Diet option Lassi: वजन कमी करताय? लस्सी आहे उत्तम पर्याय

तब्येत पाणी
Updated Jun 04, 2019 | 18:39 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Diet option Lassi: लस्सीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पोषक तत्वे असतात. ज्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. लस्सीमध्ये आरोग्याला लागणारे चांगले बॅक्टेरिया असतात. ज्यामुळे पोटातील तक्रारी दूर होऊ शकतात.

Lassi
गुणकारी लस्सी  |  फोटो सौजन्य: Instagram

नवी दिल्ली : मान्सूनची चाहूल लागली असती तरी, उष्मा अजूनही कमी झालेला नाही. या असह्य उकाड्यात दिलासा मिळावा म्हणून अनेकजण सोडा युक्त कोल्ड्रिंक्सचा आधार घेतात. पण, या सोडा युक्त कोल्ड्रिंक्सचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे वजन झपाट्याने वाढण्याचा धोका असतो. त्यामुळेच उन्हाळ्यात या कोल्ड्रिंक्स ऐवजी लस्सी पिणं जास्त फायद्याचं ठरतं. यामुळं वजन वाढण्याचा धोका तर राहत नाहीच पण, वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त ठरू शकतं. लस्सीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पोषक तत्वे असतात. ज्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. लस्सीमध्ये मानवी शरिराला लागणारे चांगले बॅक्टेरिया असतात. ज्यामुळे पोटातील तक्रारी दूर होऊ शकतात. आतडी मजबूत होतात. तसेच पोट थंड ठेवण्यासही लस्सीमुळं मदत होते. त्यामुळं नियमित लस्सी पिण्याचा सल्ला दिला जातो. वजन कमी करण्याचा प्रयत्न करताना डाएटिंगला कंटाळला असाल तर, लस्सीचा पर्याय अतिशय उत्तम आहे. या गुणकारी लस्सीच्या फायद्यांवर एक नजर टाकूया. 

लस्सी आपल्याला कशी फायदेशीर ठरते?

  1. वजन कमी करण्यासाठी- लस्सीमध्ये खूप कमी प्रमाणात कॅलरीज् असतात. त्यामुळं शरीरात फॅट्स तयार होत नाहीत. इतर पदार्थांमध्ये असणारे फॅट्स अन्न नलिकेच्या आत अवरण तयार करतात. परंतु, लस्सी पिल्याने अन्न नलिकेवर कोणताही परिणाम होत नाही.
  2. इम्युनिटी वाढवण्यासाठी - लस्सी व्हिटामीन डी आणि लॅक्टिक अॅसिडचा एक उत्तम स्रोत आहे. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. रोज लस्सी प्यायल्यामुले शरीराची रोगप्रतिकारक शक्ती अतिशय चांगल्या पद्धतीने काम करू लागते. तसेच शरीराची चयापचय क्रिया वाढवते. त्यामुळे शरीरात अतिरिक्त फॅट्स तयार होत नाहीत. परिणामी अतिरिक्त वजन वाढत नाही.
  3. पोटाच्या तक्रारी दूर होतात - लस्सी पर्यायाने प्रोबायोटिक म्हणून ओळखली जाते. त्यामुळे पोटातील पचनाशी संबंधित समस्या दूर होण्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते. लस्सीमध्ये सापडणारे लॅक्टोबॅकिलस आतड्याची कामे सुधारण्यात फायदेशीर ठरते. त्यामुळे पोटाशी संबंधित तक्रारी उदाहरणार्थ, अल्सर, गॅस्ट्रिटिस तसेच अमिबियासिस सारख्या तक्रारी दूर होतात.
  4. पचन क्रिया सुधारते - लस्सीमध्ये लॅक्टोबॅकिलस असते. त्यामुळे आतडी चिकट राहतात. त्याचा परिणाम पचन क्रिया चांगली होण्यासाठी होतो. अपचनासारख्या तक्रारी दूर होतात. त्यामुळे अशा तक्रारी असलेल्यांना नियमितपणे लस्सी पिणे फायद्याचे ठरू शकते. कारण पचन क्रिया सुधारताना वजनही वाढत नाही.
  5. शरीराला ऊर्जा मिळते - लस्सीमध्ये पुरेशा प्रमाणात प्रोटीन, व्हिटामिन, मिनरल, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि अन्य आवश्यक जीवनसत्वे असतात. त्यामुळे लस्सी शरीरात ऊर्जा निर्माण करण्यास मदत करते. त्यामुळे शरीरात ऊर्जा वाढते तसेच पोटाच्या आजूबाजूला तयार झालेले अतिरिक्त मेद अर्थात फॅट कमी होते.
  6. स्नायूंना बळकटी - लस्सीमध्ये असणाऱ्या प्रोटीनचा परिणाम शरिरातील स्नायूंवर होतो. लस्सीमुळे बोन मिनरल डेंसिटी सुधारते. स्नायूंना बळकटी मिळते. लस्सी प्रामुख्याने दही आणि पाणी यांच्या मिश्रणातून तयार केली जाते. एखाद्य सोडा युक्त पेयापेक्षा कितीतरी पटीने त्यात पाण्याचा अंश असतो. त्यामुळे डिहायड्रेशनसारखी तक्रार उद्भवत नाही.

 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Diet option Lassi: वजन कमी करताय? लस्सी आहे उत्तम पर्याय Description: Diet option Lassi: लस्सीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पोषक तत्वे असतात. ज्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. लस्सीमध्ये आरोग्याला लागणारे चांगले बॅक्टेरिया असतात. ज्यामुळे पोटातील तक्रारी दूर होऊ शकतात.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola