उन्हाळयात टॅनिंगपासून वाचण्यासाठी वापरा हे हर्बल पॅक!

तब्येत पाणी
Updated May 16, 2019 | 13:32 IST | टाइम्स नाऊ मराठी

आपल्याला स्कीन टॅनिंगच्या समस्येला सामोर जावं लागत असेल तर आपण खाली दिलेले हर्बल पॅक वापरू शकता. हे हर्बल फेस पॅक मुरूम आणि पुटकुळ्यांवरही गुणकारी आहेत. हे फेस पॅक नैसर्गिक आहेत. त्यामुळे वाईट परिणाम होणार नाही

Skin Whiting Face Pack
हर्बल घरगुती पॅक  |  फोटो सौजन्य: Getty Images

सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे स्कीन टॅनिंगची समस्या हमखास जाणवते. त्यातच आता एका रिपोर्टनुसार असं समोर आलं आहे की, ८८ % महिला आपल्या त्वचेसाठी योग्य उत्पादन निवडू शकत नाहीत. हे गरजेचं नाही की, बाजारमध्ये उपलब्ध सर्वप्रकारचे स्कीन केअर प्रॉडक्‍ट्स आपल्या त्वचेसाठी योग्य असतील. नैसर्गिकरित्या उपलब्ध साधन सामग्री आपल्या त्वचेसाठी जितकी प्रभावी ठरेल तितके बाजारात उपलब्ध प्रॉडक्ट करू शकत नाहीत.

नैसर्गिक घटकांमध्ये जीवाणू विरोधी लढण्याचे गुणधर्म असतात. त्यामुळे आज आपण नैसर्गिक फेस पॅक बनवायला शिकणार आहोत. जेणेकरून आपला चेहरा नैसर्गिकरित्या मॉइश्चराईज होईलच आणि सोबतच चेहरा उजळेल. विशेष म्हणजे हे हर्बल फेस पॅक मुरूम आणि पुटकुळ्यांवरही गुणकारी आहेत.

सध्या उन्हाचं प्रमाण वाढल्यानं स्कीन टॅनिंगची समस्याही वाढत आहेत. यापासून बचाव करण्यासाठी आपण हर्बल फेस पॅक नक्की वापरा आणि त्वचेसंदर्भातील समस्येपासून सुटका मिळवा.

पाहुयात घरगुती हर्बल फेस पॅक

१. हळद आणि बेसनपासून बनवलेला फेस पॅक

वापरण्यात येणारी सामग्री-

  • १ मोठा चमचा बेसन
  • १/२ चमचा हळद
  • १ मोठा चमचा गुलाब जल

फेसपॅक बनविण्याची पद्धत – सर्व घटक एकत्र करून चेहऱ्याला लावता येईल इतपत घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहरा आणि मानेला लावावी. १५ मिनीटानंतर चेहरा धुवून टाकावा.

२. चंदन फेस पॅक

वापरण्यात येणारी सामग्री-

  • १ चमचा चंदन पावडर
  • १ चमचा मध

फेस पॅक बनवण्याची पद्धत - चंदन पावडर मधामध्ये मिसळा. याची चांगली पेस्ट बनवा. हा पॅक चेहरा आणि मानेला लावावा. पॅक १५ ते २० मिनीटं ठेवावा आणि मग धुवून टाका. हा पॅक आपण अशाप्रकारे आठवड्यातून तीन वेळा लावू शकता.

३. मेरीगोल्ड फेस पॅक

वापरण्यात येणारी सामग्री-

  • २ मोठी झेंडूची फुले (चांगल्यापैकी बारीक केलेली)
  • १ मोठ चमचा चंदन पावडर
  • १/२ चमचा दही
  • १/२ चमचा लिंबाचा रस

फेस पॅक बनवण्याची पद्धत - झेंडूच्या फुलांच्या पाकळ्यांची मिक्सरमधून पेस्ट करून घ्या. त्यात चंदन पावडर, दही आणि लिंबाचा रस मिसळावा. मिश्रण फेटून एकजीव करावं, ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावावी आणि २० मिनीटं ही पेस्ट तशीच ठेवावी. मग चेहरा पाण्याने धुवून टाकावा. आपण हा पॅक आठवड्यातून दोनदा वापरू शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
उन्हाळयात टॅनिंगपासून वाचण्यासाठी वापरा हे हर्बल पॅक! Description: आपल्याला स्कीन टॅनिंगच्या समस्येला सामोर जावं लागत असेल तर आपण खाली दिलेले हर्बल पॅक वापरू शकता. हे हर्बल फेस पॅक मुरूम आणि पुटकुळ्यांवरही गुणकारी आहेत. हे फेस पॅक नैसर्गिक आहेत. त्यामुळे वाईट परिणाम होणार नाही
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola