Safe Holi: होळीच्या दिवशी घ्या ही काळजी, कोरोनापासून वाचण्यासाठी रंग खेळताना करू नका या चुका

तब्येत पाणी
Updated Mar 29, 2021 | 11:56 IST | टाइम्स नाऊ मराठी

आपल्याही शहरात जर होळी साजरी करण्यावर बंधने असतील तरी आपल्याला काळजी करण्याची काहीच गरज नाही. फक्त काही साध्या दिशानिर्देशांचे पालन करून आपण आपला हा सण संस्मरणीय आणि मजेदार बनवू शकता.

Holi
होळीच्या दिवशी घ्या ही काळजी, कोरोनापासून वाचण्यासाठी रंग खेळताना करू नका या चुका  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • घरातच साजरा करा होळीचा सण
  • मास्क आणि सॅनिटायजर सोबत ठेवा
  • शारीरिक संपर्कापासून लांब राहा

नवी दिल्ली / मुंबईः रंगांचा सण (Festival of colors) असलेली होळी (Holi) पुन्हा एकदा आपल्या जीवनात रंगांची उधळण करण्यासाठी सज्ज आहे. पण कोरोनाच्या संकटामुळे (corona pandemic) हे रंग फिके पडत आहेत. गेल्यावर्षी कोरोनाची सुरुवात असल्यामुळे हा सण साध्या पद्धतीने (simple manner) साजरा करण्यात आला होता. आता देशभऱात पुन्हा एकदा कोव्हिड-19चा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये (states) होळी साजरी करण्यावर निर्बंध (restrictions) घालण्यात आले आहेत. मात्र सणाचा आनंद लुटण्यासाठी काही साधे उपाय (simple solutions) वापरून आपण हा सण साजरा करू शकता.

घरातच साजरा करा होळीचा सण

आपल्याही राज्यात सार्वजनिक पद्धतीने सण साजरे करण्यावर प्रतिबंद लावण्यात आलेले असतील तरीही आपण आपल्या घरातच राहून होळीचा सण साजरा करू शकता. यामुळे विषाणूचा संसर्ग पसरण्याची भीती कमी होण्यास मदत होईल.

मास्क आणि सॅनिटायजर सोबत ठेवा

घरातून बाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायजर आपल्यासोबत अवश्य ठेवा. लक्षात ठेवा, घरातून बाहेर पडताना न विसरता मास्क लावा.

शारीरिक संपर्कापासून लांब राहा

होळीच्या सणात लोकांना मिठी मारणे, हात मिळवणे याशिवाय अनेक प्रकारच्या शारीरिक संपर्कापासून वाचण्याचा प्रयत्न करा. खासकरून रंग लावताना लोकांच्या चेहऱ्याला स्पर्श करू नका.

त्रास होत असल्यास बाहेर पडू नका

जर कुणाला सर्दी-खोकला किंवा ताप अशी लक्षणे दिसत असतील तर त्या व्यक्तीने होळीच्या कुठल्याही उत्सवात सामील न होणे हेच उत्तम.

बाहेरून खाणे मागवू नका

उपहारगृहांमध्ये बसून खाण्याची व्यवस्था सध्या बंद करण्यात आली आहे. त्यामुळे शक्यतो बाहेरून खाणे मागवू नका. या काळात घरीच जेवण तयार करून ते खाणे हा सर्वात चांगला पर्याय आहे.

जवळच्या लोकांसोबतच साजरा करा सण

होळीच्या सणाला आपल्या घरातच एखादा छोटा समारंभ करा. यात फक्त जवळच्या लोकांनाच आमंत्रण द्या. गर्दी करू नका. यामुळे विषाणूच्या संसर्गाचा धोका कमी होतो. यावेळीही शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करण्याचा प्रयत्न करा. खिडक्या उघड्या ठेवा आणि एसी बंद करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी