summer drink onion juice recipe and health benefits : एरवी पदार्थांना रुचकर करण्यासाठी वापरला जाणारा कांदा आरोग्यदायी सरबत म्हणून वापरता येतो. आतापर्यंत ग्रेव्ही, भाजी, सॅलड तयार करण्यासाठी तसेच कच्च्या स्वरुपात खाण्यासाठी कांद्याचा वापर केलेला अनेकांनी बघितला असेल. पण कांद्यपासून तयार केलेले सबत बघितले आहे का?....
आरोग्य - वेबस्टोरी । तब्येत पाणी
कांद्यापासून तयार केलेले सरबत प्या. दररोज एक ग्लास कांद्याचे सरबत प्यायल्यास उष्माघातापासून संरक्षण होते. तसेच चेहऱ्यावरील सुरकुत्या हळू हळू कमी होऊ लागतात. थोडक्यात सांगायचे तर कांद्याचे सरबत उन्हाळ्याच्या दिवसांत आरोग्यदायी आहे. चला तर मग जाणून घेऊ कांद्याचे सरबत तयार करण्याची कृती...
हिरवा कांदा (किमान २ ते ४), चवीपुरता गुळ, अर्धा चमचा काळे मीठ, पाव चमचा व्हॅनिला इसेंस, एक चमचा लिंबूरस, हवा असल्यास एक बाटली किंवा एक ग्लास थंड सोडा, हवे असल्यास बर्फाचे खडे (आइस क्यूब)
हिरवा कांदा चिरून घ्या. कांद्याचे तुकडे पाण्यात धुवून स्वच्छ करा आणि मिक्सरच्या भांड्यात टाका. या भांड्यात कांद्यावर गुळ, काळे मीठ, लिंबूरस टाकून मिश्रण मिक्सरमध्ये फिरवा. मिक्सरच्या भांड्यात तयार झालेल्या सरबतावर व्हॅनिला इसेंस ओता आणि पुन्हा हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवा. मिक्सरच्या तळाशी उरलेला कांदा काढून चावून खा आणि सरबतरुपी मिश्रण एक ग्लासमध्ये ओतून घ्या. कांद्याच्या सरबतात इच्छेनुसार सोडा मिसळा, आइसक्यूब टाका. या थंड कांद्याच्या सरबतासोबत पुदिना मिसळून सरबत आणखी रुचकर करता येईल.