Type 4 Diabetes: सडपातळ लोकांना टाईप-4 डायबेटिसचा धोका, या वयात होतो अधिक परिणाम

वजन कमी असणाऱ्या सडपातळ लोकांना मधुमेहाचा त्रास होत नाही, असं वाटत असेल तर ते चूक आहे. वजन कमी असणाऱ्यांना अनेकदा टाईप-4 डायबेटिस होण्याची शक्यता असते.

Type 4 Diabetes
सडपातळ लोकांना टाईप-4 डायबेटिसचा धोका  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • सडपातळ लोकांनाही असतो मधुमेहाचा धोका
  • वजन कमी असणाऱ्यांना होतो टाईप-4 डायबेटिस
  • टाईप-2 डायबेटिसप्रमाणेच करण्यात येतात उपचार

Type 4 Diabetes: भारतात गेल्या काही वर्षांपासून मधुमेहाच्या रुग्णांमध्ये (Diabetes patients) मोठ्या संख्येनं वाढ होत चालली आहे. चुकीची जीवनशैली (Lifestyle) आणि सदोष आहारपद्धतीमुळे (Diet) मधुमेहाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत प्रत्येक वयोगटातील नागरिक या आजाराशी झुंज देत असून त्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी औषधोपचार घेत आहेत. मधुमेह झाल्यामुळे शरीरातील अनेक भागांवर त्याचा परिणाम होतो आणि वेगवेगळे त्रास सुरू होतात. मधुमेहामुळे हृदयरोगासह मेंटल प्रॉब्लेमही सुरू होत असल्याचा अनुभव आहे.

वेगवेगळ्या प्रकारचे मधुमेह

डायबेटिसमध्ये अनेक प्रकार असल्याचं दिसतं. भारतात बहुतांश लोकांना टाईप वन आणि टाईप टूचा डायबेटिस होतो. काहीजणांना टाईप थ्री डायबेटिसचा फटका बसतो. तर टाईप-4 डायबेटिसचे तुलनेने कमी रुग्ण आढळतात. जाणून घेऊया टाईप-4 डायबेटिस कुणाला होतो आणि त्याची काय लक्षणं जाणवतात, याविषयी. 

काय आहे टाईप-4 डायबेटिस?

हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार टाईप-4 डायबेटिस हा उतारवयात इन्सुलिनच्या रेजिस्टंटमुळे निर्माण होणारा आजार आहे. ज्या व्यक्तींचं वय अधिक आहे आणि वजन मात्र कमी आहे, अशांना या प्रकारचा मधुमेह होण्याची शक्यता असते. टाईप टू डायबेटिस हा साधारणपणे लठ्ठ लोकांना होतो. तर टाईप फोर हा मधुमेह सडपातळ आणि कमी वजन असलेल्या नागरिकांमध्ये आढळून येतो. या प्रकारचा मधुमेह होण्यामागील नेमक्या आणि ठोस कारणांचा वैज्ञानिक अद्यापही शोध घेत आहेत. मात्र जाणकारांच्या मते उतारवयामुळेच हा आजार होत असल्याचं दिसून आलं आहे. 

ही आहेत लक्षणं

टाईप-4 डायबेटिसमध्ये इतर प्रकारच्या मधुमेहासारखाच असतो. केवळ तो कमी वजन असलेल्या लोकांना जडतो, हे त्याचं वेगळेपण. केवळ याच निकषावर या मधुमेहाचा ‘टाईप’ ओळखला जातो. जाणून घेऊया याची प्रमुख लक्षणे.

  • अतिशय थकवा येणे
  • भूक आणि तहान न लागणे
  • नजर अंधूक होणे
  • जखमा लवकरच बऱ्या न होणे
  • वारंवार लघवीला येणे
  • अचानक वजन घटणे

काय आहेत उपाय?

आतापर्यंत टाईप-फोर मधुमेहावर रामबाण इलाज सापडलेला नाही. लवकरच अँटिबॉडी औषध तयार होऊन बाजारात येईल, अशी वैद्यकीय क्षेत्रातील काहीजणांना अपेक्षा आहे. मात्र जोपर्यंत हे ओषध बाजारात येत नाही, तोपर्यंत टाईप-2 साठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचाच यासाठी उपयोग केला जातो. 

अधिक वाचा - Weight Loss Drinks: रात्री झोपताना प्या 'हे' दोन ड्रिंक्स, जिममध्ये न जाता मिळवा Flat Tummy

काय आहे उपाय?

वजन कमी असणाऱ्या व्यक्तींनी नियमित व्यायाम करणे आणि पोषक आहार घेणे आवश्यक असल्याचा सल्ला डॉक्टर देतात. वाढलेल्या वजनामुळे मधुमेह होत असला तरी त्याशिवाय त्याची इतरही अनेक कारणं असतात. त्यामुळे उत्तम आहार व आरोग्यपूर्ण जीवनशैली हाच टाईप-फोर डायबेटिस टाळण्यासाठीचा उत्तम उपाय मानला जातो. 

डिस्क्लेमर - टाईप-फोर डायबेटिसची ही सामान्य लक्षणं आणि टिप्स आहेत. तुम्हाला यासंबंधी काही गंभीर समस्या असतील, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेण्याची गरज आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी