Cause of Heart Attack : अंघोळ करण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे येऊ शकतो हार्ट अटॅक, या गोष्टी ठेवा लक्षात

हार्ट अटॅक येण्याची अनेक कारणं आहेत. मात्र त्यापैकी अंघोळीची चुकीची पद्धत हेदेखील एक कारण असू शकतं, याची अनेकांना कल्पना नसते

Cause of Heart Attack
अंघोळ करण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे येतो हार्ट अटॅक  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • थंड पाण्याच्या अंघोळीमुळे येऊ शकतो हार्ट अटॅक
  • अतिथंड किंवा अतिउष्ण पाणी म्हणजे शरीरासाठी संकट
  • अंघोळीला कोमट पाणी वापरण्याचा सल्ला

Cause of Heart Attack : अलिकडच्या काही वर्षात हार्ट अटॅक (Heart Attack) येऊन मृत्यू (Death) होणाऱ्यांच्या संख्येत कमालीची वाढ होत असल्याचं चित्र आहे. चुकीची लाईफस्टाईल (Wrong lifestyle) आणि सदोष आहारपद्धतीमुळे (Diet) अनेकांना कमी वयातच हृदयरोगाचा (Heart Disease) त्रास सुरु होतो. शरीरातील रक्त वाहून नेत असताना जर रक्तवाहिनीत अडथळे निर्माण झाले, तर हृदयविकाराचा झटका येतो. वेगवेगळ्या कारणांमुळे रक्तवाहिन्यांत अडथळे निर्माण होत असतात. गेल्या काही दिवसांत सर्वसामान्य माणसांपासून अगदी बॉलिवूड स्टारपर्यंत अनेकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचादेखील अशाच प्रकारे अचानक हार्ट अटॅक आल्याने मृत्यू झाला होता. हार्ट अटॅक येण्याची अनेक कारणं असली, तरी अंघोळ करण्याची चुकीची पद्धत हेदेखील एक मोठं कारण असतं. अनेकांना याची कल्पना नसते. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने अंघोळ केली जाते. जाणून घेऊया, अंघोळीचा आणि हार्ट अटॅकचा एकमेकांशी नेमका काय संबंध असतो आणि अंघोळ करण्याची आरोग्यपूर्ण पद्धत नेमकी कुठली याविषयी. 

थंड पाण्यामुळे हृदयाला धोका

अचानक शरीरावर थंड पाणी पडलं, तर त्याचा हृदयावर विपरित परिणाम होत असल्याचं अनेक तज्ज्ञ सांगतात. अचानक शरीरावर जर थंड पाणी पडलं तर त्वचा आकुंचन पावते. त्यामुळे रक्तवाहिन्याही आखडल्या जातात. अशा परिस्थितीत शरीराला अधिक वेगाने रक्तपुरवठा करण्याची गरज निर्माण होते. मात्र अधिक वेगाने वाहणाऱ्या रक्तामुळे वाहिन्यांवर दबाव येतो आणि त्या फुटण्याची शक्यता निर्माण होते. 

थंड पाण्याने हार्ट अटॅक

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, जर एखादी तरुण व्यक्ती अचानक थंड पाण्याने अंघोळ करू लागली, तर त्याला हार्ट अटॅक येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्या शरीराचं तापमान हे साधारणतः कोमट पाण्याएवढं असतं. त्यापेक्षा खूपच थंड किंवा खूपच गरम पाणी शरीरावर पडलं, तर त्यामुळे अचानक एखादं संकट आल्याप्रमाणे आपलं शरीर प्रतिसाद देतं. हार्ट अटॅक येण्यापूर्वी आपल्या डाव्या हातात प्रचंड वेदना होऊ लागतात. काहीजणांना जबड्यात आणि पाठीतही वेदना जाणवतात. ही हार्ट अटॅकची प्राथमिक लक्षणे असतात.

अधिक वाचा - Weight Loss Tips in Marathi : वेट लॉस आणि फॅट लॉसमध्ये आहे फरक, तुमचीही गल्लत होत नाहिये ना ?

काय आहे योग्य पद्धत?

शरीराचं तापमान हे कोमट पाण्याएवढं असतं. त्यामुळे शरीराच्या तापमानाशी मिळत्याजुळत्या तापमानाचं पाणी अंघोळीसाठी वापरण्याचा सल्ला दिला जातो. अतिथंड किंवा अतिगरम पाण्याने अंघोळ करणे टाळावे, असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. नियमित अंघोळीसाठी कोमट पाणी वापरणे, योग्य आहे. त्याचप्रमाणे पाणी अंगावर घेताना डोक्यापासून सुरुवात करण्याऐवजी पायापासून करा, असाही सल्ला डॉक्टर देतात. शरीराला पाण्याच्या तापमानाची सवय होण्यासाठी अगोदर पाणी पायावर ओतावे आणि त्यानंतर हळूहळू डोक्याकडील भागावर पाणी घेत जावे, असा सल्ला दिला जातो. 

अधिक वाचा - Milk Face Packs: दूध हे त्वचेसाठी आहे वरदान...चमकदार त्वचेसाठी असे बनवा फेस पॅक

शॉवर नको, बादलीच बरी

हार्ट अटॅक टाळण्यासाठी शॉवरऐवजी बादली आणि तांब्याने अंघोळ करावी, असं सांगितलं जातं. यामुळे पाण्याची बचत तर होतेच, मात्र त्याचबरोबर हळूहळू अंदाज घेत पाणी शरीरावर ओतलं जातं. अगोदर पायावर पाणी ओतावं आणि त्यानंतर पाण्याच्या तापमानाचा अंदाज घेत, त्यात गरजेनुसार गरम-थंड पाणी मिसळत अंघोळ करावी, असा सल्ला देण्यात येतो. 

डिस्क्लेमर - या घरगुती स्वरुपाच्या सामान्य टिप्स आहेत. तुम्हाला आरोग्याशी संबंधित काही गंभीर प्रश्न असतील, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेण्याची गरज आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी