Summer Tips: उन्हाळ्यात डिहायड्रेशनपासून बचावासाठी खास टिप्स!

तब्येत पाणी
Updated May 11, 2019 | 16:20 IST | टाइम्स नाऊ हिंदी

उन्हाळ्यात पाणी अधिक प्यायला हवं, कारण उन्हाळा आणि त्यात जर तुम्ही अधिक वेळ बाहेर घालवत असाल तर शरीरातील द्रवाची हानी होऊ शकते. जाणून घ्या उन्हाळ्यात होणाऱ्या डिहायड्रेशनपासून बचाव कसा करावा...

Summer Tips
उन्हाळ्यातील खास टिप्स   |  फोटो सौजन्य: Getty Images

मुंबई: उन्हाळ्यात खूप घाम येत असल्यामुळं या ऋतूमध्ये प्रौढ व्यक्तीच्या शरीरात पाण्याची गरज ५०० मिलीलीटर असते. यामुळे काळजी घेत भरपूर पाणी पिणं आवश्यक आहे ज्याचा फायदा म्हणजे आपल्याला सन स्ट्रोक म्हणजेच लू पासून बचाव करण्यास मदत करतं. खूप काळ उन्हात राहिल्यानं होणाऱ्या सर्वात कॉमन तीन समस्या म्हणजे मुरडा, थकवा आणि हीट स्ट्रोकचा समावेश आहे. खूप घाम निघाल्यानं लघवी आणि लाळीच्या रुपात शरीरातील द्रव पदार्थ तसंच इलेक्ट्रोलाइट्सचं नैसर्गिक नुकसान होतं, ज्यामुळं डिहायड्रेशन आणि इलेक्ट्रोलाईट्सचं तीव्र असंतुलन होऊ शकतं.

खूप वेळ उन्हात राहिल्यानं शारीरिक क्रिया, उपवास, तीव्र आहार, काही औषधी आणि आजार आणि संक्रमणामुळं निर्जलीकरण कधीही आणि कुठेही होऊ शकतं. याचे साधे लक्षणं म्हणजे थकवा, चक्कर येणं, डोकेदुखी, डार्क पिवळ्या रंगाची लघवी, तोंडाचा कोरडेपणा आणि चिडचिडपणा यांचा समावेश आहे. म्हणून या ऋतूमध्ये स्वत:ला हायड्रेटेड ठेवण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी पित राहणं आवश्यक आहे.

उन्हाळ्यातील या खास टिप्स:

  1. खाण्याच्या पदार्थांसाठी हे सूत्र लक्षात ठेवा: अन्न गरम करावं, उकळावं, शिजवावं, सोलावं.
  2. अस्वच्छ पाण्यापासून तयार झालेला बर्फ वापरू नये.
  3. जी फळं आणि भाज्या कापून/चिरून उघड्यावर ठेवल्या असतील तर त्यांचं सेवन करू नये. रस्त्यांवर विकला जाणारा ऊसाचा रस पिऊ नये. तसंच रस्त्याच्या कडेला ग्लासात पाणी पिण्यापासून स्वत:ला रोखावं.
  4. उन्हाळ्यात घरातील तापमानात २ तासांहून अधिक काळ ठेवलेलं जेवण करू नये.
  5. रस्त्यावर विकली जाणारी काकडी, गाजर, टरबूज इत्यादींचं सेवन करू नये, जोपर्यंत हे फळं पूर्ण पणे स्वच्छ केले जाणार नाहीत तोपर्यंत ते खाणं टाळा.
  6. कोणतंही जेवण किंवा द्रव पदार्थ खाण्यापूर्वी गरम केलं गेलं जात असेल, तर संक्रमणचं कारण बनू शकत नाही. कोणतंही द्रव किंवा पाणी जर उपयोग करण्यापूर्वी उकळलं जात असेल तर संक्रमण होऊ शकत नाही.
  7. कोणतंही फळ जे हातांनी सोललं जावू शकतं उदाहरणार्थ केळी आणि संत्र तर ते सुद्धा संक्रमणाचं कारण बनू शकत नाही.
  8. उन्हाळ्यात खूप घाम जात असल्यानं प्रौढांमध्ये पाण्याची आवश्यकता ५०० मिलीलीटर पर्यंत वाढते. उन्हाळा म्हणजे टायफाईड, कावीळ आणि अतिसार होण्याचा ऋतूही आहे. हे आजार होण्याचे काही कारण म्हणजे मुबलक प्रमाणात पाणी न पिणं आणि जेवण, पाणी हातांची योग्य स्वच्छता न करता खाण्यापिण्यानी होऊ शकतात. लवकी, दोडके, तोंडली, भोपळा या उन्हाळ्यातील भाज्या आहेत, या भाज्या वेलीवर लागतात. या सर्व भाज्यांमध्ये पाण्याचं प्रमाण अधिक असतं आणि हे लघवीचं प्रमाण वाढवणाऱ्या भाज्या आहेत.

(वरील लेखामध्ये दिलेल्या टिप्स आणि सल्ला केवळ साधारण माहिती आहे आणि ही माहितीय तज्ज्ञांकडून मिळालेली आहे, असं समजू नये. कोणत्याही प्रकारचा फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या डाएटमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांकडून सल्ला अवश्य घ्यावा.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी