वाढत्या वयासोबत का होते सांधेदुखी? जाणून घ्या कसे ठेवाल आपले सांधे मजबूत

तब्येत पाणी
Updated Oct 17, 2020 | 13:04 IST | टाइम्स नाऊ मराठी

प्रत्येकालाच वाटते की त्याने संपूर्ण आयुष्य तंदुरुस्त राहावे. पण असे प्रत्येकाच्या बाबतीत होईलच हे शक्य नाही. अनेकदा वाढत्या वयाबरोबर अनेक आजार शरीराला ग्रासून टाकतात.

Joint pain
वाढत्या वयासोबत का होतात सांध्याच्या समस्या? जाणून घ्या कसे ठेवाल आपले सांधे तंदुरुस्त आणि मजबूत (प्रातिनिधीक फोटो)  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • मानवी शरीरात सांध्यांमध्ये एक विशिष्ट द्रवपदार्थ असतो
  • सांध्यांसोबतच मांसपेशींवर लक्ष देणेही गरजेचे असते
  • आपल्या दैनंदिन आयुष्यात व्यायामाचा समावेश करा

वाढत्या वयाबरोबर (Growing age) अनेक आजार शरीराला ग्रासून (health issues) टाकतात. सांध्यांचे दुखणे (joint pain) हे यापैकी सर्वात वेदनादायक असते. अनेकदा ही समस्या कमी वयापासूनच त्रास देऊ लागते. मानवी शरीरात (human body) अनेक प्रकारची हाडे (various bones) असतात जी एका विशिष्ट ठिकाणी एकमेकांना जोडलेली (joined on specific spots) असतात. या जागांना आपण सांधे (body joints) म्हणतो. हे सांधे शरीराचे काम व्यवस्थित चालण्यासाठी (bodily movements) मदत करतात. आपल्या दैनंदिन जीवनातील पळणे (running), व्यायाम करणे (exercising) अशा गोष्टी आपण या सांध्यांमुळेच सहजपणे करू शकतो.

वाढत्या वयासोबत उद्भवते सांध्यांचे दुखणे

वाढत्या वयासोबत आपल्याला सांध्यांच्या समस्या चालू होऊ शकतात. या सांध्यांमध्ये एक चिकट द्रवपदार्थ असतो. वाढत्या वयासोबत हा द्रवपदार्थ कमी कमी होऊ लागतो. यामुळे सामान्यतः उठता-बसताना आणि चालताना त्रास होतो. सोबतच सांधेदुखीही चालू होते. पण जर आपण कमी वयापासूनच याची काळजी घेतली तर सांधे मजबूत ठेवता येतात.

कसे ठेवाल आपले सांधे तंदुरुस्त?

सांध्यांचे आरोग्य राखण्यासाठी आपण चार उपाय करू शकता. जास्तीत जास्त पायी चालणे किंवा पळणे यासोबतच सांध्यांच्या आरोग्यासाठी व्यायामही अत्यंत गरजेचा आहे. तसेच आपल्याला मांसपेशींचीही काळजी घ्यावी लागते. जर आपण या गोष्टींवर नियमित लक्ष दिले तर आपल्याला सांध्यांच्या समस्या टाळता येतील. हे चार उपाय आपल्यासाठी सहाय्यक ठरू शकतात.

1. शक्तिप्रशिक्षण

यामुळे मांसपेशी मजबूत होतात. अशा व्यायामाने सांधेही चांगले राहतात आणि सांधेदुखीही कमी होते. या प्रशिक्षणात सुरुवातील हलके वजन उचलण्यास सुरुवात करावी आणि हळूहळू वजन वाढवत न्यावे. मांसपेशींमध्ये तणाव निर्माण होऊ नये यासाठी वजन उचलण्याची पद्धत योग्य आहे याची खात्री करून घ्या.

2. खेळण्यावर लक्ष द्या

सायकलिंग आणि पोहणे यासारखे व्यायामही सांध्यांच्या आरोग्यासाठी चांगले असतात. बास्केटबॉल किंवा टेनिससारखे खेळही आपण खेळू शकता. यामुळे मांसपेशी आणि सांधे मजबूत राहतात. हे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठीही उत्तम असते. जर आपण अशा काही खेळांचा समावेश आपल्या दिनचर्येत केला तर आपण मानसिकदृष्ट्याही आरोग्यपूर्ण राहाल.

3. हृदयाशी संबंधित व्यायाम

हृदयाशी संबंधित व्यायामांनी (कार्डिओ एक्सरसाईझ) आपल्या हृदयासोबतच फुफ्फुसेही चांगली राहतात. तसेच हे आपल्या सांध्यांसाठीही चांगले असतात. जॉगिंग किंवा पळण्याने चांगला प्रभाव पडतो. दोरीच्या उड्या मारल्याने हृदयासोबतच सांधेही चांगले राहतात. पण आधीपासूनच सांधेदुखी असलेल्यांनी हे व्यायाम करू नयेत. त्यांचा त्रास वाढू शकतो.

4. स्ट्रेचिंग

अनेक लोक स्ट्रेचिंगकडे फक्त वॉर्मअप म्हणून पाहतात. पण ते यापेक्षा अधिक काम करते. जर आपण कोणताही व्यायाम करत नसाल तर स्ट्रेचिंग आपल्या सांध्यांना चांगले राखू शकते. सोबतच आपले शरीर लवचिक आणि मांसपेशी मजबूत करते.

फक्त आपण सुरुवातीपासूनच आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. व्यायामाचा समावेश आपल्या दैनंदिन आयुष्यात अवश्य करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी