सुषमा स्वराज यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू, जाणून या आजाराचे कारण आणि उपाय

तब्येत पाणी
Updated Aug 07, 2019 | 10:06 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

सुषमा स्वराज यांचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मंगळवारी रात्री निधन झाले. त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले. जाणून घ्या या आजाराबाबत

sushama swaraj
सुषमा स्वराज 

थोडं पण कामाचं

 • अनेकदा हृदयविकाराचा झटका जास्त ताण घेतल्याने येतो
 • सध्याची बिघडलेली जीवनशैली यास कारणीभूत आहे
 • धावपळीच्या युगात जे लोक आपली ८ तासांची झोप पूर्ण करू शकत नाहीत त्यांना याचा त्रास होतो

मुंबई: भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेता सुषमा स्वराज यांचे मंगळवारी ६ ऑगस्टला रात्री हृदविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते, पाच डॉक्टरांची टीम त्यांच्या स्थितीवर सतत लक्ष देऊन होती. मात्र त्यानंतरही त्यांना वाचवण्यात यश आले नाही. हृदयविकाराचा झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. सध्याच्या जीवनशैलीत हृदयविकाराचा झटका ही सामान्य बाब झाली आहे. हृदयविकाराला कोणतेही वय नसते. केवळ वृद्ध व्यक्तींनाच नव्हे तर ३० वर्ष वयातही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. 

अनेकदा झोपेत असताना असा झटका येतो आणि माणसाचा मृत्यू होतो. जाणून घ्या हृदयविकाराची कारणे आणि त्यापासून वाचण्याचे उपाय

Heart disease

या कारणांमुळे येतो हृदयविकाराचा झटका

 1. तणाव आणि स्ट्रेस - अनेक कारणांमुळे हृदयविकाराचा झटका हा प्रचंड ताण घेतल्याने येतो. तणाव मोठ्या प्रमाणात आपल्या जीवनशैलीवर प्रभाव टाकतात. यामुळे हृदयाच्या गतीवरही परिणाम होतो. 
 2. खराब लाईफस्टाईल - सध्याची धावपळीची जीवनशैली माणसाला हृदयरोगाची शिकार बनवत आहे. आपल्या या अशा लाईफस्टाईलमुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळत आहे. 
 3. लठ्ठपणा आणि वाढलेले वजन - जर तुम्ही तुमच्या वाढलेल्या वजनावर लक्ष देत नाही आहात तर हे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले नव्हे. यामुळे कोलेस्ट्रॉल वाढते आणि हाय बीपी तसेच हृदयरोगाचा धोका असतो. 
 4. कोलेस्ट्रॉलचा वाढता स्तर - जर शरीरात कोलेस्ट्रॉलचा स्तर वाढलेला असेल तर हे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले नाही. शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयरोगाची शक्यता वाढते. 
 5. हाय बीपी अथवा डायबिटीज - या दोन कारणांमुळेही तुम्हाला हृदयरोगाचा धोका होऊ शकतो. 


High blood pressure or hypertension: Home remedies and natural treatments for the heart condition

हृदयरोगाच्या धक्क्यापासून वाचण्यासाठी उपाय

 1. ग्रीन टी - ग्रीन टीमध्ये अँटी ऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी होण्यास मदत होते तसेच ब्लड प्रेशरही नियंत्रणात राहतो. 
 2. ऑलिव्ह ऑईल - जेवण बनवताना नेहमी ऑलिव्ह ऑईलचा वापर करा. यात चांगले फॅट्स असतात जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात
 3. फायबरने परिपूर्ण जेवण -  तुम्ही जेवणात भरपूर सलाड, फळे आणि भाज्यांचा समावेश करा. यामुळे चांगले कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते. 
 4. सिगारेट ठेवा दूर - तंबाखूमुळे तब्बल ५० टक्के लोकांना हृदयविकाराचा धोका असता. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये याचे प्रमाण अधिक दिसते
 5. चांगली झोप - सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये जे लोक आपली ८ तासांची झोप पूर्ण करू शकत नाहीत त्यांना हृदयरोगाचा धोका अधिक असतो. झोप न पूर्ण झाल्याने स्ट्रेस हार्मोन वाढतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
सुषमा स्वराज यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू, जाणून या आजाराचे कारण आणि उपाय Description: सुषमा स्वराज यांचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मंगळवारी रात्री निधन झाले. त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले. जाणून घ्या या आजाराबाबत
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...