वाढतो, चला याबद्दल जाणून घेऊया - 

How to cure fever
हवामान बदलामुळे सर्दी-खोकला आणि ताप येणे आता सामान्य बाब झाली आहे.  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • हवामान बदलामुळे सर्दी-खोकला आणि ताप येणे आता सामान्य बाब झाली आहे.
  • ताप असताना चुकीच्या गोष्टी खाल्ल्यामुळे तुमच्या शरीराचे तापमान आणखी वाढू शकते
  • जास्तवेळ ताप राहिल्याने वजन कमी होणे, डोकेदुखी, मेंदूचे विकार आणि इतर अनेक समस्या देखील उद्भवतात.

Health Care: हवामान बदलामुळे सर्दी-खोकला आणि ताप येणे आता सामान्य बाब झाली आहे. हवामानात बदल होताच प्रत्येक घरात एखादा तरी तापाचा रुग्ण नक्कीच सापडतो. मात्र अशावेळी काय खावे आणि काय खाऊ नये हे अनेकांना माहीतच नसते. ताप आल्याने तोंड कडू होते. ज्यामुळे अनेकांना काहीतरी चवदार खायचे असते. पण ताप असताना चुकीच्या गोष्टी खाल्ल्यामुळे तुमच्या शरीराचे तापमान आणखी वाढू शकते. त्यामुळे काय खावे आणि काय खाऊ नये हे माहीत असणे आवश्यक आहे. (Stay away from these things when you have a fever otherwise the fever may worsen)

अधिक वाचा : ​जपान-अमेरिकेत केशर, बागनपल्ली आंब्याचा पहिला स्टॉक निर्यात


रेड वाईन

ताप असताना मद्यपानाची  सवय आरोग्यासाठी हानिकारक आहे. ताप आल्यास अल्कोहोलमध्ये असलेले घटक शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात.

चॉकलेट

तापादरम्यान तोंडाला चव नसल्याने बरेच लोक चॉकलेट खातात, परंतु ताप असताना चॉकलेट खाणे हानिकारक ठरू शकते, कारण चॉकलेटमध्ये अमाईन नामक विषारी घटक असतात, जे हिस्टामाइनचे विघटन कमी करतात.

प्रोसेस्ड केलेले मांस

तुम्हाला ताप असल्यास, प्रोसेस्ड केलेले मांस खाणे टाळा, कारण या प्रकारच्या मांसामध्ये हिस्टामाइनचे प्रमाण जास्त असते, जे तुमच्या यकृतावर आणि चयापचयावर हल्ला करते.

अधिक वाचा : सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 58 वरुन 60 वर्षे होणार

टरबूज

उन्हाळ्यात टरबूज खाणे आरोग्यदायी आणि अतिशय फायदेशीर मानले जात असले तरी ताप असताना ते खाणे टाळावे, कारण त्यामुळे ताप आणखीन वाढून कॉलरा होण्याची शक्यता असते.

कॉफी किंवा चहा

ताप असताना चहा, कॉफी किंवा अल्कोहोल यांसारखे कॅफिनयुक्त पदार्थ खाऊ नयेत, कारण ते पचायला जास्त वेळ घेतात आणि त्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते. ताप असताना असे पदार्थ खाणे टाळा, तसेच जास्त गोड पदार्थ देखील खाऊ नका. 

*टीप: सदर लेख तुमच्या सामान्य माहितीसाठी आहे, कोणत्याही उपचार प्रक्रियेचा अवलंब करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी