मासिक पाळीतला अती रक्तस्त्राव थांबवण्यासाठी....

मासिक पाळी साधारणपणे दरमहा २५ ते ३५ दिवसांनी आली पाहिजे. मात्र, जर ती २५-३५ दिवसांपेक्षा जास्त किंवा कमी येत असेल, तर ती असामान्य असून तात्काळ स्त्रीरोगतज्ज्ञांची मदत घ्यावी

STOP THE FLOW-MANAGING HEAVY MENSES
मासिक पाळीतला अती रक्तस्त्राव थांबवण्यासाठी....  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मासिक पाळीतला अती रक्तस्त्राव थांबवण्यासाठी....
  • अतीरक्तस्रावाला अनेक गोष्टी कारणीभूत
  • त्रास अंगावर न काढता ह्या समस्येमागील कारणाचे प्रथम निदान करणे गरजेचं

मासिक पाळीमध्ये अती रक्तस्त्राव होणे ही खरे तर सर्व वयोगटातील मुली आणि महिलांसाठी एक सामान्य समस्या आहे, जी दैनंदिन जीवनामध्ये त्रासदायक ठरते. मासिक पाळीदरम्यान अशक्तपणा, अस्वस्थता आणि चिडचिडेपणा सारखा त्रास होतो. STOP THE FLOW-MANAGING HEAVY MENSES

सामान्य मासिक पाळीचा कालावधी ३ ते ५ दिवसांप्रमाणे दररोज ३ पॅड बदलता येईल इतका असतो. मासिक पाळी साधारणपणे दरमहा २५ ते ३५ दिवसांनी आली पाहिजे. मात्र, जर ती २५-३५ दिवसांपेक्षा जास्त किंवा कमी येत असेल, तर ती असामान्य असून तात्काळ स्त्रीरोगतज्ज्ञांची मदत घ्यावी; असे स्त्री रोग तज्ज्ञ डॉ रिश्मा ढिल्लो पै म्हणाल्या.

अतीरक्तस्रावाला अनेक गोष्टी कारणीभूत असतात. हार्मोनचे असंतुलन, रक्तस्त्राव विकार, फायब्रॉईड्स, एडेनोमायोसिस किंवा एंडोमेट्रिओसिस, गर्भाशयातील पॉलीप्स, गर्भाचे आवरण जाड किंवा जास्त वाढल्याने (एंडोमेट्रियल हायपरप्लासिया) तसेच काही केसेस मध्ये गर्भाचा कर्करोग देखील कारणीभूत असू शकतो. त्यामुळे, हा त्रास अंगावर न काढता ह्या समस्येमागील कारणाचे प्रथम निदान करणे गरजेचं आहे. हे निदान पेल्विक सोनोग्राफी आणि हिमोग्लोबिनसारख्या अन्य रक्त चाचण्यांद्वारे केले जाऊ शकते, ज्यामुळे अतिरक्तस्रावाला कारणीभूत असणाऱ्या एनिमियाचे निदान करणे शक्य होते. तसेच पीसीओएसचे निदान हार्मोनल चाचणीद्वारे आणि कर्करोग निदानसाठी पीएपी स्मीयर सारख्या चाचण्या करता येतात. यापैकी बहुतेक चाचण्या ह्या सोप्या आणि खिशाला परवडणाऱ्या असतात.  काहीवेळा प्रौढ महिलांसाठी , गर्भाशयाचे अस्तर (एंडोमेट्रियम) किंवा गर्भाशयाच्या तोंडाच्या (गर्भाशय ग्रीवा) कर्करोगाचे निदान करण्यासाठी बायोप्सी करणे गरजेचे असते.

हे उपचार अती रक्तस्त्राव होण्याच्या नेमक्या कारणावर अवलंबून असते. काही उपचार मासिक पाळीच्या तीन ते पाच दिवसांदरम्यान किंवा काही महिन्यांसाठी हार्मोनच्या गोळ्या तोंडावाटे घेण्याइतपत सहज असतात. जर स्त्रीला गर्भधारणेची योजना करायची नसेल तर सर्वोत्तम उपचारांपैकी एक म्हणजे हार्मोन इंट्रायूटरिन उपकरण जे गर्भाशयाच्या आत फक्त पाच मिनिटांसाठी ठेवले जाते. जे नंतर हळूहळू स्थानिक पातळीवर हार्मोन्स सोडते, मासिक रक्तस्त्राव कमी करते आणि जड मासिक पाळीपासून आराम देते. काही केसेस मध्ये तात्पुरते मासिक पाळी थांबवण्यासाठी महिन्यातून एकदा इंजेक्शन देखील दिले जाते. गर्भाच्या आत वाढलेले द्राक्ष्याच्या आकाराचे पॉलीप्स किंवा गर्भाच्या आतील बाजूस सबम्यूकस फायब्रॉईड्समुळे जमलेल्या गाठी ज्या अती रक्तस्त्रावाला कारणीभूत ठरतात, त्या टेलिस्कोप केमेऱ्याद्वारे (हिस्टेरोस्कोप) गर्भाशयात नैसर्गिक मार्गाने टाकून कोणत्याही कट्स शिवाय नष्ट केले जाऊ शकतात. ह्या प्रक्रियेमुळे रुग्ण त्वरीत बरा होतोच पण त्याबरोबरच त्याच दिवशी घरी देखील जाऊ शकतो !

काही गंभीर समस्यांमध्ये शस्त्रक्रिया करणे गरजेचे असते, आजकाल जवळजवळ सर्व प्रक्रिया कीहोल किंवा एंडोस्कोपिक शस्त्रक्रियेद्वारे केल्या जाऊ शकतात. फायब्रॉईड किंवा गर्भातील गाठी ज्याला अंडाशयातील सिस्ट्स तसेच एंडोमेट्रियोटिक सिस्ट (अंडाशयातील चॉकलेट सिस्ट, जेथे अंडाशयात रक्त जमा होते)  लेप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेद्वारे काढल्या जाऊ शकतात,. प्रौढ महिलांमध्ये की होल शस्त्रक्रियेद्वारे गरज पडल्यास गर्भपिशवी देखील काढली जाऊ शकते. ज्यामुळे कमी कालावधीत कोणत्याही त्रासाविना रुग्ण जलद बरा होतो. शिवाय, एमआरआय सारखे शस्त्रक्रियाविरहित उपचार देखील उपलब्ध आहेत, ज्याचा वापर कोणत्याही कट किंवा टाकेशिवाय फायब्रॉईडवर उपचार करण्यासाठी केला जाऊ शकतो. 

जर तुम्हाला मासिक पाळीचा त्रास होत असेल तर तुमच्या स्त्रीरोगतज्ज्ञांना भेटायला उशीर करू नका. मासिक पाळीच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी सामान्य उपचारदेखील उपलब्ध असू शकतात. ज्यामुळे मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या अती रक्तस्त्रावावेळी अस्वस्थ किंवा बैचेन होण्याची वेळ तुम्हांवर येणार नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी