Blood Pressure : अचानक बीपी वाढलाय? सर्वात आधी करा ही गोष्ट; घरातच मिळेल उपाय

क्तदाबाची (Blood pressure) समस्या आता सामान्य होत चालली आहे. अगदी कमी वयात रक्तदाबाचा त्रास जाणवतो. अनेकदा रक्तदाबाचा त्रास असल्याची माहिती खूप उशिरा कळते. जागतिक आरोग्य संघटनेच्या (World Health Organization) मते, जगभरात अंदाजे १.१३ अब्ज लोक उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहेत. स्पर्धेच्या युगात जगताना प्रत्येकजण धावपळीचे जीवन जगत असल्याचे पहायला मिळते. वाढत्या स्पर्धेबरोबरच ताण-तणावासारख्या समस्येलाही सामोरे जावे लागत आहे.

Sudden increase in BP? Do this thing first
अचानक बीपी वाढलाय? सर्वात आधी करा ही गोष्ट 
थोडं पण कामाचं
  • भारतातील सुमारे तीस टक्के नागरिक हे रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त आहेत.
  • लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात जे रक्तदाब नियंत्रित करण्यात प्रभावी ठरतात.
  • उच्च रक्तदाबाला नियंत्रणात करण्यासाठी लसणाचा उपयोग फार प्रभावी आहे.

नवी दिल्ली :  रक्तदाबाची (Blood pressure) समस्या आता सामान्य होत चालली आहे. अगदी कमी वयात रक्तदाबाचा त्रास जाणवतो. अनेकदा रक्तदाबाचा त्रास असल्याची माहिती खूप उशिरा कळते. जागतिक आरोग्य संघटनेच्या (World Health Organization) मते, जगभरात अंदाजे १.१३ अब्ज लोक उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहेत. स्पर्धेच्या युगात जगताना प्रत्येकजण धावपळीचे जीवन जगत असल्याचे पहायला मिळते. वाढत्या स्पर्धेबरोबरच ताण-तणावासारख्या समस्येलाही सामोरे जावे लागत आहे. जर तुम्हाला कोणत्याही कारणाशिवाय चक्कर येत असेल, अशक्तपणा जाणवत असेल तसेच अचानक घाम येणे, अस्वस्थ वाटणे आणि श्वास घेण्यात त्राणे, डोकेदुखी, त्वचेवर लालसर पुरळ येणे अशा समस्या दिसून येत असतील तर मात्र याकडे दुर्लक्ष करु नका.ही कारणे रक्तदाबासारख्या आजाराचा संकेत असू शकतात.

भारतातील सुमारे तीस टक्के नागरिक हे रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त आहेत. या आजाराचा परिणाम संपुर्ण शरीरावर होत असून वेळीच खबरदारी घेणे आवश्यक आहे. यामुळे आज आम्ही काही महत्त्वाचे आणि खबरदारी घेण्याजोग्या काही महत्त्वाच्या टिप्स या लेखाच्या माध्यमातून देत आहोत. 

​बीपी कमी करण्यासाठी हे पदार्थ ठरतील फायदेशीर

तुम्हाला रक्तदाब नियंत्रित ठेवायचा असेल तर व्हिटॅमिन सीचे सेवन करा. लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात जे रक्तदाब नियंत्रित करण्यात प्रभावी ठरतात. लिंबूवर्गीय फळांमध्ये तुम्ही विशेषतः द्राक्षे, संत्री आणि लिंबू खाऊ शकता. बाजरीमुळेही बीपी कंट्रोल राहतो. हे खाल्ल्याने तुमचा बीपी कंट्रोलमध्ये राहतो. अँटी ऑक्सिडंट आणि फ्लॅवेनोईडनयुक्त बाजरी केवळ आपल्याला आरोग्यदायीच ठेवत नाही तर अनेक आजारांचा धोका कमी करत असते.

आहारात कडधान्यांचा समावेश केल्याने शरीरातील फायबरचे प्रमाण वाढते व रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. उच्च रक्तदाबाला नियंत्रणात करण्यासाठी लसणाचा उपयोग फार प्रभावी आहे. ब्लडप्रेशर नियंत्रणात आणण्यासाठी दररोज सकाळ-संध्याकाळ मधासोबत एक लसणाची पाकळी खावी. 
रक्तदाबात बदल झाल्यास काय त्रास होतो

ब्लड प्रेशर वाढल्याने रुग्णांना अनेक प्रकारचा त्रास होतो.

जसे डोकेदुखी, छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास, त्वचेवर लाल चट्टे दिसणे. ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी व्यायाम आणि संतुलित आहार या दोन सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. अचानक रक्तदाब वाढल्यास दीर्घ श्वास घेणे आणि संथपणे सोडणे फायदेशीर ठरते. काही मिनीटांकरिता श्वसनाचा व्यायाम करणे फायदेशीर ठरते.

​रक्तदाबावर पाणी अतिशय महत्वाचं

अनेक तज्ञ डॉक्टर कमी रक्तदाब झाल्यानंतर मीठ साखर पाणी पिण्याचा सल्ला देतात. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. त्यामुळे रक्तदाबासारखी समस्या असलेल्या लोकांनी आपल्या सोबत अशा प्रकारचे पाणी बाळगणे योग्य राहील
रक्तदाब वाढल्यास गरम पाण्याने अंघोळ करणे फायदेशीर ठरेल. अंगावर कोमट पाणी घेतल्याने तुमच्या स्नायूंना आराम मिळतो. 

​रक्तदाब अचानक वाढल्यास काय कराल?

अचानक रक्तदाब वाढल्यास भितीने घाबरुन न जाता शांत राहण्याचा प्रयत्न करा आणि वरील घरगुती उपाय करुन पहा. शांत बसून आपले आवडते काम करा आणि दीर्घ श्वास घ्या.डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळच्या वेळी घ्या. मनाने औषध बदलणे, बीपी नियंत्रित ठेवणारी औषधे घेण्यास टाळाटाळ करू नये. 
अस्वस्थ वाटू लागल्यास त्वरीत आपल्या जवळील व्यक्तीस संपर्क साधा, अशावेळी आपल्या सोबत जवळची व्यक्ती असणे योग्य ठरेल.
तणावापासून दूर राहण्याकरिता मेडिटेशन, ध्यानधारणा, योगसाधना करणे उपयुक्त ठरेल.  औषधांमुळे वजन वाढणे, थोडासा थकवा जाणवण्यासारखी लक्षणे दिसत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी