Summer Drinks in marathi: उन्हाळ्यात नक्की 'हे' 5 पेय, शरीराला देतील थंडावा अन् आजार पळवतील दूर

Summer Special Drinks in marathi: उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता जाणवते आणि अशा स्थितीत अशा शीतपेयांची तुम्हाला गरज असते जे तुम्हाला हायड्रेट ठेवतात. जाणून घेऊयात असे कोणते पेय आहेत जे तुम्हाला उन्हाळ्यात एनर्जी तर देतीलच आणि त्यासोबतच आजारांपासूनही बचाव करतील.

summer special drinks famous in india for refresh and get energy read health tips in marathi
Summer Drinks: उन्हाळ्यात नक्की 'हे' 5 पेय, शरीराला देतील थंडावा अन् आजार पळवतील दूर (Photo: Pexels) 
थोडं पण कामाचं
  • उन्हाळ्यात घ्या हे शीतपेय
  • हे शीतपेय एनर्जी देण्यासोबतच आजारांपासूनही तुमचं संरक्षण करतील

Summer Special Drinks in marathi: उन्हाळ्यात कडाक्याच्या ऊन आणि घाम यामुळे आपल्याला थकवा जाणवतो. त्यामुळे उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणं गरजेचं असतं. उन्हाळ्यात अनेक प्रकारचे शीतपेय आणि हेल्दी ड्रिंक्सचे सेवन जे तुम्हाला दिवसभर एनर्जी देऊ शकतात. त्यासाठी तुम्ही व्हिटॅमिन सी युक्त फळांचा ज्युस घेऊ शकतात. जाणून घेऊयात अशाच काही शीतपेयांच्या संदर्भात...

लिंबू पाणी

उन्हाळ्यात बहुतेक जणांना लिंबू पाणी प्यायला आवडते. लिंबू पाणी तयार करण्याची प्रक्रिया खूपच सोपी आहे आणि खूपच कमी वेळात होते. सोड्यामध्ये लिंबू पिळून त्यात काळे मीठ आणि साखर मिसळा. अवघ्या दोन मिनिटांत तुमचं लिंबू पाणी तयार होईल. उन्हाळ्यात तुम्ही नियमितपणे लिंबू पाणीचे सेवन करुन शकता.

हे पण वाचा : म्हणून लहान मुले माती किंवा खडू खातात

लीची ज्यूस

लीचीचे सेवन करुन तुम्ही शरीरात व्हिटॅमिन सी ची कमतरता पूर्ण करु शकता. हे फळ इतर अनेक फळांच्या तुलनेत जास्त पोषक तत्वांनी समृद्ध आहे. उन्हाळ्यात तुम्ही लीची पासून बनवलेलं पेय पिऊ शकता. लीचीच्या ज्यूसमध्ये सोडा किंवा ताज्या पुदीनाचे काही पानं मिसळू शकता.

हे पण वाचा : जास्त तहान लागणे आजारपणाचे लक्षण?

कलिंगड ज्यूस

कलिंगडमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते. तुम्हाला दीर्घकाळ हायड्रेट ठेवण्याचं काम हे करतं. तसेच रसदार आणि गोड असलेले कलिंगड तुमची तहान भागवण्यासाठी खूपच चांगलं ड्रिंक आहे.

हे पण वाचा : निरोगी आणि मजबूत हिरड्या हव्या आहेत? मग हे करा

स्ट्रॉबेरी ज्यूस

स्ट्रॉबेरी दिसण्यासाठी सुंदर आहे. शरीरासाठीही स्ट्रॉबेरी अत्यंत गुणकारी आहे. हे व्हिटॅमिन सी चा उत्तम स्त्रोत आहे. याच्या व्यतिरिक्त कॅल्शियम आणि फॉस्फोरस सारखे पोषक घटक असतात. उन्हाळ्यात तुम्ही स्ट्रॉबेरी ज्यूसचा आपल्या आहारात समावेश करु शकता.

संत्रीचा ज्यूस

व्हिटॅमिन सी चा संत्री हा एक उत्तम स्त्रोत आहे. उन्हाळ्यासाठी हे एक चांगले पे आहे. घरी सुद्धा तुम्ही ताजा आणि चवदार असा संत्रीचा ज्यूस बनवू शकता. संत्रीचा ज्यूस अनेक आजारांपासून लढण्यासाठी तुम्हाला मदत करतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी