Stress Level : टेन्शन येतंय? मग चांगलंच आहे की! वाचा काय म्हणतोय नवा रिसर्च

जर तुम्हाला हलका किंवा मध्यम स्वरुपाचा तणाव येत असेल, तर चिंता करण्याची गरज नाही. नव्या संशोधनानुसार आता तणाव येणं हे आरोग्यासाठी फायदेशीरच मानलं गेलं आहे.

Stress Level
टेन्शन येतंय? मग चांगलंच आहे की!  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • कधी कधी मध्यम तणाव ठरतो चांगला
  • अति तणाव मात्र नेहमीच वाईट
  • तणावामुळे सुधारते कामगिरी

Stress Level : टेन्शन (Tension) येणं चांगलं की वाईट, असा प्रश्न कुणी विचारला तर त्याचं उत्तर ठरलेलं असेल. टेन्शन येणं चांगलं कसं काय असू शकतं? असा प्रतिप्रश्नच कदाचित तुम्ही विचाराल. कारण लहानपणापासून आपण सगळे हेच ऐकत आलेलो आहोत की टेन्शन येणं किंवा टेन्शन घेणं हे वाईट असतं. मात्र नुकत्याच समोर आलेल्या संशोधनानुसार (New Research) टेन्शन किंवा तणाव हा वाईट नसून चांगलाच असल्याचं दिसून आलं आहे. रोजच्या जीवनात येणारं टेन्शन हे आपल्या फायद्यासाठीच (Beneficial) असतं आणि टेन्शनकडं (Tension) त्याच सकारात्मक दृष्टीने पाहायला हरकत नाही, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. युनिव्हर्सिटी ऑफ जॉर्जियानं केलेल्या संशोधनानुसार आपल्या आयुष्यात असणारे छोटे-छोटे स्ट्रेस हे फायद्याचे असल्याचं दिसून आलं आहे. मात्र प्रमाणापेक्षा अधिक तणाव असेल, तर तो मात्र आरोग्यावर घातक परिणाम करणारा ठरण्याची शक्यता असते. 

काय आहे संशोधन?

संशोधकांनी नव्यानं केलेल्या दाव्यानुसार थोडंसं किंवा मध्यम स्वरुपाचं टेन्शन हे मानसिक स्वास्थ्यासाठी चांगलंच असतं. त्यामुळे आपली मानसिक चवचिकता वाढते आणि डिप्रेशनसारख्या समस्यांपासून आपला बचाव होतो. डिप्रेशन आणि अंँटि सोशल बिहेविअर यासारख्या समस्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठीदेखील तणावाचा फायदा होतो. मेंदूचा विकास आणि कौशल्या वाढीस लागण्यासाठी छोट्या ते मध्यम स्वरुपाच्या तणावाचा उपयोगच होत असल्याचं आतापर्यंतच्या संशोधनातून दिसून आलं आहे. 

संशोघकांचा दावा

या संशोधन गटाचे प्रमुख लेखक प्रा. असफ ओश्री यांच्या दाव्यानुसार प्रत्येकाला दररोज थोड्याफार टेन्शनचा सामना करावाच लागत असतो. हा तणाव किंवा टेन्शन तुमच्यासाठी कर्मचाऱ्याला जिवंत ठेवतं आणि तुमच्या कामात तुम्हाला अधिक कुशल आणि उत्तम बनवतं. रोज थोडा थोडा तणाव येत असेल, तर काही महिन्यातं तुमच्या कामगिरीत सुधारणा झाल्याचं दिसतं. 

अधिक वाचा - Unhealthy food items : पावसाळ्यात हे पदार्थ अजिबात खाऊ नका, अन्यथा चेहऱ्यावर उठतील पिंपल्स

दिली ही उदाहरणं

आपलं म्हणणं सिद्ध कऱण्यासाठी संशोधकांनी काही उदाहरणं दिली आहेत. परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यावरही एक प्रकारचा तणाव असतो. या तणावामुळे तो परीक्षेची तयारी अधिक जाणीवपूर्वक आणि चांगल्या प्रकारे करू  शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स वाढतो. त्याचप्रमाणं ऑफिसमध्ये दिलेली एखादी असाइमेंट किंवा महत्त्वाच्या मीटिंगची तयारी करण्यासाठीचा तणाव यामुळेही कामगिरीवर चांगला परिणाम होतो. हे तणाव तात्पुरत्या स्वरुपाचे असतात आणि ती घटना घडून गेली की तणाव निघून जातो. हे तणाव आरोग्यासाठी चांगले असल्याचं संशोधनातून दिसून आलं आहे. 

अधिक वाचा - Health Tips : औषधे घेताना चुकुनही करू नका या गोष्टींचे सेवन, आरोग्याला पोचेल हानी

जास्त तणाव धोकादायक

जो तणाव तुम्हाला निष्क्रीय बनवत असेल तो तणाव साधारणतः अतितणाव असतो. अतितणावामुळे मानसिक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. एकाद्या व्यक्तीची तणाव सहन करण्याची क्षमता ही त्याचं वय, परिस्थिती, जेनेटिक लेव्हल यासारख्या अनेक घटकांवर अवलंबून असते. 

डिस्क्लेमर- तणावाबाबतची संशोधनातून समोर आलेली ही निरीक्षणं आहेत. तुम्हाला याबाबत काही गंभीर समस्या असतील,तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेण्याची गरज आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी