उन्हाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल, तर हे ५ पेय फायदेशीर

तब्येत पाणी
Updated May 20, 2019 | 19:56 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

उन्हाळ्यात वेगवेगळ्या प्रकारची इन्फेक्शन, सन स्ट्रोक आणि अशा अनेक आजारांचा त्रास उद्भवतो. आपली रोगप्रतिकारक शक्ती त्यावेळी कमी पडते. मग ही रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी हे खास ५ पेय खूप फायदेशीर ठरतात.

Summer Juices
रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी घ्या हे ५ ज्यूस  |  फोटो सौजन्य: Getty Images

Summer Tips : उन्हाळा सुरू होताच विविध आजारांचा धोका वाढायला सुरूवात होते. पावसाळ्यात तर डेंग्यू-चिकनगुनियासारखे गंभीर आजार जलदगतीनं पसरतात. फूड पॉइजनिंग, विविध इन्फेक्शन सारखे आजार ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे. त्यांच्यावर लगेच प्रभाव पाडतात. तर डेग्यू, चिकनगुनिया सारख्या आजारांमध्ये रूग्णाची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर त्याला सहजपणे रिकव्हर होता येतं.
उन्हाळ्यात म्हणूनच कमीतकमी हे खालील पाच पेय आपल्या डाएटमध्ये अवश्य सहभागी करून घ्यावेत, ज्यामुळं आपण या आजारांपासून वाचू शकाल. कारण या पेयांमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसंच या पेयांमुळे शरीर डिहायड्रेशन पासून पण रक्षण करू शकतं.

जाणून घ्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीचे हे खास ५ पेय

टोमॅटोचा ज्यूस

टोमॅटोचा ज्यूस आपण खूप सहजपणे घरी बनवू शकतो. आपल्या डाएटमध्ये टोमॅटो ज्यूसचा अवश्य सहभाग करून घ्या. व्हिटॅमिन सी आणि हायड्रेटिंग न्यूट्रीएंट्सनं परिपूर्ण असलेल्या टोमॅटो ज्यूसमध्ये फोलेट सुद्धा असतं आणि त्यामुळे इन्फेक्शनपासून बचाव होतो.

ओव्याचा रस

ओव्याचा रस खूप हायड्रेटिंग असतो आणि म्हणूनच उन्हाळ्यात पिण्यासाठी हा रस उत्तम असतो. आपल्याला जर वजन कमी करायचं असेल तर ओव्याचा रस प्यायल्यानं त्यासाठीही मदत मिळते. ओव्यात व्हिटॅमिनी ए, ई, सी, फोलिक ऍसिड आणि सोडियम भरपूर प्रमाणात असतं. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं आणि शरीरात प्रवेश करणाऱ्या किटाणूंना मारण्याचं काम ओव्याचा रस करतो.

आलं आणि लसणाचा रस

शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचं काम आलं-लसणाचा रस करतो. या दोन्हीमध्ये डिटॉक्सिंगचा गुण असतो आणि शरीराला सुरक्षित आणि स्वस्थ ठेवण्याचं काम ते करतं. आलं हीट स्ट्रोकपासून बचाव करण्याचं काम करतो तर लसूण कॅन्सरसारख्या गंभीर आजारापासून बचाव करतो. लसूण आणि आल्याचा रस चवीला कडू असल्यामुळे बॅलेन्स करण्यासाठी आपण भाज्यांच्या रसात मिसळून हा रस प्यावा.

टरबूज आणि सब्जा

टरबूज आणि सब्जा यांना मिसळून केलेला रस खूप चविष्ट लागतो. आपल्या आरोग्यासाठीही हा रस फायदेशीर आहे. टरबूज आणि सब्जाचा रस खूप हायड्रेटिंग आहे आणि रोगप्रतिकारक शक्ती ही वाढवते. व्हिटॅमिन ए, सी आणि बी ६ यांनी परिपूर्ण असलेला हा रस आपलं इन्फेक्शनपासून रक्षण करतो.

सफरचंदाचा रस

एक ग्लास सफरचंदाचा रस आपल्याला डॉक्टरांपासून जाण्यापासून वाचवतो. सफरचंदाचा रस शरीरातील सूजही कमी करतो. इलिनोईस विद्यापीठ, शिकागो द्वारे केल्या गेलेल्या एका अभ्यासानुसार सफरचंद रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. हिवाळ्यात अधिक चांगल्या परिणामासाठी आपण सफरचंदासोबतच गाजराचा ज्यूस मिळून घेऊ शकतो.


 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी