समुद्राच्या पाण्याचा माणसाच्या त्वचेवर होतो गंभीर परिणाम

तब्येत पाणी
Updated Jun 26, 2019 | 23:15 IST | टाइम्स नाऊ हिंदी

आपण सुटीच्या निमित्तानं कधी कधी समुद्रावर जातो. समुद्राच्या पाण्यात खेळतो, अंघोळ करतो. पण,समुद्राचं पाणी तुमच्या शरीराला अपायकारक ठरू शकतं. शास्त्रोक्त पद्धतीनं केलेल्या अभ्यासातून ही बाब पुढे आली आहे.

Swimming in sea
समुद्राच्या पाण्याचा माणसाच्या त्वचेवर गंभीर परिणाम  |  फोटो सौजन्य: BCCL

मुंबई : जगात समुद्र किनारा न आवडणाऱ्या व्यक्ती क्वचितच असतील. प्रत्येकाला समुद्राचं आकर्षण असतच असतं. समुद्राच्या लाटा अंगावर घेण्याचा आनंद प्रत्येकाला लुटावासा वाटतो. ज्यांना शक्य आहे ते अधून-मधून समुद्र किनाऱ्यावर वेळ घालवण्यासाठी जातात. समुद्रात अंघोळ करतात. पण, समुद्राचं पाणी आपल्या शरीराला अपायकारक ठरू शकतं, असा विचार कधी कुणी केलाय? होय समुद्राचं पाणी तुमच्या शरीराला अपायकारक ठरू शकतं. हा काही वरवरचा अंदाज नाही. तर शास्त्रोक्त पद्धतीनं केलेल्या अभ्यासातून ही बाब पुढे आली आहे. अमेरिकेत हा अभ्यास करण्यात आला आहे. त्या संदर्भातील शोध निबंध प्रसिद्धही करण्यात आला आहे. त्यामुळं तुम्ही समुद्रात पोहायला जात असाल तर, याचा नक्कीच विचार करायला हवा, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.  

अमेरिकेत झाला अभ्यास

समुद्राच्या पाण्याचा तुमच्या तब्येतीवर वाईट परिणाम होऊ शकतो. नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका शोध निबंधातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. समुद्रात पोहल्यामुळे किंवा अंघोळ केल्यामुळं तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. यात तुमची त्वचा मायक्रोबायोममध्ये रुपांतरीत होत असते. ज्यामुळं कान आणि त्वच्या संक्रमणावर वाईट परिणाम होण्याची शक्यता वाढते. अभ्यासकांनीच हा निष्कर्ष काढला आहे. अमेरिकन सोसाइटी फॉर मायक्रोबायोलॉजी या संस्थेत हा शोध निबंध सादर करण्यात आला आहे. संस्थेच्या 'एएसएम मायक्रोब-2019' या वार्षिक स्नेहसंमेलनात हा शोध निबंध सादर करण्यात आला आहे. शोध निबंधात देण्यात आलेल्या माहितीनुसार समुद्राच्या पाण्यामुळं मायक्रोबायोमध्ये होणारे बदल अतिसंवेदनशील असू शकतात. या संदभात कॅलिफोर्निया विद्यापीठातील पीएचडी विद्यार्थीनी मारिसा चॅटमॅन नील्सन म्हणाली, ‘आम्ही ज्या डेटानुसार अभ्यास केला त्यात माणसाच्या त्वचेचा समुद्राच्या पाण्याशी संपर्क आल्यास त्वचेमध्ये मोठे बदल होऊ शकतात. हे बदल संबंधित व्यक्तीला विविध रोगांची लागण होण्यास कारणीभूत ठरू शकतात.’

कोणत्या रोगांचा धोका

अभ्यासकांनी दिलेल्या निष्कर्षानुसार माणूस समुद्राच्या पाण्याच्या संपर्कात आल्यास गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आणि श्वसनाशी संबंधित आजारांना निमंत्रण मिळू शकते. कानाशी संबंधित तसेच त्वचेशी संबंधित रोग होऊ शकतात. या अभ्यासासाठी नऊ जणाच्या त्वचेचा अभ्यास करण्यात आला. त्यात त्यांना समुद्राच्या पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर पुढे १२ तास आंघोळ न करण्यास सांगितले होते. तसेच सनस्क्रीन लोशन न लावण्याच्याही सूचना दिल्या होत्या. तसेच त्यांनी मागील सहा महिन्यांत कोणत्याही प्रकारचे अँटिबायोटिकचे सेवन केलेले नाही, याचीही दक्षता घेण्यात आली होती, या सगळा दक्षता घेतल्यानंतर समुद्राच्या पाण्याचा त्वचेवर काय परिणाम झाला, याचा अभ्यास करण्यात आला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
समुद्राच्या पाण्याचा माणसाच्या त्वचेवर होतो गंभीर परिणाम Description: आपण सुटीच्या निमित्तानं कधी कधी समुद्रावर जातो. समुद्राच्या पाण्यात खेळतो, अंघोळ करतो. पण,समुद्राचं पाणी तुमच्या शरीराला अपायकारक ठरू शकतं. शास्त्रोक्त पद्धतीनं केलेल्या अभ्यासातून ही बाब पुढे आली आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola