उन्हामुळे करपलेल्या चेहऱ्यावर लावा हे घरगुती फेस पॅक, सन टॅनिंग होईल १० मिनिटांत गायब

तब्येत पाणी
Updated Apr 23, 2019 | 19:21 IST | टाइम्स नाऊ हिंदी

आता उन्हाळा सुरू आहे. त्यामुळं आपल्या त्वचेची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. चेहऱ्यावरील सन टॅन घालविण्यासाठी आपण काही घरगुती फेस पॅक बनवून त्याचा वापर करू शकता. यानं १० मिनीटांमध्ये आपल्याला फरक जाणवेल.

Sun Tan
उन्हाळ्यात घ्या त्वचेची काळजी  |  फोटो सौजन्य: Getty Images

मुंबई: आपली त्वचा नेहमी हेल्दी आणि उजळ असावी, असं प्रत्येकालाच वाटत असतं. मात्र या रखरखत्या उन्हात चेहऱ्यावरचं तेज नष्ट होतं. उन्हाळ्याचा सर्वात वाईट परिणाम आपल्या चेहऱ्यावर होतो. उन्हामुळं चेहरा करपतो. त्यामुळं आता उन्हाळ्यात आपल्या त्वचेची काळजी करणं खूप आवश्यक आहे. उन्हाळ्यात गरम हवेमुळं त्वचा ड्राय होते आणि फाटायला लागते.

अशातच त्वचेची काळजी घेणं गरजेचं होऊन बसतं. आपण कितीही सनस्क्रीम लोशन लावा, चेहरा झाकून बाहेर निघा, तरीही ड्राय स्कीनची समस्या तशीच राहते. जर सूर्याच्या किरणांमुळे आपली त्वचा टॅन झाली तर चेहऱ्याचा रंग काळवंडतो. म्हणून त्यासाठी आम्ही आपल्याला काही घरगुती फेस पॅक सांगतोय, ते वापरल्यास आपल्याला नक्की फायदा होईल.

बघा असे बनवायचे हे घरगुती फेस पॅक

हळद आणि बेसनचा पॅक

पॅक बनविण्यासाठी लागणारी सामग्री – २ मोठे चमचे बेसन, १ चिमुट हळद, १ मोठा चमचा गुलाब जल, १ चमचा दूध

बनविण्याची कृती – या सर्व वस्तू एकत्र करून घ्यावेत. हा पॅक चेहरा स्वच्छ धुवून त्यावर लावावा. २० मिनीटं पॅक तसाच चेहऱ्यावर राहू द्यावा. पॅक वाळल्यानंतर पाण्यानं चेहरा ओला करत स्क्रब करावं आणि पॅक काढावा.

एलोव्हेरा, मसूर डाळ आणि टोमॅटो पॅक

पॅक बनविण्यासाठी लागणारी सामग्री – १ मोठा चमचा लाल मसूर डाळीची पावडर, १ चमचा एलोव्हेराचा रस

पॅक बनविण्याची कृती – मसूरच्या डाळीचं पावडर टोमॅटोचा रस आणि एलोव्हेरासोबत मिसळून एक घट्ट पेस्ट तयार करावी. हा फेस पॅक चेहऱ्यावर लावावा आणि अर्धा तास तसाच असू द्यावा. नंतर थंड पाण्यानं चेहरा धुवून घ्यावा. बेस्ट रिझल्टसाठी आठवड्यातून दोनदा हा फेस पॅक लावावा.

लिंबाचा रस, काकडी आणि गुलाब जल पॅक

पॅक बनविण्यासाठी लागणारी सामग्री – १ मोठा चमचा लिंबाचा रस, १ मोठा चमचा काकडीचा रस, १ मोठा चमचा गुलाब जल

पॅक बनविण्याची कृती – वरील सर्व सामग्री चांगल्या प्रकारे एकत्र मिसळा आणि टॅनिंग झालेल्या ठिकाणी त्वचेवर लावा. १२ मिनीटं हा पॅक लावून ठेवावा नंतर धुवून टाका, असं दररोज करा.

 

डिस्क्लेमर: वरील लेखात सांगण्यात आलेल्या टीप्स आणि सल्ला या माहितीसाठी आहे आणि याला डॉक्टरांचा सल्ला समजू नये. आपल्याला कोणत्याही फिटनेस प्रोग्राम किंवा डाएटमध्ये बदल करायचा असेल तर आपल्या डॉक्टरचा सल्ला अवश्य घ्यावा.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी