ब्रेस्टफीडिंगची सवय सोडविण्यासाठी या टिप्स नक्की लक्षात ठेवा!

तब्येत पाणी
Updated Jun 02, 2019 | 15:39 IST | टाइम्स नाऊ मराठी

बाळ सहा महिन्याचं होईपर्यंत त्याला ब्रेस्टफीडिंग करणं गरजेचं आहे. पण सहा महिन्यानंतर बाळाला योग्य आहार देणं गरजेचं आहे. त्यामुळे त्याचं ब्रेस्टफीडिंग सुटणंही आवश्यक आहे. अशावेळी काही टिप्स नक्की लक्षात ठेवा.

breastfeeding_0
ब्रेस्टफीडिंगची सवय सोडविण्यासाठी या टिप्स नक्की लक्षात ठेवा!  |  फोटो सौजन्य: Representative Image

मुंबई: आईचं दूध हे नवजात बालकांसाठी अमृत समजलं जातं. पण नवजात बालकांना फक्त सहा महिन्यांपर्यंतच आईचं दूध द्यावं. बाळ सहा महिन्यांचं झाल्यानंतर त्याला हळूहळू योग्य आहार देणं देखील गरजेचं आहे. बाळाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग्य आहार देणं हे आवश्यक आहे. अशावेळी फक्त आईच्या दूध हे बाळासाठी पुरेसं नसतं. पण अनेकदा नवजात बालकं आहार घेत नाही. त्यांना फक्त आईचं दूध हवं असतं. पण अशावेळी आईने देखील अतिशय समजूतदारपणे आणि मानसिकदृष्ट्या मुलाला आपल्या दुधापासून दूर करणं गरजेचं आहे. 

आईचं दूध अचानक बंद झाल्यास त्याचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे असं करताना लक्षात ठेवा की, प्रेम आणि संयम या दोन्ही गोष्टी फार आवश्यक आहेत. ज्यामुळे मुलांना दुधाऐवजी इतर वस्तू या लवकर पसंत पडतील. बाळाला दुधापासून परावृत्त करण्यासाठी आईला काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. उदा. बाळाच्या खाण्याची वेळ निश्चित करणं, त्याला नेमकं काय द्यायला हवं याचा मेन्यू निश्चित करणं. तसंच स्वत:ला देखील तयार करणं गरजेचं आहे. कारण की, अचानक बाळाने दूध सोडल्यानंतर आईला देखील काही समस्या उद्भवू शकतात. त्या उद्भवू नये याची देखील काळजी घेणं गरजेचं आहे. तर जाणून घेऊयात काही खास टिप्स ज्यामुळे बाळ आईच दूध पिणं सहजपणे सोडू शकतं. 

ब्रेस्टफीडिंग सोडविण्यासाठी पाच खास टिप्स: 

  1. लक्षात ठेवा की, बाळ कधीही अचानक दूध सोडून इतर गोष्टी खाण्यास सुरुवात करेल. त्याला वेळ लागेल. तो हळूहळू इतर वस्तू खाण्यास सुरुवात करेल. तो सुरुवातीला खाण्यासाठी दिलेल्या वस्तूसोबत खेळेल आणि नंतर ते खाईल. त्यामुळे त्याला खाण्यासोबत एन्जॉय देखील करू द्या.
  2. बाळाने दूध सोडावं असं तुम्हाला वाटत असलं तरी ही गोष्ट काही एका दिवसात घडणारी नाही. त्यामुळे या गोष्टीला थोडा वेळ लागेल. त्यामुळे कमीत-कमी आठवडाभर आधी याची तयारी सुरु करा. सुरुवातीला बाळाच्या फीडिंगमधील वेळ वाढवा. 
  3. बाळापासून आईने दूर राहणं गरजेचं आहे. कारण की, आई दिसल्यानंतर बाळाला सतत दूध पिण्याची इच्छा होते. असं करू न शकल्यास बाळासोबत खेळता खेळता त्याला काही गोष्टी अगदी थोड्या प्रमाणात खाण्यास द्या. 
  4. आई जेव्हा स्वत: जेवण करत असेल तेव्हा तिने बाळासमोर बसून खाणं गरजेचं आहे. हे मानसिकदृष्ट्या काम करतं. याच वेळी बाळासमोर देखील छोट्या ताटात त्याला पचेल असं अन्न ठेवावं. त्यामुळे बाळ देखील खेळता-खेळता ते अन्न खाण्यास शिकेल. 
  5. बाळाला अजिबात जबरदस्तीने जेवण भरवू नका. कारण तसं केल्यास बाळ अन्न बाहेर काढतो. त्यामुळे त्याला स्वत:हून खाण्यासाठी प्रोत्साहित करा. जेव्हा तो स्वत:हून खाणं खाईल तेव्हा तो अन्न बाहेर काढणार नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
ब्रेस्टफीडिंगची सवय सोडविण्यासाठी या टिप्स नक्की लक्षात ठेवा! Description: बाळ सहा महिन्याचं होईपर्यंत त्याला ब्रेस्टफीडिंग करणं गरजेचं आहे. पण सहा महिन्यानंतर बाळाला योग्य आहार देणं गरजेचं आहे. त्यामुळे त्याचं ब्रेस्टफीडिंग सुटणंही आवश्यक आहे. अशावेळी काही टिप्स नक्की लक्षात ठेवा.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola