Home Remedy: दात पिवळे पडल्यास 'या' फळाच्या सालीने चमकवा दात, नक्की फायदा होईल

तब्येत पाणी
Updated Nov 04, 2022 | 13:56 IST | टाइम्स नाऊ मराठी

Teeth Cleaning Tips: दात चमकवण्यासाठी, दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी (Teeth cleaning) केळीच्या सालींचा उपयोग करा. केळीच्या (Banana) सालींपासून बनवलेली ही पावडर दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी प्रभावी आहे.

teeth cleaning tips for whitning teeth use this fruit home made powder
पिवळे दात चमकवण्यासाठी 'या' फळाच्या सालींचा उपयोग करा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • दात पिवळे झाल्यास केळीच्या सालीचा उपयोग करा
  • केळीच्या सालीची पावडर करून त्याचा वापर करावा
  • केळीच्या सालीच्या पावडरने दात घासल्यास दातांचा पिवळेपणा कमी होतो

Teeth Cleaning Tips: नियमितपणे दात स्वच्छ  (Teeth cleaning) करणे खूप महत्वाचे आहे आणि तसे न केल्यास दातांच्या समस्यांसह तोंडाशी संबंधित अनेक आजार होतात. दात पिवळे पडणे ही सध्या एक मोठी समस्या झालेली आहे. दात पिवळे पडल्याने लोकं मित्रांकडे, बाहेर, जाण्यास कचरतात. मोकळेपणाने हसण्याचीही त्यांना लाज वाटते. मात्र, आता तुम्हाला काळजी करण्याची किंवा लाज वाटण्याची गरज नाही. दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला एक सिक्रेट रेसिपी सांगणार आहोत. यामुळे तुमच्या दातांचा पिवळेपणा नक्की कमी होईल. केळीच्या (Banana) सालीपासून बनवलेली ही पावडर दातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी खूप उपयोगी आहे. 


केळीच्या सालीची पावडर बनवण्याची कृती

- केळीच्या वाळलेल्या साली घ्या. 
- त्यात ऑलिव्ह ऑईल आणि मीठ देखील घाला आणि हे मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घ्या.  
- नीट बारीक पावडर तयार झाल्यावर बंद डब्यात भरून ठेवून द्या. 


कशाप्रकारे वापरावी

- सगळ्यात आधी आपले दात बोटाने घासून धुवा.
- आता ही पावडर बोटावर किंवा ब्रशवर लावून दातांवर चांगली लावा.
- किमान 5 मिनिटे पावडर दातांवर ठेवा.
- त्यानंतर ते बोटाने किंवा ब्रशने घासा. 
- त्यानंतर कोमट पाण्याने तोंड खळखळून धुवा. 


हा उपाय करताना खालील गोष्टींची काळजी घ्या

आठवड्यातून किमान दोनदा या पावडरने दात स्वच्छ करा, तर त्याचे परिणाम लवकर दिसतील. आठवड्यातून 2 ते 3 वेळा केळीच्या सालीच्या पावडरने दात स्वच्छ करा. 
मात्र, ही पावडर गिळू नका. हे नक्की लक्षात ठेवा. थंडीच्या दिवसांमध्ये केळीच्या सालीने दात स्वच्छ केल्यास खूप फायदा होतो.  केळीची साल दात खूप चांगल्याप्रकारे स्वच्छ करते. त्याचबरोबर सालीमध्ये असलेले मिनरल्स देखील दातांना अनेक फायदे देतात.

( डिस्क्लेमर : सल्ल्यासह ही सामग्री केवळ सामान्य माहिती प्रदान करते. हे कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय मताचा पर्याय नाही. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. Timesnow मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही. )

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी