Herbs for Diabetes : आधुनिक जीवनशैलीत मधुमेहाची समस्या सामान्य झाली आहे. आजकाल तरूणांपासून ते वृद्ध वर्गाला याचा त्रास होत आहे.
मधुमेह असलेल्या व्यक्तीने आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. डॉक्टर त्यांना असा आहार घेण्यास मनाई करतात, ज्यामुळे शरीरातील साखरेची पातळी वाढण्याची शक्यता असते. अशा स्थितीत मधुमेहाच्या रुग्णांना त्यांच्या आहारावर नियंत्रण ठेवण्याची गरज असते.
तुमचा थोडासा निष्काळजीपणा तुम्हाला त्रासदायक ठरू शकतो. अशा परिस्थितीत शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवायची असेल तर महागड्या औषधांपेक्षा आयुर्वेदिक औषधे वापरणे चांगले ठरू शकते. आयुर्वेदिक औषधांमुळे शरीराला समस्या निर्माण होण्याची शक्यता कमी होते.
जर तुम्हाला तुमच्या शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवायची असेल, तर तुमच्या आहारात जांभळाच्या बियांचा समावेश करा. जांभळाच्या बियांचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. या बियांचे सेवन करण्यासाठी जांभळाच्या बिया सुकवून बारीक करून घ्याव्यात.
यानंतर ही पावडर रोज रिकाम्या पोटी कोमट पाण्यात घ्या. यामुळे साखरेची पातळी बऱ्याच अंशी नियंत्रित राहू शकते.
अंजीरची पाने देखील मधुमेह नियंत्रित करण्यासाठी खूप प्रभावी ठरू शकतात. सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करता येते. अंजीरच्या पानांमध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीरातील रक्तातील साखर कमी होण्यास मदत होते.
ऑलिव्ह ऑइल हे मधुमेह नियंत्रित करण्यासाठी देखील खूप प्रभावी मानले जाते. यात ट्रायग्लिसराइड्स कमी करण्याचा गुणधर्म आहे. ऑलिव्ह ऑईलचा आहारात नियमित समावेश करून तुम्ही मधुमेहाची समस्या बर्याच प्रमाणात कमी करू शकता. याव्यतिरिक्त, ते हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी देखील प्रभावी आहे.
( Disclaimer: या लेखात सुचविलेल्या टिपा आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणताही फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी, कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांचा सल्ला घ्या. )