How to Burn Belly Fat । मुंबई : बरेच लोक असे आहेत ज्यांना आपल्या पोटाची चरबी कमी करायची आहे, कारण प्रत्येकाला तंदुरूस्त आणि सुंदर राहायचे असते. यासाठी स्लिम-ट्रिम आणि मस्क्युलर बॉडी असणे खूप गरजेचे आहे, पण अनारोग्यकारक खाण्याच्या सवयी आणि व्यस्त जीवनशैलीमुळे बहुतांश लोकांची ही इच्छा पूर्ण होत नाही. चला तर म जाणून घेऊया वजन कमी करण्याच्या काही सोप्या टिप्स. (Stomach fat will be reduced in 3 months, just do these simple tips).
अधिक वाचा : पोलिसांकडून 'या' अटी-शर्तींसह राज ठाकरेंच्या सभेला परवानगी
१) अन्नातली कॅलरीज कमी करा - पोटाची चरबी कमी करण्यासाठी सर्वात पहिला नियम म्हणजे कॅलरीजचे सेवन कमी करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही कमी कॅलरीजयुक्त पदार्थ खाण्यास सुरुवात करा. नाश्त्यात ओट्स, दुपारच्या जेवणात डाळ रोटी, रात्रीच्या जेवणात हलका पदार्थ खाल्ल्याने फायदा होईल.
२) एक्सरसाइज करा - एकदा का तुम्हाला तुमच्या रोजच्या कॅलरीजचे प्रमाण कळले की मग व्यायाम सुरू करण्याची किंवा काही फिटनेस क्रियाकलापांमध्ये गुंतण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत स्वत:साठी असे काही उपक्रम निवडा. ज्यामुळे त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. यासाठी तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात जिमिंग अथवा कोणताही शारिरीक खेळ खेळू शकता.
३) दहा हजार पावले चाला - पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्हाला आणखी एक महत्त्वाची गोष्ट करावी लागेल. ती म्हणजे दररोज सुमारे १० हजार पावले चालणे. हा एक अतिशय सोपा व्यायाम आहे आणि तुम्हाला दररोज सुमारे ४०० ते ५०० कॅलरीज बर्न करण्यात मदत होईल.
* सकाळी उठून रिकाम्या पोटी १-२ ग्लास पाणी प्या, यामुळे चयापचय वाढेल.
* जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी प्या, जास्त अन्न खाण्याची इच्छा कमी होईल.
* गोड पदार्थांचे सेवन कमी करा, कारण त्यामुळे वजन झपाट्याने वाढते.
* बसून हळूहळू खाण्याची सवय लावा, त्यामुळे अन्न पचते आणि काही सारखी भूकही लागणार नाही.
* जास्त तेलकट पदार्थ, बर्गर, पिझ्झा, चीज इत्यादी खाणे टाळा.
* तुमचा फ्लॅट ४-५ मजल्यांवर असेल तर लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापरा.