Symptoms of depression: छोट्या छोट्या गोष्टींवर रडू येतं? असू शकतं डिप्रेशनचं लक्षण

उदास वाटणे, एकटं एकटं राहण्याची इच्छा होणे यासारखी लक्षणंही ही डिप्रेशनचा इशारा देणारी असल्याचं सांगितलं जातं. ही लक्षणं कुठल्याही व्यक्तीमध्ये दिसू शकतात आणि त्यामुळे त्या व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते.

Symptoms of depression
छोट्या छोट्या गोष्टींवर रडू येतं?  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • काहीजणांना असते सतत रडण्याची सवय
  • छोट्यामोठ्या गोष्टींवर ढाळतात आसवं
  • सतत होत असते चिडचिड

Symptoms of depression: काहीजणांना छोट्याछोट्या गोष्टींवरून अश्रू ढाळण्याची (Crying) सवय असते. अशा व्यक्ती कमालीच्या सेन्सेटिव्ह (Sensitive) असतात आणि काहीही झालं तरी त्या ढसाढसा रडू लागतात. काही व्यक्तींची आपल्या भावना व्यक्त करण्याची पद्धत ही इतरांपेक्षा वेगळी असू शकते. मात्र प्रत्येक गोष्टीवर रडणे आणि छोट्यामोठ्या, किरकोळ कारणावरून आसवं वाहत बसणे हे डिप्रेशनचं लक्षण असल्याचं सांगितलं जातं. अशा प्रकारची स्थिती जर 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ राहत असेल, तर ते एका गंभीर आजाराचं लक्षण असण्याची शक्यता असते. उदास वाटणे, एकटं एकटं राहण्याची इच्छा होणे यासारखी लक्षणंही ही डिप्रेशनचा (Depression) इशारा देणारी असल्याचं सांगितलं जातं. ही लक्षणं कुठल्याही व्यक्तीमध्ये दिसू शकतात आणि त्यामुळे त्या व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते. जाणून घेऊया डिप्रेशनच्या काही प्राथमिक लक्षणांबाबत.

उदास राहणे

सतत उदास राहणे, हे डिप्रेशनचं अत्यंत मूलभूत आणि प्राथमिक लक्षण समजलं जातं. सतत एकटं राहायला आवडणे, माणासांपासून दूर पळण्याचा प्रयत्न करणे, एकांतात रमणे, रिकामेपणा वाटणे यासारख्या गोष्टी सातत्याने जाणवत असतील, तर तुम्ही डिप्रेशनची शिकार होत असण्याची शक्यता असते. यातील काही लक्षणं ही एरवीदेखील जाणवू शकतात. मात्र यापैकी सर्वच्या सर्व लक्षणे ही सातत्याने जाणवत असतील, तर तज्ज्ञांना भेटून याबाबत चर्चा कऱण्याची गरज असते. 

अधिक वाचा - How to increase heart pumping: हार्ट पंपिंग वाढवण्याचे 4 सोपे उपाय, रक्ताचा सुरु होईल मुक्त संचार

आत्मक्लेष

डिप्रेशनमध्ये जाऊ लागलेल्या व्यक्ती या स्वतःला इतरांच्या तुलनेत फारच कमी समजू लागतात. आपण कुठल्याही कामासाठी पात्र नसल्याचं त्यांना वाटतं. सतत कमीपणाची भावना त्यांना त्रास देत राहते. त्यांना इतरांशी बोलणंही नको वाटू लागतं. इतर व्यक्तीदेखील आपल्याला सतत कमी लेखत आहेत, असा भास त्यांना होत असतो. त्यामुळे अशा व्यक्ती इतरांना टाळण्याचा आणि एकटं राहण्याचा प्रयत्न करत असतात. 

सतत चिडचिड

डिप्रेशनमध्ये असणारी व्यक्ती ही सतत उदास आणि निराश असते. त्यामुळे छोट्यामोठ्या कारणावरून त्याची चिडचिड होत असल्याचं दिसतं. चिडचिड, राग, फ्रस्टेशन, आरडाओरडा ही सगळी लक्षणं सातत्याने दिसत असतील, तर ते डिप्रेशनचंच लक्षण मानलं जातं. अशा व्यक्ती प्रसंगी आक्रमक होण्याचीही शक्यता असते. 

अधिक वाचा - Pomegranate Juice: रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या डाळिंबाचा ज्यूस आणि दूर होतील हे गंभीर आजार

सततचा थकवा

डिप्रेशनमध्ये असलेल्या व्यक्ती या सतत थकलेल्या असतात. त्यांना कुठल्याच कामात उत्साह नसतो आणि प्रत्येक काम टाळण्याचा ते प्रयत्न करत असतात. कुठलंही काम कसं टाळता येईल आणि पुढे ढकलता येईल, याचा ते सतत प्रयत्न करत असतात. अशा व्यक्तींना घराबाहेर पडण्याचा, मोकळ्या हवेत फिरण्याचा, इतरांना भेटण्याचा आणि प्रवास करण्याचा सल्ला दिला जातो. 

डिस्क्लेमर - डिप्रेशनबाबतच्या या काही सामान्य टिप्स आणि निरीक्षणं आहेत. तुम्हाला याबाबत काही गंभीर समस्या असतील, तर तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी