Sugarcane Juice for diabetes: मधुमेह असल्यास उसाचा रस पिणे किती सुरक्षित? वाचा सविस्तर

Sugarcane Juice good or bad for diabetes: उसाचा रस गोड असल्याने तो सर्वांनाच फार आवडतो. त्यामध्ये अनेक पोषकतत्त्वे असल्याने आरोग्याला फायदे सुद्धा होतात. मात्र, मधुमेह असलेल्या रुग्णांनी उसाचा रस प्यावा की नाही? जाणून घ्या...

sugarcane juice for diabetes is good or bad health tips in marathi
Sugarcane Juice for diabetes: मधुमेह असल्यास उसाचा रस पिणे किती सुरक्षित? वाचा सविस्तर (प्रातिनिधिक फोटो)  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मधुमेह असल्यास उसाचा रस प्यावा की नाही?
  • उसाचा रस पिण्याचे काय आहेत फायदे आणि तोटे?

Sugarcane Juice for diabetes: उसाचा रस चवीला गोड असतो आणि थंडावा सुद्धा मिळतो त्यामुळे उन्हाळ्यात उसाचा रस पिण्याला अनेकजण प्राधान्य देतात. केवळ भारतात नाही तर आफ्रिकन, आशियाई देशात उस खूप आवडतो. नैसर्गिक असण्यासोबतच आरोग्याला त्याचे अनेक फायदे होऊ शकतात. यकृत, मूत्रपिंड आणि आरोग्याच्या इतर आजारांवर उपचारासाठी याचा वापर केला जातो. उसाचा रस खूपच चवदार आणि गोड असतो. पण मधुमेह असलेल्यांनी उसाचा रस प्यावा की नाही? मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी उसाचा रस पिणे किती सुरक्षित आहे? जाणून घ्या...

उसाचा रस काढताना त्यात सामान्यत: लिंबू मिसळला जातो. खासकरुन उन्हाळ्यात त्याचा खूप फायदा होतो. गुळ, ब्राऊन शुगर आणि साखर बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. उसाचा रस म्हणजे पूर्णपणे साखर नसते यामध्ये 70 ते 75 टक्के पाणी असते, 10 ते 15 टक्के फायबर आणि 13 ते 15 टक्के साखर असते.

हे पण वाचा : कमी झोपणाऱ्यांनो सावधान..., आरोग्याला होऊ शकते मोठे नुकसान

उसाचा रस तयार करताना त्यावर प्रक्रिया केली जात नाही. त्यामुळे तो फेनॉलिक आणि फ्लेववॉईड अँटीऑक्सिडंट्सचा चांगला स्त्रोत आहे. याच अँटिऑक्सिडंट्समुळे ते आरोग्यदायक मानले जाते. यामध्ये पोटॅशियम सुद्धा असते. जे त्याच्या हायड्रेटिंग गुणधर्मासाठी ओळखले जाते. 15 सायकलिस्ट अ‍ॅथलेटिक्सवर उसाच्या रसाने टेस्ट करण्यात आली. या टेस्टमध्ये असे समोर आले की, त्यांचा परफॉर्मन्स खूप चांगला झाला आणि शरीर हायड्रेट केलं. इतकेच नाही तर अ‍ॅथलेटिक्सच्या रक्तातील साखरेचे प्रमाणही वाढले.

हे पण वाचा : लग्न करण्याचे तोटे, वाचल्यावर म्हणाल काय खरे अन् काय खोटे

उसाच्या रसात किती साखर असते?

एक कप म्हणजेच 240 मिली उसाच्या रसात

कॅलरी - 183 

प्रोटीन - 0 ग्रॅम

फॅट - 0 

साखर - 50 ग्रॅम

फायबर  0 ते 13 ग्रॅम

एक कप उसाच्या रसात 50 ग्रॅम साखर असते जी 12 चमचे इतकी असते. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, पुरुषांनी दिवसातून 9 चमचे आणि महिलांनी 6 चमचांहून अधिक साखर खाणे टाळावे.

हे पण वाचा : सिझेरियन डिलिव्हरीनंतर या गोष्टी अजिबात करू नका

मधुमेह असलेल्या व्यक्तींनी उसाचा रस प्यावा का?

मधुमेह असलेल्या व्यक्तींना गोड किंवा साखरयुक्त पदार्थ खाणे टाळण्याचा सल्ला देण्यात येतो. तसेच उसाच्या रसापासून दूर राहणे चांगले मानले जाते. उसाच्या रसात असलेले साखरेचे प्रमाण तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकते त्यामुळे ते पिणे टाळा. 

(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ला म्हणून घेऊ नका. या संदर्भात आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी