Cholesterol Control: पाच उपाय करा कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवा

Take five measures to keep cholesterol under control : वजन वाढणे, कोलेस्टेरॉल वाढणे या समस्या अनेकांना भेडसावत आहेत. वाढत्या कोलेस्टेरॉलमुळे रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार अशा गंभीर आजार असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या समस्येवर उपाय म्हणून कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे.

Take five measures to keep cholesterol under control
पाच उपाय करा कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • पाच उपाय करा कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवा
  • वजन वाढणे, कोलेस्टेरॉल वाढणे या समस्या अनेकांना भेडसावत आहेत
  • पाच सोपे उपाय करून कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवणे शक्य

Take five measures to keep cholesterol under control : भरपूर वेळ एकाच ठिकाणी बसून काम करणे तसेच तळलेले पदार्थ, मैद्याचे पदार्थ, आईस्क्रीम, शीतपेय (कोल्डड्रिंक), फास्टफूड आणि जंकफूड खाणे यामुळे वजन वाढणे, कोलेस्टेरॉल वाढणे या समस्या अनेकांना भेडसावत आहेत. वाढत्या कोलेस्टेरॉलमुळे रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार अशा गंभीर आजार असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या समस्येवर उपाय म्हणून आधी कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. पाच सोपे उपाय करून कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवणे शक्य आहे. जाणून घ्या हे उपाय...

तब्येत पाणी । वेबस्टोरी : आरोग्य

  1. गोड पदार्थ : साखर आणि कृत्रिम साखर वापरून तयार केलेले गोड पदार्थ खाणे बंद करा. सर्व प्रकारची साखर शरीरात कोलेस्टेरॉल वाढवण्यास आणि गंभीर समस्यांना जन्म देण्यास कारणीभूत ठरते. यामुळे साखर बंद केल्यास अनेक त्रास टाळणे शक्य आहे.
  2. तळलेले पदार्थ : तळलेले पदार्थ, मैद्याचे पदार्थ, बेकरीतील पदार्थ, आईस्क्रीम, शीतपेय (कोल्डड्रिंक), फास्टफूड आणि जंकफूड खाणे बंद करा. यामुळे वजन वाढण्याचा धोका कमी होईल. कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल.
  3. मांसाहार : मांसाहार केल्याने शरीरात कोलेस्टेरॉल वाढते. वजन वेगाने वाढू शकते. याउलट मांसाहार करणे थांबवले तर कोलेस्टेरॉल आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल. आपण मांस (मटण) जास्त खात असाल तर वजन आणि कोलेस्टेरॉलची वाढण्याचा धोका जास्त असतो. प्रक्रिया केलेले मांस तर लठ्ठपणा आणि कोलस्टेरॉलच्या समस्येचे प्रमुख कारण आहेत.
  4. धूम्रपान, मद्यपान : धूम्रपान, मद्यपान, अंमली पदार्थ, मावा, गुटखा, तंबाखू, पान खाणे अशी शरीराला हानीकारक असलेली व्यसनं केल्याने लठ्ठपणा आणि कोलस्टेरॉलची समस्या निश्चितपणे निर्माण होते. यामुळे शरीराला हानीकारक असलेली व्यसनं पूर्णपणे बंद करणे तसेच अशी व्यसनं करणाऱ्यांपासून दूर राहणे तब्येतीच्या हिताचे ठरू शकते.
  5. लठ्ठपणा : भारतीय व्यक्तीने उंची सेंटीमीटरमध्ये मोजून आलेल्या आकड्यातून १०० वजा करावे. येणारे उत्तर एवढेच आपले वजन असणे अपेक्षित आहे. जर एखाद्याची उंची १७६ सेमी असेल तर त्याचे वजन १७६ वजा शंभर म्हणजे ७६ किलो असणे अपेक्षित आहे. दोन-तीन किलो वजन कमी किंवा जास्त चालू शकते पण त्याहीपेक्षा कमी किंवा जास्त वजन असल्यास ते तब्येतीला हानीकारक असू शकते. 

Disclaimer : वजन आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती हे सूत्र लक्षात ठेवा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने उपाय करा. प्रस्तुत माहिती ही संकलित आहे. या माहितीचा जबाबदारी टाइम्स नाउ मराठी घेत नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी