Dengue in Kids: लहान मुलांमध्ये अशी ओळखा डेंग्यूची लक्षणे...उपचार करणे होईल सोपे

Dengue Symptoms : पावसाळा सरून हिवाळा (Winter)सुरू झाला आहे. पावसाळ्यानंतर डासांचा (Mosquito) उपद्रव उग्र रूप धारण करू लागतो. डासांमुळे डेंग्यू, मलेरिया, झिका विषाणू, चिकुनगुनिया, पिवळा ताप यांसारखे प्राणघातक आजार पसरतात. दुर्दैवाने अशा संसर्गांच्या कक्षेत लहान मुले आणि वृद्ध लोक लवकर येतात.डेंग्यूची लक्षणे ही सामान्य ताप आणि कोविड सारखीच असतात. त्यामुळे त्याच्याकडे जरा दुर्लक्षच होते

Dengue Symptoms
डेंग्यूची लक्षणे 
थोडं पण कामाचं
  • हिवाळा सुरू झाल्यावर अनेक आजारांचा प्रादूर्भाव
  • डासांमुळे डेंग्यू, मलेरिया, झिका विषाणू, चिकुनगुनिया, पिवळा ताप यांसारखे गंभीर आजार होतात
  • लहान मुलांमध्ये डेंग्यूची लक्षणे कशी ओळखायची

How to identify Dengue Symptoms in Kids:नवी दिल्ली : ऋतू बदलला की अनेक संसर्गाचे आजार (Contagious disease) सुरू होतात. आता पावसाळा सरून हिवाळा (Winter)सुरू झाला आहे. पावसाळ्यानंतर डासांचा (Mosquito) उपद्रव उग्र रूप धारण करू लागतो. डासांमुळे डेंग्यू, मलेरिया, झिका विषाणू, चिकुनगुनिया, पिवळा ताप यांसारखे प्राणघातक आजार पसरतात. दुर्दैवाने अशा संसर्गांच्या कक्षेत लहान मुले आणि वृद्ध लोक लवकर येतात. या साथीच्या किंवा संसर्गजन्य आजारांमुळे बळी पडणाऱ्यांमध्ये त्यांची संख्या जास्त असते. लहान मुले अशा संसर्गांना फारच संवेदनशील असतात कारण त्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत असते. सध्या अनेक ठिकाणी डेंग्यूसारख्या (Dengue) गंभीर आजाराचा संसर्ग पसरलेला आहे. डेंग्यूमुळे दरवर्षी हजारो लोकांचा मृत्यू होतो. डेंग्यू हा प्रसंगी धोकादायक आजार ठरू शकतो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे डेंग्यूची लक्षणे ही सामान्य ताप आणि कोविड सारखीच असतात. त्यामुळे त्याच्याकडे जरा दुर्लक्षच होते आणि परिणामी त्याचे निदान होण्यास उशीर होतो. अनेकदा मुलांच्या बाबतीत तर डेंग्यूची लक्षणे (Dengue symptoms in kids) जवळजवळ नसतात. डेंग्यूचा डास चावल्यानंतर चार ते पाच दिवसांनी संसर्गाची लक्षणे दिसतात. या सर्व कारणांमुळेच डेंग्यूचा ताप लहान मुलांमध्ये गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता असते. (Take seriously if you observe these Dengue symptoms in kids)

अधिक वाचा  : द्रविड गुरूने सांगितलं भारतीय संघाच्या पराभवाचं खरं कारण

लहान मुलांमध्ये डेंग्यूची अशी असू शकतात लक्षणे -

अंगदुखी
सर्वसाधारणपणे डेंग्यूने ग्रस्त असलेल्या मुलांना तीव्र सांधेदुखी, पाठदुखी आणि डोकेदुखी यासारखी लक्षणे दिसून येतात. जर मुले सुस्त झाली असतील आणि चिडचिड करत असेल तर त्यांच्याशी बोलून त्यांना नेमका काय त्रास होतो आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. कारण अनेकदा मुलांना त्रास तर होत असतो मात्र त्यांना ते नीट सांगता येत नाही. त्यांना काय होते आहे हे समजून घ्या जेणेकरुन तुम्हाला वैद्यकीय उपचार घेणे सोपे होईल. 

अधिक वाचा  : वास्तुशी संबंधित 'हे' 5 उपाय केल्यास घरात येते समृद्धी

तापासारखी लक्षणे
डेंग्यूमध्ये लहान मुलांना नेहमीच्या तापाप्रमाणेच किंवा सर्दी-खोकल्याबरोबर खूप ताप येतो. याच्याकडे नेहमीचा ताप म्हणून दुर्लक्ष होते. मात्र हा साधारण तापदेखील डेंग्यूचे लक्षण असू शकते. 24 तासात जर बालकाचा ताप कमी झाला नाही, तर डॉक्टरांशी संपर्क साधा.

त्वचेच्या समस्या
डेंग्यूमध्ये मुलांमध्ये आढळणारे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे त्वचेवर पुरळ किंवा लाल पुरळ. हे पुरळ गोवरसारख्या पॅचमध्ये दिसतात. सतत खाज सुटणे हे देखील डेंग्यूचे दुसरे लक्षण आहे. जर अशी पुरळ दिसली तर सावध व्हा.

पोटाच्या समस्या
डेंग्यूमध्ये मुलांचे पोट बिघडते. त्यांना मळमळ, उलट्या इत्यादी त्रास होतो. त्यांना ओटीपोटात तीव्र वेदना देखील होऊ शकतात.

अधिक वाचा - IND vs NZ: T20 वर्ल्ड कपमधील पराभवानंतर BCCI चा मोठा निर्णय, द्रविड ॲन्ड कंपनीला दिला ब्रेक

रक्तस्त्राव
डेंग्यूत रुग्णाच्या प्लेटलेट कमी होतात. त्यामुळे मुलांच्या हिरड्या आणि नाकातून रक्तस्त्राव होऊ शकतो. जर असे आढळले तर त्वरीत वैद्यकीय मदत घ्या.  कारण काही प्रकरणांमध्ये यामुळे रक्तस्रावी ताप किंवा शॉक सिंड्रोम सारख्या जीवघेण्या परिस्थिती उद्भवू शकते.

मुलांच्या वर्तनात बदल
मुले जेव्हा आजारी पडतात तेव्ही ती अनेकदा चीडचीड करतात, जास्त रडतात. खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करतात. पालक बऱ्याचवेळा हे सर्व नेहमीचेच आहे असे समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र अशा बदलांना गंभीरपणे घ्यायला हवे. मुलांना भूक लागत नसेल आणि त्यांची चीडचीड वाढली असेल तर डॉक्टरांकडे जाणे योग्य ठरते.

(Disclaimer : प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे उपचार सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी